ब्रेकिंग न्यूज
⚡ Pune News: फटाक्यांवरून मध्यरात्री पुण्यात राडा, वडिलांना वाचवायला गेलेल्या लेकीसोबतच भयंकर घडलं, क्षणात रक… ✦ ⚡ Kalyan News: “माझा हिस्सा कुठे आहे?” म्हणत घरात घुसला धाकटा लेक, बाप आणि भावासोबत केलं भयंकर; टिटवाळा हादरल… ✦ ⚡ कटिंग चहा देखील महाग होणार! मदर डेअरीपाठोपाठ 2 कंपन्यांनी वाढवले दुधाचे दर, नवे दर आजपासून लागू ✦ ⚡ Cricket Rule : ना कॅच, ना रन आऊट, ना बोल्ड… अंपायरने भलत्याच कारणासाठी दिलं आऊट, क्रिकेटमधली सगळ्यात विचि… ✦ ⚡ Supriya Sule: “तुझ्याशिवायची पहिली भाऊबीज…” अजितदादांच्या आठवणीत सुप्रिया सुळेंची भावूक पोस्ट, ”आम्हा बह… ✦ ⚡ CRIME : आईने पोटच्या 24 वर्षाच्या पोराला संपवलं, कोल्ड ड्रिंकमधून झोपेच्या गोळ्या दिल्या अन्… एका गोष्टीस… ✦ ⚡ Nagpur Crime : दोन महिन्यापूर्वी लग्न, दिवाळीला घरी आले; फराळ झाला अन् शिक्षक दामपत्याने घराच्या गॅलरीतच सं… ✦ ⚡ पांडवदेवीच्या पावन भूमीत आज गोवर्धन यात्रेचा भक्तीमय जयघोष! ✦ ⚡ दुष्काळामुळे मेंढपाळ व्यवसाय आर्थिक संकटात, अचानक घसरले दर, सोलापूरमधील भीषण वास्तव, Video ✦ ⚡ CRIME : ब्लँकेटमध्ये गुंडाळून उजनी धरणात फेकलं, विवाहित महिलेच्या हत्येचं गुढ अखेर उकललं! पोलिसांनी 2 तासात…
SP News Maregaon

‘एमएसएफडीए’च्या सुधारित संकेतस्थळाचे मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते लोकार्पण:संकेतस्थळाचा नियमित वापर करण्याचे आवाहन

1 View
🔊
बातमी ऐका (Marathi Voice Reader)


राज्यातील उच्च शिक्षण क्षेत्राच्या सर्वांगीण विकासाच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण पाऊल उचलत महाराष्ट्र राज्य अध्यापक विकास संस्था (एमएसएफडीए) च्या नवीन सुधारित संकेतस्थळाचे लोकार्पण उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. पुणे येथे आयोजित कार्यक्रमास उच्च व तंत्र शिक्षण विभागाचे अपर मुख्य सचिव बी. वेणुगोपाल रेड्डी, उच्च शिक्षण विभागाचे संचालक तथा एमएसएफडीएचे कार्यकारी संचालक डॉ. शैलेंद्र देवळाणकर, तंत्र शिक्षण संचालक डॉ. विनोद मोहितकर, मुंबई विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. रवींद्र कुलकर्णी तसेच उच्च व तंत्र शिक्षण विभाग आणि एमएसएफडीएचे अधिकारी उपस्थित होते. मंत्री पाटील म्हणाले की, एमएसएफडीए ही संस्था राज्यातील उच्च शिक्षण क्षेत्रातील अध्यापक आणि शैक्षणिक नेतृत्व यांच्या सक्षमीकरणासाठी सातत्याने कार्यरत असून, गुणवत्ता वृद्धी, क्षमता विकास आणि शैक्षणिक उत्कृष्टतेसाठी विविध प्रशिक्षण उपक्रम राबवत आहे. राज्यातील महाविद्यालये आणि विद्यापीठांमध्ये आधुनिक अध्यापन पद्धती, डिजिटल तंत्रज्ञानाचा वापर आणि बहुविद्याशाखीय दृष्टीकोन रुजविण्यासाठी एमएसएफडीए महत्त्वपूर्ण भूमिका बजावत आहे. www.msfda.ac.in⁠ या संकेतस्थळाद्वारे एमएसएफडीए च्या सर्व प्रशिक्षण कार्यक्रमांसाठी नोंदणी प्रक्रिया पूर्णपणे ऑनलाइन करण्यात आली आहे. संबंधितांना स्वतःची प्रोफाइल तयार करून प्रशिक्षण कार्यक्रमांसाठी थेट नोंदणी करता येणार असून, कार्यक्रमांचे वेळापत्रक, अभ्यासक्रम, सूचना आणि शैक्षणिक संसाधने एकाच व्यासपीठावर उपलब्ध होणार आहेत. त्यामुळे नोंदणी प्रक्रिया अधिक सुलभ, पारदर्शक आणि वेगवान होणार असल्याचे मंत्री पाटील यांनी सांगितले. प्रशिक्षण पूर्ण केलेल्या सहभागींसाठी प्रमाणपत्र देण्याची सुविधा डिजिटल स्वरूपात उपलब्ध करून देण्यात आली असून, त्यामुळे व्यवस्थापन अधिक सुलभ झाले आहे. तसेच विविध संस्थांबरोबर सामंजस्य करार (MoU) करून प्रशिक्षण कार्यक्रमांची गुणवत्ता आणि व्याप्ती वाढविण्यावर एमएसएफडीए भर असणार आहे. उद्योग, शैक्षणिक संस्था आणि तज्ज्ञ यांच्यात समन्वय साधून अधिक परिणामकारक प्रशिक्षण उपलब्ध करून देण्यासाठी विविध सहकार्य उपक्रम राबविण्यात येत आहेत. हे संकेतस्थळ राष्ट्रीय शैक्षणिक धोरण 2020 (NEP 2020) च्या उद्दिष्टांशी सुसंगत असून, सतत व्यावसायिक विकास, डिजिटल शिक्षण आणि शैक्षणिक प्रशासन यांना चालना देणारे ठरणार आहे. संकेतस्थळाचा नियमित आणि सक्रिय वापर करण्याचे आवाहन राष्ट्रीय शैक्षणिक धोरणांतर्गत शैक्षणिक सक्षमीकरण आणि संस्थात्मक परिवर्तनासाठी एमएसएफडीए ची भूमिका अधिक बळकट होणार असल्याचा विश्वासही मंत्री पाटील यांनी व्यक्त केला. यापुढे एमएसएफडीए चे सर्व प्रशिक्षण कार्यक्रमांसाठी नोंदणी www.msfda.ac.in⁠ या संकेतस्थळाद्वारेच करण्यात येणार असून, राज्यातील सर्व संबंधित घटकांनी संकेतस्थळाचा नियमित आणि सक्रिय वापर करावा, असे आवाहन यावेळी करण्यात आले.

ही बातमी शेअर करा
विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क, मारेगाव विदर्भातील घडामोडींपासून राज्य, देश आणि जगभरातील ताज्या, अचूक व विश्वासार्ह बातम्या सर्वात आधी आपल्या भेटीला. ब्रेकिंग न्यूज, राजकारण, गुन्हे, सामाजिक, कृषी, शिक्षण, क्रीडा, मनोरंजन आणि विशेष रिपोर्ट्स एका क्लिकवर. सत्याला आवाज देणारे, जनतेचा विश्वास जपणारे आपले हक्काचे न्यूज पोर्टल – विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क मारेगाव.
प्रतिक्रिया द्या
⚡ मारेगाव फ्लॅश व्हिडिओ पहा
↓ रिफ्रेश करण्यासाठी खाली ओढा
💬 चॅटवर शेअर करा 📢 स्टेटसवर शेअर करा
📱 नेटिव्ह शेअर