ब्रेकिंग न्यूज
⚡ SIR Maharashtra: तुम्हाला निवडणूक आयोगाची SIR ची नोटीस आलीय? आता कुठेही धावपळ करायची गरज नाही; आला मोठा नि… ✦ ⚡ शिक्षणाचा खर्च भागवण्यासाठी घेतला शेतीचा निर्णय, श्रेयसने 5 गुंठ्यात केली कमाल, 2 लाख निव्वळ नफा ✦ ⚡ Premanand Maharaj : प्रेमानंद महाराजांच्या शिष्याच्या मृत्यू प्रकरणात ट्विस्ट! खोलीत संशयास्पद वस्तू, CCTV … ✦ ⚡ ५ हजार दिले तरी प्रोटीन दिले नाही, राग अनावर, थेट जीम ट्रेनरची हत्या, जालना हादरलं ✦ ⚡ Asian Games : बुटाचं सोल तुटलं तरीही पोरीनं पटकावलं मेडल; कोण आहे सीमा कुमारी? आईला न सांगताच जपानला पोहोचल… ✦ ⚡ महिन्याला दागिने खरेदी करायची अन् VIDEO बनवयायची, चोरट्यांनी Reel पाहून केलं भयानक काडं, नेमकं काय घडलं? ✦ ⚡ Mumbai Local: मुंबईकर गणेश विसर्जनाला बाहेर पडताय? चर्चगेट ते विरार धावणार जादा गाड्या, पण 84 लोकलचा ‘तो’ थ… ✦ ⚡ Crime : बापाला बायकोने जीवे मारलं, पण पोराला भलत्याच गोष्टीच दुःख, सूनबाई क्रिमिनल का बनली? ✦ ⚡ बाऊन्ड्री लाईनवर थरार, दोन बोटांनी घेतली कॅच, अख्खं स्टेडिअम उभं राहून पाहत राहिलं, VIDEO ✦ ⚡ महिला शेतकऱ्यांसाठी ऑनलाइन प्रमाणपत्र नोंदणी सुरू
SP News Maregaon

जि . प . उ . प्राथमिक शाळा जामणी येथील विद्यार्थ्यांचा मा.तहसिलदार यांच्या हस्ते सत्कार.

74 Views
🔊 बातमी ऐका (Marathi Voice Reader)

तालुका प्रतिनीधी :-झरी (जामनी) ज्ञानेश्वर आवारी
[88059 79173]

झरी पंचायत समिती अंतर्गत जिल्हा परिषदेची जामणी येथील शाळा विविध उपक्रमात नेहमी अग्रेसर असते .राष्ट्रीय कार्यक्रम असो अथवा विद्यार्थी गुणवत्ता किंवा शिक्षण विभाग अंतर्गत राबविल्या जाणाऱ्या विविध क्रीडा स्पर्धा .या सर्व बाबींमध्ये शाळेचा सक्रिय सहभाग असतो .स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव या अनुषंगाने जिल्हा परिषद शाळा जामणी येथे विविध स्पर्धेचे आयोजन करून विद्यार्थ्यांच्या कलागुणांना विकसित करण्यात आले.

या अमृत महोत्सवाअंतर्गत जिल्हा परिषदेच्या जामणी येथील शाळेत वक्तृत्व स्पर्धा, निबंध स्पर्धा, चित्रकला स्पर्धा, रांगोळी स्पर्धा व समूह नृत्य स्पर्धा इत्यादी स्पर्धांचे आयोजन करण्यात आले. केंद्र स्तरावरा नंतर झरी तहसिल चे तहसिलदार माननिय जोशी साहेब यांनी तहसील कार्यालय झरी येथे तालुका स्तरिय विविध स्पर्धांचे आयोजन केले.झालेल्या तालुकास्तरीय विविध स्पर्धांमध्ये येथील विद्यार्थ्यांचा प्रथम क्रमांक आला.

त्या अनुषंगाने तहसीलदार यांच्या हस्ते जिल्हा परिषदेचे जिल्हा परिषद जामणी येथील विद्यार्थ्यांना विविध पुरस्कार तसेच सन्मानचिन्ह देऊन सन्मानित करण्यात आले. त्याचप्रमाणे जिल्हा परिषद शाळेचे मुख्याध्यापक विनोद मडावी तसेच सहाय्यक शिक्षक देवराव मेश्राम तसेच सुवर्णा अक्कलवार यांचा सुद्धा सत्कार करण्यात आला.शाळेच्या विद्यार्थ्यांनी आदिवासी नृत्याचे अतिशय उत्कृष्ट सादरीकरण केले.नायब एम.एस.रामगुंडे नायब तहसिलदार ब्राम्हणवाडे यांच्या हस्ते विद्यार्थी शिक्षक तसेच शिक्षिका या सर्वांचा प्रशस्तीपत्र देऊन व सन्मानचिन्ह देऊन सत्कार करण्यात आला.

सदर कार्यक्रमाचे आयोजन जोशी साहेब तर नियोजन पंधरे साहेब यांनी केले.कार्यक्रमाचे सुत्रसंचलन विनोद मडावी तर आभार प्रदर्शन केमेकर सर ह्यांनी केले.सदर कार्यक्रमास शिक्षण विभागाच्या वतीने सर्व प्र.केंद्रप्रमुख व आपल्या विद्यार्थ्यांसह शिक्षक बांधव व तहसिल कार्यालयाचे कर्मचारी तसेच बहुसंख्य पालक व गावकरी उपस्थित होते.स्वा स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवाच्या उत्कृष्ट आयोजनाबाबत झरीचे पोलीस पाटील पुरुषोत्तम जीवतोडे व शिक्षण विभागाचे सर्व केंद्रप्रमुख यांच्या हस्ते सन्माननीय तहसीलदार यांचा सत्कार करण्यात आला.

ही बातमी शेअर करा
विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क, मारेगाव विदर्भातील घडामोडींपासून राज्य, देश आणि जगभरातील ताज्या, अचूक व विश्वासार्ह बातम्या सर्वात आधी आपल्या भेटीला. ब्रेकिंग न्यूज, राजकारण, गुन्हे, सामाजिक, कृषी, शिक्षण, क्रीडा, मनोरंजन आणि विशेष रिपोर्ट्स एका क्लिकवर. सत्याला आवाज देणारे, जनतेचा विश्वास जपणारे आपले हक्काचे न्यूज पोर्टल – विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क मारेगाव.
प्रतिक्रिया द्या
⚡ मारेगाव फ्लॅश व्हिडिओ पहा
↓ रिफ्रेश करण्यासाठी खाली ओढा
💬 चॅटवर शेअर करा 📢 स्टेटसवर शेअर करा
📱 नेटिव्ह शेअर