ब्रेकिंग न्यूज
⚡ SIR Maharashtra: तुम्हाला निवडणूक आयोगाची SIR ची नोटीस आलीय? आता कुठेही धावपळ करायची गरज नाही; आला मोठा नि… ✦ ⚡ शिक्षणाचा खर्च भागवण्यासाठी घेतला शेतीचा निर्णय, श्रेयसने 5 गुंठ्यात केली कमाल, 2 लाख निव्वळ नफा ✦ ⚡ Premanand Maharaj : प्रेमानंद महाराजांच्या शिष्याच्या मृत्यू प्रकरणात ट्विस्ट! खोलीत संशयास्पद वस्तू, CCTV … ✦ ⚡ ५ हजार दिले तरी प्रोटीन दिले नाही, राग अनावर, थेट जीम ट्रेनरची हत्या, जालना हादरलं ✦ ⚡ Asian Games : बुटाचं सोल तुटलं तरीही पोरीनं पटकावलं मेडल; कोण आहे सीमा कुमारी? आईला न सांगताच जपानला पोहोचल… ✦ ⚡ महिन्याला दागिने खरेदी करायची अन् VIDEO बनवयायची, चोरट्यांनी Reel पाहून केलं भयानक काडं, नेमकं काय घडलं? ✦ ⚡ Mumbai Local: मुंबईकर गणेश विसर्जनाला बाहेर पडताय? चर्चगेट ते विरार धावणार जादा गाड्या, पण 84 लोकलचा ‘तो’ थ… ✦ ⚡ Crime : बापाला बायकोने जीवे मारलं, पण पोराला भलत्याच गोष्टीच दुःख, सूनबाई क्रिमिनल का बनली? ✦ ⚡ बाऊन्ड्री लाईनवर थरार, दोन बोटांनी घेतली कॅच, अख्खं स्टेडिअम उभं राहून पाहत राहिलं, VIDEO ✦ ⚡ महिला शेतकऱ्यांसाठी ऑनलाइन प्रमाणपत्र नोंदणी सुरू
SP News Maregaon

पुण्याच्या महापौर निवडीत आंदेकर सासू-सुनेची निर्णायक एंट्री?:कोल्हापूर कारागृहाला पत्र; 9 तारखेच्या सभेकडे शहराचं लक्ष

2 Views
🔊
बातमी ऐका (Marathi Voice Reader)


पुणे महानगरपालिकेतील महापौरपदाच्या निवडीसाठी आज उमेदवारी अर्ज भरले जाणार असून, 119 नगरसेवक निवडून आल्यामुळे भाजपचा महापौर होणार हे जवळपास निश्चित मानले जात आहे. मात्र ही निवड बिनविरोध व्हावी यासाठी भाजपकडून पडद्यामागे हालचाली सुरू असल्याची चर्चा आहे. त्याच अनुषंगाने राष्ट्रवादी काँग्रेससोबत संवाद साधला गेला असल्याची माहिती समोर येत आहे. पुणे महापालिकेत घड्याळ चिन्ह असलेला राष्ट्रवादी काँग्रेस हा दुसऱ्या क्रमांकाचा मोठा पक्ष ठरला असून, या पक्षाचे 27 नगरसेवक निवडून आले आहेत. तर शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे 3 नगरसेवक निवडून आले आहेत. या दोन्ही गटांतील नेते आज पुणे महापालिकेत भेटणार असून, महापौरपदासाठी भाजपच्या विरोधात उमेदवार द्यायचा की नाही, यावर अंतिम निर्णय घेतला जाणार असल्याची माहिती आहे. या पार्श्वभूमीवर आणखी एक महत्त्वाची घडामोड समोर आली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच्या नगरसेविका लक्ष्मी आंदेकर आणि सोनाली आंदेकर यांना महापौर व उपमहापौर निवडीसाठी होणाऱ्या पहिल्या सर्वसाधारण मुख्य सभेला उपस्थित राहण्यासाठी बोलावले जाणार आहे. नगरसचिवांकडून यासाठी कारागृह प्रशासनाला पत्र पाठवले जाणार असून, पुणे महानगरपालिकेकडून त्यासाठी पत्राचा मसुदा तयार करण्यात आला आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडूनही या दोघींना सभेस उपस्थित राहण्यासाठी स्वतंत्र पत्र देण्यात येणार आहे. 9 तारखेला होणाऱ्या सर्वसाधारण सभेत मतदानासाठी आंदेकर सासू-सुनेची उपस्थिती सुनिश्चित करण्यासाठी ही प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. लक्ष्मी आंदेकर आणि सोनाली आंदेकर या दोघी सध्या आयुष कोमकर खून प्रकरणात शिक्षा भोगत असून कोल्हापूर कारागृहात न्यायालयीन कोठडीत आहेत. याआधीही महत्त्वाच्या मतदान प्रक्रियेसाठी त्यांना तात्पुरत्या स्वरूपात बाहेर आणण्यात आले होते. त्यामुळे आता पुन्हा एकदा त्यांना सभेसाठी बोलावले जाणार असल्याची शक्यता वर्तवली जात आहे. या घडामोडीमुळे पुणे महानगरपालिकेच्या राजकारणात नवा कलाटणीकारक टप्पा निर्माण झाला आहे. विशेषतः महापौर आणि उपमहापौर निवडीच्या पार्श्वभूमीवर त्यांच्या उपस्थितीला निर्णायक महत्त्व प्राप्त होऊ शकते, अशी चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे. कारागृहाला आवश्यक पत्र पाठवण्याची तयारी 9 तारखेला होणाऱ्या पुणे महानगरपालिकेच्या पहिल्या सर्वसाधारण मुख्य सभेकडे आता संपूर्ण शहराचे लक्ष लागले आहे. या सभेत होणाऱ्या मतदानातून नेमकी सत्ता कुणाच्या बाजूने झुकते, याबाबत उत्सुकता शिगेला पोहोचली आहे. महापालिकेकडून कारागृहाला आवश्यक पत्र पाठवण्याची तयारी पूर्ण झाली असून, लवकरच ते कारागृह प्रशासनाकडे रवाना केले जाणार आहे. अशा परिस्थितीत राष्ट्रवादी काँग्रेसचा निर्णय, भाजपचे बिनविरोध प्रयत्न, आणि आंदेकर सासू-सुनेची संभाव्य उपस्थिती, या सर्व घटकांमुळे पुण्याच्या महापौर निवडीची प्रक्रिया अत्यंत नाट्यमय आणि चर्चेची ठरणार असल्याचे स्पष्ट दिसत आहे.

ही बातमी शेअर करा
विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क, मारेगाव विदर्भातील घडामोडींपासून राज्य, देश आणि जगभरातील ताज्या, अचूक व विश्वासार्ह बातम्या सर्वात आधी आपल्या भेटीला. ब्रेकिंग न्यूज, राजकारण, गुन्हे, सामाजिक, कृषी, शिक्षण, क्रीडा, मनोरंजन आणि विशेष रिपोर्ट्स एका क्लिकवर. सत्याला आवाज देणारे, जनतेचा विश्वास जपणारे आपले हक्काचे न्यूज पोर्टल – विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क मारेगाव.
प्रतिक्रिया द्या
⚡ मारेगाव फ्लॅश व्हिडिओ पहा
↓ रिफ्रेश करण्यासाठी खाली ओढा
💬 चॅटवर शेअर करा 📢 स्टेटसवर शेअर करा
📱 नेटिव्ह शेअर