ब्रेकिंग न्यूज
⚡ Mumbai Local: मुंबईकर गणेश विसर्जनाला बाहेर पडताय? चर्चगेट ते विरार धावणार जादा गाड्या, पण 84 लोकलचा ‘तो’ थ… ✦ ⚡ Crime : बापाला बायकोने जीवे मारलं, पण पोराला भलत्याच गोष्टीच दुःख, सूनबाई क्रिमिनल का बनली? ✦ ⚡ बाऊन्ड्री लाईनवर थरार, दोन बोटांनी घेतली कॅच, अख्खं स्टेडिअम उभं राहून पाहत राहिलं, VIDEO ✦ ⚡ महिला शेतकऱ्यांसाठी ऑनलाइन प्रमाणपत्र नोंदणी सुरू ✦ ⚡ Woman Farmer: कारभारणीचा ‘महिला शेतकरी’ म्हणून भरा अर्ज, सरकारी योजनांचा मिळेल लाभ, कोणती लागेल कागदपत्रं? ✦ ⚡ विदर्भाच्या ‘समृद्धी’चा मार्ग मोकळा! 42 हजार कोटींचा प्लॅन, 3 नवे महामार्ग होणार, कुठून कुठं जाणार? ✦ ⚡ Vasai-Virar Mahapalika मध्ये कर्मचारी भरतीवरून राडा, भाजप आणि बविआ आमने-सामनेे ✦ ⚡ एक शेळीपासून सुरू केलेला व्यवसाय, आता 40 शेळ्यांचा मालक, सिद्धेश्वर यांचा वर्षाचा कमाईचा आकडा पाहाच! ✦ ⚡ गौरीपूजनाला गावी गेले, छ. संभाजीनगरात 4 घरं फोडली; लाखोंची लूट, पण 4 तोळ्यांचा हार तिथंच फेकला, शॉकिंग कारण… ✦ ⚡ Superfast 100 News | सुपरफास्ट बातम्या | 23 September | Sunil Shelke News | SIM Cars News | Fadnavis
SP News Maregaon

उमेदच्या महिलांची पंचायत समिती व तहसिल कार्यालयावर धडक

68 Views
🔊 बातमी ऐका (Marathi Voice Reader)

थकीत मानधन त्वरित अदा करा
  उमेद – महिला कल्याणकारी मंडळ शाखा मारेगावची मागणी

मारेगांव तालुका प्रतिनिधी:- सुरेश पाचभाई
[9922862184]

सविस्तर वृत्त असे की.
 मारेगाव तालुक्यातील उमेद – महाराष्ट्र राज्य जीवनोन्नती अभियान अंतर्गत कार्यरत असलेल्या समुह संसाधन व्यक्तींचे मानधन थकीत आहे.गेल्या 12 महिन्या पासुन थकीत मानधन त्वरित अदा करा व मानधना मध्ये वाढ करावी या प्रमुख मागणीसाठी उमेदच्या महिलांनी आज दिनांक 6 एप्रिल 2022 ला पंचायत समिती मारेगाव व तहसील कार्यालयावर धडक देवून उमेद- कल्याणकारी मंडळ तालुका शाखा मारेगाव च्या वतीने तहसीलदार मार्फत राज्याचे ग्राम विकास मंत्री नामदार हसन मुश्रीफ यांना निवेदन देण्यात आले.

राष्ट्रीय ग्रामीण जीवनोन्नती अभियान उमेद अंतर्गत सर्व समूह संसाधन व्यक्ती कोविड – 19 च्या परस्तीती पासून अभियानाचे काम सातत्याने करीत आहे.कोविड -19 चा सर्वत्र प्रादुर्भाव असतांना देखील अभियानाच्या सर्व समूह संसाधन व्यक्तींनी ग्रामीण भागात केलेल्या मास निर्मिती कार्याची अवघ्या महाराष्ट्रात दखल घेण्यात आली.तसेच ग्रामीण भागातील कोविड लसीकरण मोहिमेत उमेद महिला समूह संसाधन व्यक्तींचे मोठया प्रमाणात सहभाग देवून शासनाचा उपक्रम यशस्वीपणे राबविला.गेल्या 12 महिन्या पासून मानधन थकीत असता तरी पण उमेदच्या कामात खंड पडू दिला नाही.करिता विविध मागण्यांसाठी उमेद च्या महिलांनी तहसीलदार व गटविकास अधिकारी यांच्या मार्फत ग्राम विकास मंत्री नामदार हसन मुश्रीफ यांना निवेदन देण्यात आले.



यात उमेद समूह संसाधन व्यक्ती यांच्या मानधनात किमान 5 ते 7 हजार रुपये वाढ करण्यात यावी.गेल्या 12 महिन्या पासून समूह संसाधन व्यक्तीचे थकीत असलेले मानधन तत्काळ अदा करण्यात यावे.तसेच मानधन अग्रीम स्वरूपात ग्रामसभा/प्रभाग संघात कायमस्वरूपी ठेवण्यात यावे.

अभियानामध्ये सी.एस. सी.अंतर्गत भरती न करता आमच्या समूह संसाधन व्यक्ती मधील शैक्षणिक गुणवत्ता अनुभवाच्या आधारे पात्र उमेदवार  संधी द्यावी. व सर्व्ह समुह संसधन व्यक्तीचे कौटोबिक आरोग्य विमा कडण्यासाथी आर्थिक सह्यता देण्यात यावी.
वरील मागण्या लवकरात लवकर पूर्ण न झाल्यास नाईलाजास्तव आमच्या हक्कासाठी आंदोलन करण्यात येईल असा इशारा त्यांनी निवेदनातून दिलेला आहे..

ही बातमी शेअर करा
विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क, मारेगाव विदर्भातील घडामोडींपासून राज्य, देश आणि जगभरातील ताज्या, अचूक व विश्वासार्ह बातम्या सर्वात आधी आपल्या भेटीला. ब्रेकिंग न्यूज, राजकारण, गुन्हे, सामाजिक, कृषी, शिक्षण, क्रीडा, मनोरंजन आणि विशेष रिपोर्ट्स एका क्लिकवर. सत्याला आवाज देणारे, जनतेचा विश्वास जपणारे आपले हक्काचे न्यूज पोर्टल – विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क मारेगाव.
प्रतिक्रिया द्या
⚡ मारेगाव फ्लॅश व्हिडिओ पहा
↓ रिफ्रेश करण्यासाठी खाली ओढा
💬 चॅटवर शेअर करा 📢 स्टेटसवर शेअर करा
📱 नेटिव्ह शेअर