ब्रेकिंग न्यूज
Vasai-Virar Mahapalika मध्ये कर्मचारी भरतीवरून राडा, भाजप आणि बविआ आमने-सामनेे एक शेळीपासून सुरू केलेला व्यवसाय, आता 40 शेळ्यांचा मालक, सिद्धेश्वर यांचा वर्षाचा कमाईचा आकडा पाहाच! गौरीपूजनाला गावी गेले, छ. संभाजीनगरात 4 घरं फोडली; लाखोंची लूट, पण 4 तोळ्यांचा हार तिथंच फेकला, शॉकिंग कारण… Superfast 100 News | सुपरफास्ट बातम्या | 23 September | Sunil Shelke News | SIM Cars News | Fadnavis साहेब, कसं जगायचं! पिकांचा उरला फक्त पाला, डोळ्यात पाणी आणणारा शेतकऱ्याचा VIDEO भावी पतीलाच दिसले नको ते फोटो, मुंबईतल्या तरुणीसोबत भयंकर घडलं, 10 हजारांची डिमांड अन् ‘इन्स्टा’वर… अशक्य काहीच नाही! टेनिस कोर्टवरचा ‘गोल्डन बॉय’ झाला CA, पहिल्याच प्रयत्नात कसं मिळवलं यश? Video लेकीला घेऊन आई घरी निघाली, वाटतेच मोपेड घसरली, मागून काळ बनून आला डंपर, क्षणात…, कोल्हापूर हळहळलं बनावट CBI अधिकारी, ज्येष्ठ नागरिकांना डिजिटल अरेस्टच्या नावाखाली 100 कोटींचा गंडा, पुण्यातील धक्कादायक घटना… Sonam Maskar : कोरोनात मुंबई सोडून कोल्हापूर गाठलं; प्रॉपर्टी विकून लेकीचं स्वप्न पूर्ण केलं; पोरीनं Asian …
SP News Maregaon

डॉ. विनोदकुमार आदे यांना समाज गौरव पुरस्कार

6 Views
🔊 बातमी ऐका (Marathi Voice Reader)

कला, साहित्य व प्रबोधनात्मक कार्याची दखल; नागपूर येथे सन्मान सोहळा

विदर्भ एस.पी.न्यूज नेटवर्क डेस्क,वणी

वणी:श्री क्षत्रिय कोसरे माळी समाज (विदर्भ), नागपूर संस्थेच्या वतीने भारतातील पहिल्या शिक्षिका, स्त्रीशिक्षणाच्या प्रणेत्या व सामाजिक क्रांतीच्या अग्रदूत क्रांतीज्योती सावित्रीमाई फुले यांच्या जयंतीनिमित्त रविवार, दि. ४ जानेवारी २०२६ रोजी नागपूर येथील दिघोरी नाक्याच्या मागे, पडोळे लॉनजवळ भव्य महोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते.

या महोत्सवात २०२६ चा समाज गौरव पुरस्कार यवतमाळ जिल्ह्यातील कलावंत, साहित्यिक व संपादक डॉ. विनोदकुमार आदे यांना प्रदान करण्यात आला.डॉ. आदे यांनी २००८ पासून क्रांतीज्योती सावित्रीमाई फुले जयंतीनिमित्त मारेगाव व वणी येथे तालुका ते राज्यस्तरीय ‘प्रज्वलन’ या नावाने दोन दिवसीय सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करून सामाजिक प्रबोधनाचे कार्य केले आहे.

तसेच प्रजासत्ताक दिन व स्वातंत्र्यदिनानिमित्त विविध सामाजिक विषयांवर प्रबोधनात्मक पोस्टर रांगोळ्या काढून जनजागृती केली आहे. मतदान, हुंडाबळी, व्यसनमुक्ती, बेरोजगारी, देशभक्ती, कोरोना यांसारख्या विषयांवर आधारित गीते, लघुचित्रपटांची निर्मिती त्यांनी केली आहे.



त्यांचा ‘टुकार’ हा काव्यसंग्रह प्रकाशित झाला असून, ‘अजून माझा बाप काही केल्या मरत नाही’ हा कथासंग्रह, ‘बाप’ व ‘तडतडात’ हे कवितासंग्रह प्रकाशनाच्या मार्गावर आहेत. सध्या ते ‘वणी न्यूज एक्सप्रेस’ या वृत्तवाहिनीचे मुख्य संपादक म्हणून कार्यरत असून, उत्कृष्ट ग्राफिक्स डिझायनर म्हणूनही त्यांची ओळख आहे.

चित्रकला, मूर्तिकला, हस्तकला, शिल्पकला, रांगोळी, गायन, लेखन, काव्य, संगीत व संशोधन अशा विविध क्षेत्रांत त्यांनी उल्लेखनीय कार्य केले आहे. कला व संशोधन क्षेत्रातील योगदानासाठी हेसन इंटरनॅशनल युनिव्हर्सिटीने त्यांना पीएचडी प्रदान केली आहे. त्यांच्या या भरीव सामाजिक व सांस्कृतिक कार्याची दखल घेत समाज गौरव पुरस्काराने त्यांना सन्मानित करण्यात आले.

संस्थेच्या सुवर्ण महोत्सवी दशकानिमित्त ‘फुललेली बाग’ ही स्मरणिका प्रकाशित करण्यात आली असून, त्यामध्ये डॉ. आदे यांचा ‘माझे माहेर नवरगाव’ हा लेख समाविष्ट आहे. या लेखातील गावच्या आठवणींना समाजबांधवांनी विशेष प्रशंसा केली.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संस्थेचे अध्यक्ष कृष्णा महादुरे होते.

यावेळी चंद्रपूर येथील सामाजिक कार्यकर्त्या डॉ. सौ. अभिलाषाताई गावतूरे, एस.व्ही.ई.टी., नागपूरचे प्राचार्य डॉ. विजय वाढई, सामाजिक कार्यकर्ते बबनराव निकुळे, प्रा. डॉ. अलकाताई बी. झाडे, डॉ. राकेश गावतूरे, माजी नगरसेविका सुनंदाताई नाल्हे, माळी वैभवचे कार्यकारी संपादक मनोहर चलपे आदी मान्यवर उपस्थित होते. कार्यक्रमाला समाजबांधवांनी सहकुटुंब मोठ्या संख्येने उपस्थिती लावली.

ही बातमी शेअर करा
विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क, मारेगाव विदर्भातील घडामोडींपासून राज्य, देश आणि जगभरातील ताज्या, अचूक व विश्वासार्ह बातम्या सर्वात आधी आपल्या भेटीला. ब्रेकिंग न्यूज, राजकारण, गुन्हे, सामाजिक, कृषी, शिक्षण, क्रीडा, मनोरंजन आणि विशेष रिपोर्ट्स एका क्लिकवर. सत्याला आवाज देणारे, जनतेचा विश्वास जपणारे आपले हक्काचे न्यूज पोर्टल – विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क मारेगाव.
प्रतिक्रिया द्या
मारेगाव फ्लॅश व्हिडिओ पहा
रिफ्रेश करण्यासाठी खाली ओढा
💬 चॅटवर शेअर करा 📢 स्टेटसवर शेअर करा
📱 नेटिव्ह शेअर