ब्रेकिंग न्यूज
⚡ SIR Maharashtra: तुम्हाला निवडणूक आयोगाची SIR ची नोटीस आलीय? आता कुठेही धावपळ करायची गरज नाही; आला मोठा नि… ✦ ⚡ शिक्षणाचा खर्च भागवण्यासाठी घेतला शेतीचा निर्णय, श्रेयसने 5 गुंठ्यात केली कमाल, 2 लाख निव्वळ नफा ✦ ⚡ Premanand Maharaj : प्रेमानंद महाराजांच्या शिष्याच्या मृत्यू प्रकरणात ट्विस्ट! खोलीत संशयास्पद वस्तू, CCTV … ✦ ⚡ ५ हजार दिले तरी प्रोटीन दिले नाही, राग अनावर, थेट जीम ट्रेनरची हत्या, जालना हादरलं ✦ ⚡ Asian Games : बुटाचं सोल तुटलं तरीही पोरीनं पटकावलं मेडल; कोण आहे सीमा कुमारी? आईला न सांगताच जपानला पोहोचल… ✦ ⚡ महिन्याला दागिने खरेदी करायची अन् VIDEO बनवयायची, चोरट्यांनी Reel पाहून केलं भयानक काडं, नेमकं काय घडलं? ✦ ⚡ Mumbai Local: मुंबईकर गणेश विसर्जनाला बाहेर पडताय? चर्चगेट ते विरार धावणार जादा गाड्या, पण 84 लोकलचा ‘तो’ थ… ✦ ⚡ Crime : बापाला बायकोने जीवे मारलं, पण पोराला भलत्याच गोष्टीच दुःख, सूनबाई क्रिमिनल का बनली? ✦ ⚡ बाऊन्ड्री लाईनवर थरार, दोन बोटांनी घेतली कॅच, अख्खं स्टेडिअम उभं राहून पाहत राहिलं, VIDEO ✦ ⚡ महिला शेतकऱ्यांसाठी ऑनलाइन प्रमाणपत्र नोंदणी सुरू
SP News Maregaon

संजय खाडे यांना जाहीर केला आपच्या पदाधिका-यांनी पाठिंबा

177 Views
🔊 बातमी ऐका (Marathi Voice Reader)

विविध सामाजिक, शैक्षणिक संस्थांचा खाडे यांना वाढता पाठिंबा

तालुका प्रतिनिधी वणी

वणी – आम आदमी पार्टीच्या वणी विधानसभा पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी अपक्ष उमेदवार संजय खाडे यांना जाहीर पाठिंबा जाहीर केला आहे. आम आदमी पार्टीचे शहर महासचिव दादाजी पोटे आणि वणी विधानसभा उपाध्यक्ष शेख जलील व कार्यकर्त्यांनी संजय खाडे यांची प्रचार कार्यालयात भेट घेत त्यांना पाठिंबा दिल्याची घोषणा केली. त्यांनी संजय खाडे यांना विजयी करण्याचे आवाहन केले आहे.

संजय खाडे यांनी उमेदवारी जाहीर करताच त्यांना विविध संघटना व संस्था पाठिंबा जाहीर करीत आहे. यात विविध समाजाच्या, शैक्षणिक इत्यादी संघटनांचा समावेश आहे. बुधवारी महाराष्ट्र ट्रायबल आघाडी या संघटनेच्या पदाधिका-यांनी भेट घेत पाठिंबा जाहीर केला. तर त्याआधी महाराष्ट्र राज्य सर्व श्रमिक संघ (अंगणवाडी विभाग) व गोंडवाना बहुउद्देशीय संस्था मारेगाव यांनी आपला पाठिंबा जाहीर केला आहे.तसेच मुस्लिम समाज कमिटीच्या सदस्यांनीही त्यांना आपला पाठिंबा दर्शवला आहे.

बुधवारी दिनांक 6 नोव्हेंबर रोजी संजय खाडे यांच्या प्रचाराचा नारळ फुटला.तेव्हापासून त्यांना रोज विविध संघटनांचा पाठिंबा मिळत आहे. सध्या काँग्रेस पक्षाचे अनेक प्रमुख नेते, शिवसेनेतील प्रमुख नेते, शिवसैनिकांचा खाडे पाठिंबा मिळत आहे. येत्या 4 दिवसात प्रचार शिगेला पोहोचताच संजय खाडे यांचा पाठिंबा आणखी वाढेल,असा अंदाज व्यक्त केला जात आहे. सध्या माजी आमदार विश्वास नांदेकर, काँग्रेसचे नरेंद्र ठाकरे, गौरीशंकर खुराणा इत्यादी नेत्यांच्या मार्गदर्शनात संजय खाडे यांचा प्रचार सुरु आहे.

ही बातमी शेअर करा
विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क, मारेगाव विदर्भातील घडामोडींपासून राज्य, देश आणि जगभरातील ताज्या, अचूक व विश्वासार्ह बातम्या सर्वात आधी आपल्या भेटीला. ब्रेकिंग न्यूज, राजकारण, गुन्हे, सामाजिक, कृषी, शिक्षण, क्रीडा, मनोरंजन आणि विशेष रिपोर्ट्स एका क्लिकवर. सत्याला आवाज देणारे, जनतेचा विश्वास जपणारे आपले हक्काचे न्यूज पोर्टल – विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क मारेगाव.
प्रतिक्रिया द्या
⚡ मारेगाव फ्लॅश व्हिडिओ पहा
↓ रिफ्रेश करण्यासाठी खाली ओढा
💬 चॅटवर शेअर करा 📢 स्टेटसवर शेअर करा
📱 नेटिव्ह शेअर