ब्रेकिंग न्यूज
⚡ नाल्यावर हात-पाय धुताना काहीतरी चावले; चार दिवसांनी शेतमजुराचा मृत्यू ✦ ⚡ शिवनी धोबे येथे शेतकरीपुत्राची गळफास घेऊन आत्महत्या ✦ ⚡ Jalgaon Cotton Crop News | कपाशीवर लाल्या रोगाचा प्रादुर्भाव,शेतकऱ्यांचं आर्थिक नुकसान | Farmer News ✦ ⚡ शिक्षणानंतर शेती करण्याचं धाडस दाखवलं, तरुण शेतकऱ्यानं केली केळीची लागवड, आता लाखात कमाई ✦ ⚡ SIR Maharashtra: तुम्हाला निवडणूक आयोगाची SIR ची नोटीस आलीय? आता कुठेही धावपळ करायची गरज नाही; आला मोठा नि… ✦ ⚡ शिक्षणाचा खर्च भागवण्यासाठी घेतला शेतीचा निर्णय, श्रेयसने 5 गुंठ्यात केली कमाल, 2 लाख निव्वळ नफा ✦ ⚡ Premanand Maharaj : प्रेमानंद महाराजांच्या शिष्याच्या मृत्यू प्रकरणात ट्विस्ट! खोलीत संशयास्पद वस्तू, CCTV … ✦ ⚡ Premanand Maharaj : प्रेमानंद महाराजांच्या शिष्याच्या मृत्यू प्रकरणात ट्विस्ट! खोलीत संशयास्पद वस्तू, CCTV … ✦ ⚡ ५ हजार दिले तरी प्रोटीन दिले नाही, राग अनावर, थेट जीम ट्रेनरची हत्या, जालना हादरलं ✦ ⚡ Asian Games : बुटाचं सोल तुटलं तरीही पोरीनं पटकावलं मेडल; कोण आहे सीमा कुमारी? आईला न सांगताच जपानला पोहोचल…
SP News Maregaon

भरधाव कारची दुचाकीला भीषण धडक दोघे जण ठार तर 1 जण गंभीर जखमी.

81 Views
🔊 बातमी ऐका (Marathi Voice Reader)

वणी-वरोरा रोडवरील सावर्ला जवळ घटना.

तालुका प्रतिनिधी:- वणी

वणी तालुक्यातील सावर्ला फाट्या जवळ आज दिनांक 28 फेब्रुवारी 2023 रोज मंगळवारला सायंकाळी 6:15 वाजताच्या सुमारास विरुद्ध दिशेने येणाऱ्या भरधाव कारने दुचाकिला भीषण धडक दिली.या अपघातात दुचाकीस्वार दोघे जण ठार झाले तर 1 जण गंभीर जखमी झाला आहे.

कार क्रमांक MP.48 ZA.2259 ह्या कारने सावर्ला जवळ वरोऱ्या कडून वणी कडे येत असलेल्या दुचाकी क्रमांक MH.29 BG.5124 हीरो फॅशन प्रो ला भीषण धडक दिली.या अपघाता (accident) मध्ये दुचाकीचा पूर्ण चुराडा झाला असुन कारचे पण बोनट फुटले आहे.आज वणी येथील तीन तरुण काही कार्यक्रमानिमित्त वरोरा येथे गेले होते.

तेथील कार्यक्रम आटोपून वणी कडे दुचाकीने वापस येत असताना सावर्ला जवळ भरधाव कारने धडक दिली.या अपघातात आकाश शंकर गाउत्रे वय सुमारे 27 वर्ष रा रंगारीपुरा वणी,अमोल मडावी वय सुमारे 29 वर्ष रा.जैताई मंदिरा जवळ वणी असे मृतकाचे नाव आहे.रानु तुमराम वय सुमारे 27 वर्ष रा.पोलीस लाईन भिमनगर वणी हा गंभीर जखमी झाला आहे.

त्यांना रस्त्यांनी ये -जा करणाऱ्यांनी लगेच वणी येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल केले पण तेथील डॉक्टरांनी आकाश व अमोल याला मृत घोषित केले.अपघात घडताच परिसरातील नागरिकांची मोठ्या प्रमाणात गर्दी झाली होती.या घटनेची माहिती मिळताच वणी पोलीस घटनास्थळी दाखल झाले.व पुढील तपास करत आहे.

ही बातमी शेअर करा
विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क, मारेगाव विदर्भातील घडामोडींपासून राज्य, देश आणि जगभरातील ताज्या, अचूक व विश्वासार्ह बातम्या सर्वात आधी आपल्या भेटीला. ब्रेकिंग न्यूज, राजकारण, गुन्हे, सामाजिक, कृषी, शिक्षण, क्रीडा, मनोरंजन आणि विशेष रिपोर्ट्स एका क्लिकवर. सत्याला आवाज देणारे, जनतेचा विश्वास जपणारे आपले हक्काचे न्यूज पोर्टल – विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क मारेगाव.
प्रतिक्रिया द्या
⚡ मारेगाव फ्लॅश व्हिडिओ पहा
↓ रिफ्रेश करण्यासाठी खाली ओढा
💬 चॅटवर शेअर करा 📢 स्टेटसवर शेअर करा
📱 नेटिव्ह शेअर