ब्रेकिंग न्यूज
Vasai-Virar Mahapalika मध्ये कर्मचारी भरतीवरून राडा, भाजप आणि बविआ आमने-सामनेे एक शेळीपासून सुरू केलेला व्यवसाय, आता 40 शेळ्यांचा मालक, सिद्धेश्वर यांचा वर्षाचा कमाईचा आकडा पाहाच! गौरीपूजनाला गावी गेले, छ. संभाजीनगरात 4 घरं फोडली; लाखोंची लूट, पण 4 तोळ्यांचा हार तिथंच फेकला, शॉकिंग कारण… Superfast 100 News | सुपरफास्ट बातम्या | 23 September | Sunil Shelke News | SIM Cars News | Fadnavis साहेब, कसं जगायचं! पिकांचा उरला फक्त पाला, डोळ्यात पाणी आणणारा शेतकऱ्याचा VIDEO भावी पतीलाच दिसले नको ते फोटो, मुंबईतल्या तरुणीसोबत भयंकर घडलं, 10 हजारांची डिमांड अन् ‘इन्स्टा’वर… अशक्य काहीच नाही! टेनिस कोर्टवरचा ‘गोल्डन बॉय’ झाला CA, पहिल्याच प्रयत्नात कसं मिळवलं यश? Video लेकीला घेऊन आई घरी निघाली, वाटतेच मोपेड घसरली, मागून काळ बनून आला डंपर, क्षणात…, कोल्हापूर हळहळलं बनावट CBI अधिकारी, ज्येष्ठ नागरिकांना डिजिटल अरेस्टच्या नावाखाली 100 कोटींचा गंडा, पुण्यातील धक्कादायक घटना… Sonam Maskar : कोरोनात मुंबई सोडून कोल्हापूर गाठलं; प्रॉपर्टी विकून लेकीचं स्वप्न पूर्ण केलं; पोरीनं Asian …
SP News Maregaon

मुंढवा भूखंड घोटाळ्यात मोठा ट्विस्ट:पॉवर ऑफ अटॉर्नीवर पार्थ पवार, तेजवानीच्या सह्या; अंजली दमानिया, कुंभारांनी समोर आणले दस्तऐवज

1 View
🔊
बातमी ऐका (Marathi Voice Reader)


उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे सुपुत्र पार्थ पवार यांच्याशी संबंधित मुंढवा भूखंड घोटाळ्यात एक नवा ट्विस्ट आला आहे. सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया व विजय कुंभार यांनी या प्रकरणी पार्थ पवार व शितल तेजवानी यांच्यात झालेल्या पॉवर ऑफ अटॉर्नी (मुखत्यारपत्र) व्यवहाराशी संबंधित महत्त्वाचे दस्तऐवज समोर आणले आहेत. या दस्तऐवजांवर दोन्ही पक्षांच्या स्वाक्षऱ्या आहेत. त्यामुळे पार्थ पवार यांच्या अडचणींत मोठी वाढ होण्याची शक्यता आहे. अंजली दमानिया व विजय कुंभार यांनी आज एका पत्रकार परिषदेला संबोधित केले. त्यात त्यांनी पार्थ पवार व शितल तेजवानी यांच्या पॉवर ऑफ अटॉर्नीचे दस्तऐवज उघड केले. प्रस्तुत दस्तऐवज या प्रकणातील एक संशयित दिग्विजय पाटील व शितल तेजवानी यांचे वकील तृप्ता ठाकूर यांनीच मिळवले आहेत. त्यांनी ती दमानिया यांना दिले आहेत. प्रस्तुत प्रकरणात पार्थ पवार यांचे नाव वारंवार समोर येत आहे. पण त्यानंतरही त्यांच्यावर कोणतीही थेट कारवाई होत नाही. उलट दिग्विजय पाटील व शितल तेजवानी यांनाच सातत्याने चौकशी व त्रासाला सामोरे जावे लागत आहे. यामुळे तृप्ता ठाकूर यांनी पार्थ पवारांविरोधातील दस्तऐवज समोर आणली आहेत, असे अंजली दमानिया यांनी सांगितले आहे. सर्व माहिती व दस्तऐवज पोलिसांकडे, पण कारवाई नाही – कुंभार विजय कुंभार यांनी यावेळी हे सर्व दस्तऐवज पूर्वीपासूनच पोलिसांकडे उपलब्ध असल्याचाही दावा केला. शितल तेजवानी यांनी 2021 मध्ये पॉवर ऑफ अटॉर्नीद्वारे सर्व व्यवहारांचे अधिकार दिले होते. या संदर्भातील सर्व माहिती व दस्तऐवज पूर्वीपासूनच पोलिसांकडे उपलब्ध आहेत. पण त्यानंतरही या प्रकरणी पार्थ पवारांवर कोणतीही कारवाई झाली नाही. यामुळे संशय बळावत आहे, असे ते म्हणालेत. मुख्यमंत्री, महसूल मंत्र्याचे पवारांना अभय अंजली दमानिया म्हणाल्या, प्रस्तुत प्रकरणात पार्थ पवारांच्या स्वाक्षरीचे पत्र आहे. पण पार्थ पवारांनी तेव्हा हे पत्र आपल्या स्वाक्षरीचे नसल्याचा दावा केला होता. 25 मे 2021 रोजी हा व्यवहार करून देण्यात आला. हे सर्व दस्तऐवज सरकार दरबारी जमा आहेत. मागील 5-6 वर्षांपासून हा घोटाळा सुरू आहे. अजित पवारांना हे सर्वकाही माहिती होते. मुख्यमंत्री व महसूल मंत्री या प्रकरणात त्यांना प्रोटेक्ट करत आहेत. प्रत्येक पानावर पार्थ पवारांची स्वाक्षरी मुंढवा भूखंड घोटाळ्यात पार्थ पवारांवरही गुन्हा दाखल व्हावा. पण राजकीय दबावामुळे त्यांच्यावर गुन्हा दाखल केला जात नाही. या पॉवर ऑफ अटॉर्नीवर पार्थ पवारांची प्रत्येक पानावर स्वाक्षरी आहे. त्यांचा फोटोही त्यावर आहे. यात उभयंतांत झालेले व्हॉट्सएप चॅटही आहे. संतोष हिंगणे व तृप्ता ठाकूर यांच्याही चॅटचा यात समावेश आहे. अजित पवारांचे पीए संतोष हिंगणे राम चौबे व वकील तृप्ता ठाकूर यांचेही यात चॅटिंग आहे. त्यानंतरही पार्थ पवारांना प्रोटेक्ट केले जात आहे. अजित पवारांचाही या प्रकरणी राजीनामा घेतला गेला पाहिजे. हा शितल तेजवानी व पार्थ पवार यांच्यात झालेला व्यवहार आहे. त्यात तीन-तीन ओएसडींचा समावेश आहे, असेही दमानिया यावेळी बोलताना म्हणाल्या.

ही बातमी शेअर करा
विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क, मारेगाव विदर्भातील घडामोडींपासून राज्य, देश आणि जगभरातील ताज्या, अचूक व विश्वासार्ह बातम्या सर्वात आधी आपल्या भेटीला. ब्रेकिंग न्यूज, राजकारण, गुन्हे, सामाजिक, कृषी, शिक्षण, क्रीडा, मनोरंजन आणि विशेष रिपोर्ट्स एका क्लिकवर. सत्याला आवाज देणारे, जनतेचा विश्वास जपणारे आपले हक्काचे न्यूज पोर्टल – विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क मारेगाव.
प्रतिक्रिया द्या
मारेगाव फ्लॅश व्हिडिओ पहा
रिफ्रेश करण्यासाठी खाली ओढा
💬 चॅटवर शेअर करा 📢 स्टेटसवर शेअर करा
📱 नेटिव्ह शेअर