ब्रेकिंग न्यूज
⚡ SIR Maharashtra: तुम्हाला निवडणूक आयोगाची SIR ची नोटीस आलीय? आता कुठेही धावपळ करायची गरज नाही; आला मोठा नि… ✦ ⚡ शिक्षणाचा खर्च भागवण्यासाठी घेतला शेतीचा निर्णय, श्रेयसने 5 गुंठ्यात केली कमाल, 2 लाख निव्वळ नफा ✦ ⚡ Premanand Maharaj : प्रेमानंद महाराजांच्या शिष्याच्या मृत्यू प्रकरणात ट्विस्ट! खोलीत संशयास्पद वस्तू, CCTV … ✦ ⚡ ५ हजार दिले तरी प्रोटीन दिले नाही, राग अनावर, थेट जीम ट्रेनरची हत्या, जालना हादरलं ✦ ⚡ Asian Games : बुटाचं सोल तुटलं तरीही पोरीनं पटकावलं मेडल; कोण आहे सीमा कुमारी? आईला न सांगताच जपानला पोहोचल… ✦ ⚡ महिन्याला दागिने खरेदी करायची अन् VIDEO बनवयायची, चोरट्यांनी Reel पाहून केलं भयानक काडं, नेमकं काय घडलं? ✦ ⚡ Mumbai Local: मुंबईकर गणेश विसर्जनाला बाहेर पडताय? चर्चगेट ते विरार धावणार जादा गाड्या, पण 84 लोकलचा ‘तो’ थ… ✦ ⚡ Crime : बापाला बायकोने जीवे मारलं, पण पोराला भलत्याच गोष्टीच दुःख, सूनबाई क्रिमिनल का बनली? ✦ ⚡ बाऊन्ड्री लाईनवर थरार, दोन बोटांनी घेतली कॅच, अख्खं स्टेडिअम उभं राहून पाहत राहिलं, VIDEO ✦ ⚡ महिला शेतकऱ्यांसाठी ऑनलाइन प्रमाणपत्र नोंदणी सुरू
SP News Maregaon

क्रांतीसुर्य बिरसा मुंडा जयंती च्या पर्वावर

96 Views
🔊 बातमी ऐका (Marathi Voice Reader)

उपविभागीय कृषी अधिकाऱ्यांनी यांनी साधला आदिवासी शेतकऱ्यांशी संवाद.

तालुका प्रतिनीधी :-झरी (जामनी) ज्ञानेश्वर आवारी
[88059 79173]

झरी जामणी महाराष्ट्र शासन कृषी विभागाच्या वतीने ‘” माझा एक दिवस माझ्या बळीराज्यासाठी “‘ या उपक्रमांतर्गत तालुक्यातील सूर्ला या गावात १६ नोव्हेंबर रोजी उपविभागीय कृषी अधिकारी, पांढरकवडा जगन राठोड यांनी भेट दिली. यावेळी क्रांतीसुर्य बिरसा मुंडा जयंती निमित्ताने प्रतिमेचे पूजन करून कार्यक्रमास सुरूवात करण्यात आली.

दिवाकर कुडमेथे यांनी शेतीला बांध बंधिस्ती करणे संदर्भात समस्या मांडल्या,सुमित आत्राम यांनी पेंढारी लघुसिंचन प्रकल्पा अंतर्गत कॅनॉल चे पाणी सोडणे साठी मागणी केली.शेतकऱ्यांना भेडसावणाऱ्या समस्यांबाबत चर्चा करून रासायनिक कीटकनाशके फवारणी करताना विषबाधा होऊ नये याबाबत प्रतिबंधात्मक उपाय व प्रथमोपचार करणे , फळपीक लागवड व त्याचे व्यवस्थापन , प्रधानमंत्री पीक विमा योजना , महाडीबीटी योजनेतून लाभ घेण्याचे आव्हान करण्यात आले,

pmfme योजने अंतर्गत शेतीशी निगडित उद्योग उभारणे,पीएम किसान , ई – केवायसी प्रत्यक्षात कॅम्प लावून करण्यात आले. लिंकिंग खत पुरवठा आढळल्यास तक्रार करण्याचे आव्हान राठोड साहेबांनी केले व ई – पीक पाहणीबाबत सविस्तर मार्गदर्शन करून समाधान व्यक्त करण्यात आले.तसेच राज्य पुरस्कृत एकात्मिक कापूस उत्पादकता वाढ व मुल्य साखळी प्रकल्प अंतर्गत निविष्ठा कृषी अधिकारी राठोड साहेबांचा हस्ते वाटप करण्यात आले.त्यानंतर बीज प्रक्रिया मोहीम राबवून शेतकऱ्याना बीज प्रक्रिये चे महत्व विषद करण्यात आले.

गावालगत चा वनराई बंधारा ची पाहणी करून पूजन करण्यात आले. त्यानंतर उपस्थित सर्व शेतकऱ्यांना आत्महत्या न करण्याबाबत प्रतिज्ञा देऊन कार्यक्रमाची सांगता केली . प्रास्ताविक तालुका कृषी अधिकारि (झरी) ए.एस.आमले यांनी केले झरी तालुक्यात वनराई बंधारे बांधण्याची मोहीम तसेच हरभरा बीज प्रक्रिया राबवण्याची मोहीम हाती घेण्यात आल्याचे सांगितले,मनोज कोरांगे कृषी सहाय्यक सुरला यांनी आभार व्यक्त केले.

यावेळी ,सरपंच सौ.उषा दिवाकर कुडमेथे, उपसरपंच चंद्रशेखर मेश्राम, पोलिस पाटील भारत येडमे मंडळ अधिकारी हटवार साहेब,कृषी पर्यवेक्षक किनाके , फुलझले,कृषी सहाय्यक दिलीप पोळ ,सुधीर मोघे ,मेश्राम ,राजू कुडमेथे ,नरेश संदुलवार , वैजनाथ बेरलीकर ,मनोज जाधव (आत्मा), प्राची उईके ,नम्रता कुमरे ,तसेच कृषी विभागाचे सर्व क्षेत्रीय अधिकारी व कर्मचारी तसेच शेतकरी व महिलांची उपस्थिती होती .

ही बातमी शेअर करा
विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क, मारेगाव विदर्भातील घडामोडींपासून राज्य, देश आणि जगभरातील ताज्या, अचूक व विश्वासार्ह बातम्या सर्वात आधी आपल्या भेटीला. ब्रेकिंग न्यूज, राजकारण, गुन्हे, सामाजिक, कृषी, शिक्षण, क्रीडा, मनोरंजन आणि विशेष रिपोर्ट्स एका क्लिकवर. सत्याला आवाज देणारे, जनतेचा विश्वास जपणारे आपले हक्काचे न्यूज पोर्टल – विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क मारेगाव.
प्रतिक्रिया द्या
⚡ मारेगाव फ्लॅश व्हिडिओ पहा
↓ रिफ्रेश करण्यासाठी खाली ओढा
💬 चॅटवर शेअर करा 📢 स्टेटसवर शेअर करा
📱 नेटिव्ह शेअर