Shopping Cart
Total:

$0.00

Items:

0

Your cart is empty
Keep Shopping

MRGS च्या कामात मोठा घोळ निधीचा अपव्यप , जबाबदार कोण …..

*का आली शेतकयावर विहीरी बुजविण्याची पाळी*


तालुका प्रतिनीधी :-झरी (जामणी) ज्ञानेश्वर आवारी
( 88059 79173)

सविस्तर वृत्त असे की…
झरी तालुक्यातील :- MRGS योजने अंतर्गत तालूक्यात अल्प व अत्यल्प भूधारक शेतकऱ्यांना सिंचन विहीरी, शेततळे, गुरांचा गोठा,लाभ देण्यात येतो. परतु ह्या विहिरी सिंचनासाठी काही उपयोगी होत नसल्याने तो निधी खर्च करून त्या विहीरी बुजाविण्यात आल्या आहेत.गेल्या 2 ते 3 वर्षा पूर्वी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेअंतर्गत बेरोजगारांना रोजगार व शेतकऱ्यांना सिंचन साधन उपलब्ध होण्याच्या उद्देश्याने ही योजना राबविण्यात आली.
ही योजना वैयक्तिक लाभाची आहे पण मजुराचा अभाव व आर्थिक परिस्थितीमुळे शेतकरी
स्वतः काम करू शकत नाही आणि केले तरी प्रशासकीय यंत्रणा त्याची जागो जागी अडवणूक करत असल्याचे अनुभव आहे.

प्रशासकीय यंत्रणेला हाताशी धरून रोजगार सेवक , ठेकेदार यांनी पोकलॅड मशिनच्या व्दारे खोदकाम करून मर्जितील मजूर कामावार दाखवून पैसे उचलेले व केवळ सहा व आठ एमएम तसेच कमी सळाखी , हलक्या प्रतिचे सिंमेट , नाल्याची माती मिश्रीत रेती चा वापर करून बांधकाम केले आहे.काँक्रिटची जाडी कमी असल्याने त्या विहीरी पहिल्याच पावसात खचल्या. संबधीत ठेकेदार व रोजगार सेवक व अधिकारी यांनी मिळून तीन लाख उचलून मोकळे झाले आहे .
प्रत्यक्षात काही शेतकरी सोडले तर 50% विहीरीचा शेतकऱ्यांना फायदा होताना दिसत नाही.35 फूट खोली 30 फूट गोलाई असतांना 30 फुट गोलाई आणि २५ फूट खोल करण्यात येत आहे. त्यामुळे पाण्याचा साठा होत नसून हिवाळ्यात सिंचन होत नाही . तर काही विहीरी कोरड्या होत आहे.

खोदकाम करताना पाणी न लागलेल्या कोरडया विहिरीचे बांधकाम करून पैसे उचलण्यात आले आहे.उलट अल्प भुधारक काही शेतकऱ्यांनी जागा गुंतल्याने विहिरी बुजविल्या आहे. त्यामुळे सात बारावर विहिर आहे मात्र प्रत्यक्षात शेतात विहीरी गायब झाल्या आहेत . शासनाचा उद्देश चांगला असला तरी मात्र भ्रष्ट प्रशासकीय यंत्रणेमुळे लाभार्थ्यांना फायदा होण्या ऐवजी ही यंत्रणा मालाल होतांना दिसत आहे .
या कामाची सखोल चौकाशी करण्याची मागणी जनसामान्यांकडून होत आहे.मागील महिन्यात
तालुक्यात MRGS च्या कामात मोठा गैरव्यवहार होत असल्याची तक्रार शिवसेनेचे तालुका प्रमुख चंद्रकांत घुगूल यांनी वरिष्ठांकडे केली होती..

Read Also:
0
Show Comments (0) Hide Comments (0)
0 0 votes
Article Rating
Subscribe
Notify of
guest
0 Comments
Oldest
Newest Most Voted
Inline Feedbacks
View all comments
Recent Posts:
error: Content is protected !!