ब्रेकिंग न्यूज
⚡ Mumbai Local: मुंबईकर गणेश विसर्जनाला बाहेर पडताय? चर्चगेट ते विरार धावणार जादा गाड्या, पण 84 लोकलचा ‘तो’ थ… ✦ ⚡ Crime : बापाला बायकोने जीवे मारलं, पण पोराला भलत्याच गोष्टीच दुःख, सूनबाई क्रिमिनल का बनली? ✦ ⚡ बाऊन्ड्री लाईनवर थरार, दोन बोटांनी घेतली कॅच, अख्खं स्टेडिअम उभं राहून पाहत राहिलं, VIDEO ✦ ⚡ महिला शेतकऱ्यांसाठी ऑनलाइन प्रमाणपत्र नोंदणी सुरू ✦ ⚡ Woman Farmer: कारभारणीचा ‘महिला शेतकरी’ म्हणून भरा अर्ज, सरकारी योजनांचा मिळेल लाभ, कोणती लागेल कागदपत्रं? ✦ ⚡ विदर्भाच्या ‘समृद्धी’चा मार्ग मोकळा! 42 हजार कोटींचा प्लॅन, 3 नवे महामार्ग होणार, कुठून कुठं जाणार? ✦ ⚡ Vasai-Virar Mahapalika मध्ये कर्मचारी भरतीवरून राडा, भाजप आणि बविआ आमने-सामनेे ✦ ⚡ एक शेळीपासून सुरू केलेला व्यवसाय, आता 40 शेळ्यांचा मालक, सिद्धेश्वर यांचा वर्षाचा कमाईचा आकडा पाहाच! ✦ ⚡ गौरीपूजनाला गावी गेले, छ. संभाजीनगरात 4 घरं फोडली; लाखोंची लूट, पण 4 तोळ्यांचा हार तिथंच फेकला, शॉकिंग कारण… ✦ ⚡ Superfast 100 News | सुपरफास्ट बातम्या | 23 September | Sunil Shelke News | SIM Cars News | Fadnavis
SP News Maregaon


पत्रकार जब्बार चिनी यांना मूकनायक पत्रकारिता पुरस्कार जाहीर…

75 Views
🔊 बातमी ऐका (Marathi Voice Reader)

कन्हैया कुमार यांच्या हस्ते समता पर्व येथे पुरस्कार प्रदान…

वणी :- शहरातील सुपरिचित व ज्येष्ठ पत्रकार जब्बार चीनी यांना प्रतिष्ठीत ‘मूकनायक’ पत्रकारिता पुरस्कार जाहीर झाला आहे.
दिनांक 10 एप्रिल रोजी यवतमाळ येथील समता पर्वात डॉ. कन्हैया कुमार यांच्या हस्ते त्यांना हा पुरस्कार प्रदान केला जाणार आहे. विविध सामाजिक विषय, दीन-दुबळे, दलित, कष्टकरी, श्रमिक, शेतकरी इत्यादी तळागाळातील लोकांच्या प्रश्नांना त्यांनी पत्रकारितेच्या माध्यमातून वाचा फोडली. पत्रकारिता क्षेत्रातील या कार्याबद्दल त्यांचा समतापर्व प्रतिष्ठाण तर्फे ‘मूकनायक’ पत्रकारिता पुरस्कार देऊन सन्मान करण्यात येणार आहे.
समता पर्व प्रतिष्ठान द्वारा दरवर्षी यवतमाळ येथे समता पर्व या भव्य दिव्य कार्यक्रमाचे आयोजन केले जाते. विविध वैचारिक तसेच सांस्कृतिक कार्यक्रमाची इथे मोठ्या प्रमाणात रेलचेल असते. याच सोहळ्यात दरवर्षी शोषित, पिडीत घटकांच्या विविध प्रश्नांवर उल्लेखनीय कार्य करणा-या पत्रकारांना ‘मूकनायक’ हा पुरस्कार दिला जातो. यावर्षीचा ‘मूकनायक’ पत्रकारिता पुरस्कार हा वणीतील ज्येष्ठ पत्रकार जब्बार चीनी यांना जाहीर झाला आहे.
सदर पुरस्काराचे वितरण रविवारी दिनांक 10 एप्रिल 2022 रोजी समता मैदान यवतमाळ येथे होणार असून डॉ. कन्हैयाकुमार, नवी दिल्ली यांच्या हस्ते सदर पुरस्कार प्रदान केला जाणार आहे. सर्वसामान्यांचे प्रश्न उचलणा-या पत्रकाराला पुरस्कार मिळाल्याने परिसरात समाधान व्यक्त केले जात आहे. या पुरस्काराबद्दल यवतमाळ जिल्हा पत्रकार संघातर्फे त्यांचे अभिनंदन करण्यात आले आहे.

जब्बार चीनी यांनी 1994 साली पत्रकारिता क्षेत्रात पाऊल टाकले. सलग 28 वर्षांपासून ते या क्षेत्रात कार्यरत आहेत. वणी व परिसरातील विविध प्रश्न व समस्यांना त्यांनी आपल्या पत्रकारितेतून वाचा फोडली आहे. कोरोना काळात त्यांनी श्रमिक, शोषित घटकांच्या विविध प्रश्नांवर वृत्तमाला केली होती. या आधीही त्यांना शोध पत्रकारितेसाठी सलग तीन वर्ष पुरस्कार मिळाला आहे.

ही बातमी शेअर करा
विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क, मारेगाव विदर्भातील घडामोडींपासून राज्य, देश आणि जगभरातील ताज्या, अचूक व विश्वासार्ह बातम्या सर्वात आधी आपल्या भेटीला. ब्रेकिंग न्यूज, राजकारण, गुन्हे, सामाजिक, कृषी, शिक्षण, क्रीडा, मनोरंजन आणि विशेष रिपोर्ट्स एका क्लिकवर. सत्याला आवाज देणारे, जनतेचा विश्वास जपणारे आपले हक्काचे न्यूज पोर्टल – विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क मारेगाव.
प्रतिक्रिया द्या
⚡ मारेगाव फ्लॅश व्हिडिओ पहा
↓ रिफ्रेश करण्यासाठी खाली ओढा
💬 चॅटवर शेअर करा 📢 स्टेटसवर शेअर करा
📱 नेटिव्ह शेअर