ब्रेकिंग न्यूज
⚡ SIR Maharashtra: तुम्हाला निवडणूक आयोगाची SIR ची नोटीस आलीय? आता कुठेही धावपळ करायची गरज नाही; आला मोठा नि… ✦ ⚡ शिक्षणाचा खर्च भागवण्यासाठी घेतला शेतीचा निर्णय, श्रेयसने 5 गुंठ्यात केली कमाल, 2 लाख निव्वळ नफा ✦ ⚡ Premanand Maharaj : प्रेमानंद महाराजांच्या शिष्याच्या मृत्यू प्रकरणात ट्विस्ट! खोलीत संशयास्पद वस्तू, CCTV … ✦ ⚡ ५ हजार दिले तरी प्रोटीन दिले नाही, राग अनावर, थेट जीम ट्रेनरची हत्या, जालना हादरलं ✦ ⚡ Asian Games : बुटाचं सोल तुटलं तरीही पोरीनं पटकावलं मेडल; कोण आहे सीमा कुमारी? आईला न सांगताच जपानला पोहोचल… ✦ ⚡ महिन्याला दागिने खरेदी करायची अन् VIDEO बनवयायची, चोरट्यांनी Reel पाहून केलं भयानक काडं, नेमकं काय घडलं? ✦ ⚡ Mumbai Local: मुंबईकर गणेश विसर्जनाला बाहेर पडताय? चर्चगेट ते विरार धावणार जादा गाड्या, पण 84 लोकलचा ‘तो’ थ… ✦ ⚡ Crime : बापाला बायकोने जीवे मारलं, पण पोराला भलत्याच गोष्टीच दुःख, सूनबाई क्रिमिनल का बनली? ✦ ⚡ बाऊन्ड्री लाईनवर थरार, दोन बोटांनी घेतली कॅच, अख्खं स्टेडिअम उभं राहून पाहत राहिलं, VIDEO ✦ ⚡ महिला शेतकऱ्यांसाठी ऑनलाइन प्रमाणपत्र नोंदणी सुरू
SP News Maregaon

पवणार येथिल दुभती म्हैस    वाघाच्या हल्ल्यात ठार

141 Views
🔊 बातमी ऐका (Marathi Voice Reader)

१ लाखाचे शेतकऱ्यांचे नुकसान.

तालुक्यात वाघाची दहशत.

तालुका प्रतिनीधी :-झरी (जामणी) ज्ञानेश्वर आवारी
   [88059 79173]

झरी जामणी  उन्हाळ्यात शेवटचा महिना चालू असून जंगलातील नाल्या मधील पाणी सुकून गेल्याने पाण्याची भटकंती करत वाघासह इतर वन्य प्राणी पाण्याचा शोधत गावाच्या दिशेला येणे सुरु झाले. संबंधित विभागाने कृत्रिम पाणवठे तयार केले पण तेही कागदावरच दिसत असल्याचे नागरिकांकडून बोलल्या जात आहे. या परिसरातल वनविभाग दुर्लक्ष करत असल्याचे शेतकरी व जनतेमध्ये नाराजी व्यक्त केली जात आहेत.

दिनांक ०२/०६/२०२२ रोजी पवणार येथे वाघाने दुधाळ मैसीची शिकार केल्याची घटना घडली. याबाबत सविस्तर वृत्त असे कि,येथील शेतकरी सूर्यकांत मिलमीले यांचेकडे बैलजोडी,गायी व एक मुर्रा जातीची मैस अशे पशुधन आहेत.त्यांचे शेती पवणार तलावाच्या बाजूलाच असल्याने मैस सायंकाळी मिलमीले यांची नजर चुकवून तलावाच्या दिशेने गेली परंतु रात्री घराकडे वापस न आल्यामुळे मिलमीले यांनी शोधाशोध घेतली परंतु खुप शोधूनही त्यांना मैस मिळाली नाही.

सकाळी जेव्हा ते परत शोध घ्यायला गेले असता म्हैस मृत अवस्थेत आढळली, व म्हैसीच्या मागचा भाग वाघाने पूर्णपणे खाल्ला होता. या घटनेची माहिती वनविभागाच्या अधिकाऱ्यांना दिल्यानंतर त्यांची टीम घटनास्थलावर हजर झाली.पंचनामा करण्यात आला असून त्या ठिकाणी cc tv कॅमेरा लावण्यात आला आहे.तसेच याच ठिकाणावर दोन् दिवसापूर्वी पवणार येथील शेतकऱ्यांच्या म्हैसीच्या पिल्लाला वाघाने ठार केले.

सतत होत असलेल्या वाघाच्या हल्ल्यामुळे परिसरातील शेतकरी शेतमजूर यांच्या मध्ये दहशत निर्माण झाली आहे.आता खरीप हंगाम तोंडावर आला असल्यामुळे शेतीचे कामे कसे करावे हा प्रश्न शेतकऱ्या समोर उभा आहे.तरी वनविभागाने वाघाचा बंदोबस्त करावा अशी मागणी परिसरात होत आहेत.

ही बातमी शेअर करा
विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क, मारेगाव विदर्भातील घडामोडींपासून राज्य, देश आणि जगभरातील ताज्या, अचूक व विश्वासार्ह बातम्या सर्वात आधी आपल्या भेटीला. ब्रेकिंग न्यूज, राजकारण, गुन्हे, सामाजिक, कृषी, शिक्षण, क्रीडा, मनोरंजन आणि विशेष रिपोर्ट्स एका क्लिकवर. सत्याला आवाज देणारे, जनतेचा विश्वास जपणारे आपले हक्काचे न्यूज पोर्टल – विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क मारेगाव.
प्रतिक्रिया द्या
⚡ मारेगाव फ्लॅश व्हिडिओ पहा
↓ रिफ्रेश करण्यासाठी खाली ओढा
💬 चॅटवर शेअर करा 📢 स्टेटसवर शेअर करा
📱 नेटिव्ह शेअर