ब्रेकिंग न्यूज
⚡ Mumbai Local: मुंबईकर गणेश विसर्जनाला बाहेर पडताय? चर्चगेट ते विरार धावणार जादा गाड्या, पण 84 लोकलचा ‘तो’ थ… ✦ ⚡ Crime : बापाला बायकोने जीवे मारलं, पण पोराला भलत्याच गोष्टीच दुःख, सूनबाई क्रिमिनल का बनली? ✦ ⚡ बाऊन्ड्री लाईनवर थरार, दोन बोटांनी घेतली कॅच, अख्खं स्टेडिअम उभं राहून पाहत राहिलं, VIDEO ✦ ⚡ महिला शेतकऱ्यांसाठी ऑनलाइन प्रमाणपत्र नोंदणी सुरू ✦ ⚡ Woman Farmer: कारभारणीचा ‘महिला शेतकरी’ म्हणून भरा अर्ज, सरकारी योजनांचा मिळेल लाभ, कोणती लागेल कागदपत्रं? ✦ ⚡ विदर्भाच्या ‘समृद्धी’चा मार्ग मोकळा! 42 हजार कोटींचा प्लॅन, 3 नवे महामार्ग होणार, कुठून कुठं जाणार? ✦ ⚡ Vasai-Virar Mahapalika मध्ये कर्मचारी भरतीवरून राडा, भाजप आणि बविआ आमने-सामनेे ✦ ⚡ एक शेळीपासून सुरू केलेला व्यवसाय, आता 40 शेळ्यांचा मालक, सिद्धेश्वर यांचा वर्षाचा कमाईचा आकडा पाहाच! ✦ ⚡ गौरीपूजनाला गावी गेले, छ. संभाजीनगरात 4 घरं फोडली; लाखोंची लूट, पण 4 तोळ्यांचा हार तिथंच फेकला, शॉकिंग कारण… ✦ ⚡ Superfast 100 News | सुपरफास्ट बातम्या | 23 September | Sunil Shelke News | SIM Cars News | Fadnavis
SP News Maregaon


घराला आग लागल्याने घरातील साहित्य जळून खाक
अर्थिक नुकसान,म्हैसदोडका येथील घटना.

115 Views
🔊 बातमी ऐका (Marathi Voice Reader)

मारेगाव तालुका प्रतिनीधी..
सुरेश पाचभाई  [ 992286218]

सविस्तर वृत्त असे की..
मारेगाव तालुक्यातील म्हैसदोडका येथे दिनांक 28 मार्च रोजी दुपारी 12 सुमारास राहत्या घराला आग लागून घरातली वस्तु आगीने जळुण खाक झाल्याची घटना घडली असुन यात मोठे आर्थिक नुकसान झाले आहे. 28 मार्च रोजी विमल चंद्रभान आत्राम म्हैसदोडका, या महिलेने देवपूजा करताना देवघरात दिवा लावला आणि  देव पूजा झाल्यानंतर ती दुसऱ्या कामाला लागली.याच वेळी उंदराने पेटती वात पळवली आणि घराला आग लागली.त्यावेळी कुटुंबातील कोणीही घरी उपस्थित नव्हते.



घरातून आगीचा धूर निघत असल्याने शेजाऱ्यांच्या लक्षात आले त्यांनी आरडा ओरडा केला.आणि गावातील काही नागरिकांच्या मदतीने मिळेल त्या वस्तूने पाणी टाकून आग विझवली. पण तो पर्यंत घरातील जीवनावश्यक वस्तू, कपडे, मुलांचे शाळेचे कागदपत्रे जळुन खाक झाल्याने प्रचंड आर्थिक नुकसान झाले आहे. मात्र आगीत कोणतीही जीवित हानी झाली नाही.
  या आगीची माहिती महसूल विभागाला लेखी स्वरूपात दिली असून महसूल विभागाचे वतीने आगीच्या नुकसानीचा तपास सुरू आहे.

ही बातमी शेअर करा
विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क, मारेगाव विदर्भातील घडामोडींपासून राज्य, देश आणि जगभरातील ताज्या, अचूक व विश्वासार्ह बातम्या सर्वात आधी आपल्या भेटीला. ब्रेकिंग न्यूज, राजकारण, गुन्हे, सामाजिक, कृषी, शिक्षण, क्रीडा, मनोरंजन आणि विशेष रिपोर्ट्स एका क्लिकवर. सत्याला आवाज देणारे, जनतेचा विश्वास जपणारे आपले हक्काचे न्यूज पोर्टल – विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क मारेगाव.
प्रतिक्रिया द्या
⚡ मारेगाव फ्लॅश व्हिडिओ पहा
↓ रिफ्रेश करण्यासाठी खाली ओढा
💬 चॅटवर शेअर करा 📢 स्टेटसवर शेअर करा
📱 नेटिव्ह शेअर