ब्रेकिंग न्यूज
⚡ ५ हजार दिले तरी प्रोटीन दिले नाही, राग अनावर, थेट जीम ट्रेनरची हत्या, जालना हादरलं ✦ ⚡ Asian Games : बुटाचं सोल तुटलं तरीही पोरीनं पटकावलं मेडल; कोण आहे सीमा कुमारी? आईला न सांगताच जपानला पोहोचल… ✦ ⚡ महिन्याला दागिने खरेदी करायची अन् VIDEO बनवयायची, चोरट्यांनी Reel पाहून केलं भयानक काडं, नेमकं काय घडलं? ✦ ⚡ Mumbai Local: मुंबईकर गणेश विसर्जनाला बाहेर पडताय? चर्चगेट ते विरार धावणार जादा गाड्या, पण 84 लोकलचा ‘तो’ थ… ✦ ⚡ Crime : बापाला बायकोने जीवे मारलं, पण पोराला भलत्याच गोष्टीच दुःख, सूनबाई क्रिमिनल का बनली? ✦ ⚡ बाऊन्ड्री लाईनवर थरार, दोन बोटांनी घेतली कॅच, अख्खं स्टेडिअम उभं राहून पाहत राहिलं, VIDEO ✦ ⚡ महिला शेतकऱ्यांसाठी ऑनलाइन प्रमाणपत्र नोंदणी सुरू ✦ ⚡ Woman Farmer: कारभारणीचा ‘महिला शेतकरी’ म्हणून भरा अर्ज, सरकारी योजनांचा मिळेल लाभ, कोणती लागेल कागदपत्रं? ✦ ⚡ विदर्भाच्या ‘समृद्धी’चा मार्ग मोकळा! 42 हजार कोटींचा प्लॅन, 3 नवे महामार्ग होणार, कुठून कुठं जाणार? ✦ ⚡ Vasai-Virar Mahapalika मध्ये कर्मचारी भरतीवरून राडा, भाजप आणि बविआ आमने-सामनेे
SP News Maregaon

पत्रकार संघटने तर्फे आयोजित मुकुटबन येथील नृत्य स्पर्धेत सुरज धनुषकार प्रथम तर मिताली पांडे द्वितीय 

78 Views
🔊 बातमी ऐका (Marathi Voice Reader)

ज्ञानेश्वर आवारी:-उपसंपादक झरी जामणी

झरी जामणी तालुका पत्रकार संघटनेच्या वतीने दरवर्षी प्रमाणे यावर्षी  १२  मे रोजी आदर्श हायस्कूल मुकुटबन येथील भव्य पटांगणात पंधरा वर्षे वरील युवक व युवतीसाठी खुली नृत्य स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते .या स्पर्धेत प्रथम पारितोषिक पटकाविण्याचा मान सुरज धनुषकार अमरावती तर ,मिताली पांडे वणी यांनी द्वितीय क्रमांकाचे पारितोषिक पटकाविले आहे.

याशिवाय तिसरे पारितोषिक ,द वाईब गृप पांढरकवडा,चौथे पारितोषिक विनीत गृप पांढरकवडा, पाचवे पारितोषिक भाग्यश्री झाडे ,सहावे पारितोषिक ओम भोयर या, स्पर्धकांना मिळाले असून याशिवाय प्रोत्साहन पर सुद्धा बक्षीस देण्यात आलेले होते. या  स्पर्धेत एकूण २५ स्पर्धकांनी भाग नोंदविला होता.

स्पर्धेचे नियम व अटी परीक्षक पवन धाबेकर,भारती सेंगर,शुभांगी खंडारे,यांनी व्यासपीठावरून सर्व स्पर्धकांना माहिती दिली त्यानंतर कार्यक्रमाला सुरुवात करण्यात आली कार्यक्रमाचे अध्यक्ष मुकुटबन ग्रामपंचायतचे सरपंच मीना आरमुरवार, उद्घाटक प्रकाश ,मॅकलवार तर प्रमुख पाहुणे म्हणून मध्यवर्ती बँकेची विभागीय अध्यक्ष राजीव एलटीवार सामाजिक कार्यकर्ते सुनील ढाले मुकुटबन ग्रामपंचायत चे सचिव पोतरेड्डी बद्दमवार,

संघटनेचे  अध्यक्ष संजय निंदेकर उपाध्यक्ष बंडु भाऊ सोयाम, सचिव ज्ञानेश्वर आवारी,रमेश  अंगलवार,विजय  मेंगणवार, प्रा डॉ.विठ्ठल पाईलवार,नागेश अक्केवार,अनिल कुंटावार  निलेश भोयर यांची उपस्थिती होती.कार्यक्रमाचे प्रास्ताविक संजय निंदेकर यांनी केले तर सुत्र संचालन संजय आकीनवार यांनी केले.खराब हवामान असतानाही स्पर्धकांचा उत्साह व प्रेक्षेकांचा उत्स्फूर्तप्रतिसाद पाहायला मिळाला

ही बातमी शेअर करा
विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क, मारेगाव विदर्भातील घडामोडींपासून राज्य, देश आणि जगभरातील ताज्या, अचूक व विश्वासार्ह बातम्या सर्वात आधी आपल्या भेटीला. ब्रेकिंग न्यूज, राजकारण, गुन्हे, सामाजिक, कृषी, शिक्षण, क्रीडा, मनोरंजन आणि विशेष रिपोर्ट्स एका क्लिकवर. सत्याला आवाज देणारे, जनतेचा विश्वास जपणारे आपले हक्काचे न्यूज पोर्टल – विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क मारेगाव.
प्रतिक्रिया द्या
⚡ मारेगाव फ्लॅश व्हिडिओ पहा
↓ रिफ्रेश करण्यासाठी खाली ओढा
💬 चॅटवर शेअर करा 📢 स्टेटसवर शेअर करा
📱 नेटिव्ह शेअर