ब्रेकिंग न्यूज
⚡ SIR Maharashtra: तुम्हाला निवडणूक आयोगाची SIR ची नोटीस आलीय? आता कुठेही धावपळ करायची गरज नाही; आला मोठा नि… ✦ ⚡ शिक्षणाचा खर्च भागवण्यासाठी घेतला शेतीचा निर्णय, श्रेयसने 5 गुंठ्यात केली कमाल, 2 लाख निव्वळ नफा ✦ ⚡ Premanand Maharaj : प्रेमानंद महाराजांच्या शिष्याच्या मृत्यू प्रकरणात ट्विस्ट! खोलीत संशयास्पद वस्तू, CCTV … ✦ ⚡ ५ हजार दिले तरी प्रोटीन दिले नाही, राग अनावर, थेट जीम ट्रेनरची हत्या, जालना हादरलं ✦ ⚡ Asian Games : बुटाचं सोल तुटलं तरीही पोरीनं पटकावलं मेडल; कोण आहे सीमा कुमारी? आईला न सांगताच जपानला पोहोचल… ✦ ⚡ महिन्याला दागिने खरेदी करायची अन् VIDEO बनवयायची, चोरट्यांनी Reel पाहून केलं भयानक काडं, नेमकं काय घडलं? ✦ ⚡ Mumbai Local: मुंबईकर गणेश विसर्जनाला बाहेर पडताय? चर्चगेट ते विरार धावणार जादा गाड्या, पण 84 लोकलचा ‘तो’ थ… ✦ ⚡ Crime : बापाला बायकोने जीवे मारलं, पण पोराला भलत्याच गोष्टीच दुःख, सूनबाई क्रिमिनल का बनली? ✦ ⚡ बाऊन्ड्री लाईनवर थरार, दोन बोटांनी घेतली कॅच, अख्खं स्टेडिअम उभं राहून पाहत राहिलं, VIDEO ✦ ⚡ महिला शेतकऱ्यांसाठी ऑनलाइन प्रमाणपत्र नोंदणी सुरू
SP News Maregaon

MH 29 टीम चा सर्पमित्रांकडून आणखी एका दुर्मिळ सापाला जीवनदान

230 Views
🔊 बातमी ऐका (Marathi Voice Reader)

विदर्भ एस.पी.न्यूज नेटवर्क वणी,

वणी तालुक्यातील बोर्डा  येथे दि.7 ऑगस्ट 2024 येथील रहिवासी रवींद्र नक्षीने यांच्या घरी दुर्मिळ जातीचा साप निघण्याची घटना समोर आली त्यांच्या घरी लिंबोनी वर (लिंबाचे झाड) साप जाऊन बसलेला आहे असे त्यांना दिसले असता त्यांनी एम एच २९ चे अध्यक्ष तरोडा येथील सर्पमित्र अनिकेत कुमरे यांना फोन वरुन माहिती दिली.

त्यांनी लगेच वेळ वाया न जाता घटनास्थळी बोर्डा येथील सर्पमित्र यांना तिथे पाठवले व काही वेळातच स्वतःही पोहोचून त्या सापाला इजा न होता पकडले व डब्बा बंद केले गावातील लोकांना सापाविषयी थोडक्यात माहिती दिली व भयमुक्त केले.

एम एच २९ हेल्पिंग हँड्स ही संस्था वन्यजीव वाचवण्यास नेहमी
कार्यरत असते मागील सात-आठ वर्षापासून ही संस्था वणी तालुक्यामध्ये काम करीत आहे.वणी तालुक्यामध्ये संस्थेचे 10 हून अधिक सदस्य कार्यरत आहे त्यात राजू भोगेकर,समीर गुरणुले, कुणाल कुमरे,रमेश भादीकर,आशिष सोंट्टके,रवी नन्नावरे, नितीन माणूसमारे, दिनेश साखरकर, हे नेहमी आपल्या सेवेत हजर आहे.

त्या पकडलेला सापाची माहिती संस्थेचे तालुकाध्यक्ष अनिकेत कुमरे यांना देण्यात आली.सापाविषयी अधिक माहिती घेतली असता
प्राणीमित्र,सर्पमित्र अनिकेत कुमरे सांगतात की हा साप बोईगा टिर्गोनाटा (मांजऱ्या) निम्मविषारी प्रजातीचा वणी तालुक्यात पहिल्यांदा आधळला जाणारा दुर्मिळ साप आहे.

वणी तालुक्यामध्ये या सापाची ही पहिलीच नोंद आहे.मांजऱ्या साप हा निम्न विषारी आहे.या सापांचे डोळे मांजरासारखे बटबटीत असल्याने त्याला ‘मांजऱ्या’ नाव पडले. त्यांची जीभही लांब असते.हा अंगाने सडपातळ असतो.त्यांचे शरीर व शेपटीही त्यामानाने लांब असते. शेपटी निमुळती होत होत शेवटी ती अत्यंत बारीक झालेली असते.रंग फिकट तपकिरी किंवा पिंगट असतो.

त्यावर गर्द रंगाच्या खुणा असतात. डोक्यावर Y आकाराचे चिन्ह असते. शरीराच्या खालच्या भागाचा रंग पांढुरका किंवा पिंगट असतो. पोटावर खवले असतात.कधीकधी पोटावरील प्रत्येक खवल्यावर बारीक बारीक ठिपके असल्याचेही आढळून येते.खवले गुळगुळीत असतात. याची सरासरी लांबी सव्वा मीटर असते.वीण काळात मांजऱ्या साप ६ ते ८ अंडी घालतो.

मांजऱ्या दिवसा झाडांच्या पानांत वेटोळे घालून बसलेले असतात. दिवसा कित्येक वेळा ते झुडपे, गवताने शाकारलेली घरांची छपरे किंवा झाडांच्या सालीखाली थंडाव्याला राहतात.या जातीच्या सापाचे विष सौम्य असते.त्यामुळे त्याने पकडलेले भक्ष्य निपचीत पडून राहते. मांजऱ्याच भक्ष्य प्रामुख्याने सापसुरळी व इतर प्रकारचे सरडे आहेत. कधीकधी ते उंदीर व लहान पक्षीही खातात.

मांजऱ्या साप निरुपद्रवी आहेत. मात्र चवताळले,की सर्वांगाचे पट्ट वेटोळे करून त्यातून डोके आणि त्याच वेळी शेपटीही थरथर हलवत असतात.साप अन्नसाखळीतील मुख्य घटक आहे त्यांना जीवनदान देणे हे आपलं कर्तव्य आहे लोकांनी सापाला न मारता स्वतःचा आणि सापाचा जीव धोक्यात घालू नये कुठलाही साप किंवा वन्यजीव धोक्यात किंवा आपल्या परिसरात आढळून आल्यास वनविभागाच्या टोल फ्री क्रमांक १९२६ ला किंवा एम एच २९ च्या 9850577616 किंव्हा 9604530354तालुक्यासाठी  या क्रमांकाला संपर्क करणे असे आवाहन प्राणीमित्र सर्पमित्र अनिकेत कुमरे यांनी जनतेला केले आहे.

ही बातमी शेअर करा
विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क, मारेगाव विदर्भातील घडामोडींपासून राज्य, देश आणि जगभरातील ताज्या, अचूक व विश्वासार्ह बातम्या सर्वात आधी आपल्या भेटीला. ब्रेकिंग न्यूज, राजकारण, गुन्हे, सामाजिक, कृषी, शिक्षण, क्रीडा, मनोरंजन आणि विशेष रिपोर्ट्स एका क्लिकवर. सत्याला आवाज देणारे, जनतेचा विश्वास जपणारे आपले हक्काचे न्यूज पोर्टल – विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क मारेगाव.
प्रतिक्रिया द्या
⚡ मारेगाव फ्लॅश व्हिडिओ पहा
↓ रिफ्रेश करण्यासाठी खाली ओढा
💬 चॅटवर शेअर करा 📢 स्टेटसवर शेअर करा
📱 नेटिव्ह शेअर