ब्रेकिंग न्यूज
⚡ SIR Maharashtra: तुम्हाला निवडणूक आयोगाची SIR ची नोटीस आलीय? आता कुठेही धावपळ करायची गरज नाही; आला मोठा नि… ✦ ⚡ शिक्षणाचा खर्च भागवण्यासाठी घेतला शेतीचा निर्णय, श्रेयसने 5 गुंठ्यात केली कमाल, 2 लाख निव्वळ नफा ✦ ⚡ Premanand Maharaj : प्रेमानंद महाराजांच्या शिष्याच्या मृत्यू प्रकरणात ट्विस्ट! खोलीत संशयास्पद वस्तू, CCTV … ✦ ⚡ ५ हजार दिले तरी प्रोटीन दिले नाही, राग अनावर, थेट जीम ट्रेनरची हत्या, जालना हादरलं ✦ ⚡ Asian Games : बुटाचं सोल तुटलं तरीही पोरीनं पटकावलं मेडल; कोण आहे सीमा कुमारी? आईला न सांगताच जपानला पोहोचल… ✦ ⚡ महिन्याला दागिने खरेदी करायची अन् VIDEO बनवयायची, चोरट्यांनी Reel पाहून केलं भयानक काडं, नेमकं काय घडलं? ✦ ⚡ Mumbai Local: मुंबईकर गणेश विसर्जनाला बाहेर पडताय? चर्चगेट ते विरार धावणार जादा गाड्या, पण 84 लोकलचा ‘तो’ थ… ✦ ⚡ Crime : बापाला बायकोने जीवे मारलं, पण पोराला भलत्याच गोष्टीच दुःख, सूनबाई क्रिमिनल का बनली? ✦ ⚡ बाऊन्ड्री लाईनवर थरार, दोन बोटांनी घेतली कॅच, अख्खं स्टेडिअम उभं राहून पाहत राहिलं, VIDEO ✦ ⚡ महिला शेतकऱ्यांसाठी ऑनलाइन प्रमाणपत्र नोंदणी सुरू
SP News Maregaon

परिवर्तन पॅनलच्या निवडणूक कार्यालयाचे थाटात उदघाटन.

79 Views
🔊 बातमी ऐका (Marathi Voice Reader)

● वणी विधानसभा काँग्रेस पक्षाचा परिवर्तन पॅनलला सक्रिय पाठिंबा.

तालुका प्रतिनिधी वणी.

वणी येथील प्रतिष्ठित श्री रंगनाथ स्वामी नागरी सहकारी पतसंस्थेच्या संचालक मंडळ निवडणुकीत आघाडीवर असलेल्या परिवर्तन पॅनलच्या प्रचार कार्यालयाचे सोमवारी दिनांक 20 जून रोजी थाटात उदघाटन करण्यात आले. येथील आबड भवनमध्ये सुरु करण्यात आलेल्या कार्यालयाचे उदघाटन काँग्रेस नेते डॉ. महेंद्र लोढा यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी वणी शहर काँग्रेस पक्षाच्या महिला पदाधिकारी, पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

परिवर्तन पॅनलला माजी आमदार वामनराव कासावार यांचा पाठिंबा आहे. संस्थेवर परिवर्तन पॅनलचे संचालक निवडून आणण्यासाठी वणी विधानसभा क्षेत्रातील सर्व कांग्रेस कार्यकर्ता उमेदवारासोबत प्रचारार्थ उतरले आहे. यवतमाळ जिल्हा महिला काँग्रेस अध्यक्ष वंदना आवारी, वणी तालुका महिला काँग्रेस अध्यक्ष संध्या बोबडे, वणी शहर महिला अध्यक्ष सविता ठेपाले महिला कार्यकर्त्यासोबत परिवर्तन पॅनलच्या उमेदवारांना विजयी करण्यासाठी अहोरात्र परिश्रम घेत आहे.

मतदानाला फक्त 5 दिवस उरले असता परिवर्तन पॅनलने प्रचारात आघाडी घेल्याचे दिसून येत आहे. पतसंस्थेच्या 17 संचालकाच्या निवडीसाठी 26 जून रोजी मतदान होणार आहे. तब्बल 800 कोटींची ठेवी असलेल्या या पत संस्थेवर मागील अनेक वर्षांपासून काळे गटाचा ताबा आहे. रंगनाथ स्वामी पतसंस्थेच्या यशामध्ये शेकडो दैनिक बचत अभिकर्त्यांच्या मोठा वाटा आहे. मात्र विद्यमान संचालक मंडळ कडून या अभिकर्त्याना दुय्यम वागणूक दिली जात आहे. त्यामुळे पतसंस्थेच्या 15 शाखा मधील नाराज शेकडो अभिकर्ता परिवर्तन घडवून आणण्याचा तयारीत आहे.

परिवर्तन पॅनेलच्या प्रचार कार्यालयाच्या उदघाटन प्रसंगी डॉ. महेंद्र लोढा, प्रमोद वासेकर, प्रमोद निकुरे, राजाभाऊ बिलोरिया, संजय खाडे, जयकुमार आबड, वंदना आवारी, संध्या बोबडे, सविता ठेपाले, मंगला झिलपे, मंदा बांगरे, विजया आगबतल्लवार , सुरेखा वडीचार, ललिता बाशेटीवर, माया कोरडे व परिवर्तन पॅनेलचे उमेदवार उपस्थित होते.

ही बातमी शेअर करा
विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क, मारेगाव विदर्भातील घडामोडींपासून राज्य, देश आणि जगभरातील ताज्या, अचूक व विश्वासार्ह बातम्या सर्वात आधी आपल्या भेटीला. ब्रेकिंग न्यूज, राजकारण, गुन्हे, सामाजिक, कृषी, शिक्षण, क्रीडा, मनोरंजन आणि विशेष रिपोर्ट्स एका क्लिकवर. सत्याला आवाज देणारे, जनतेचा विश्वास जपणारे आपले हक्काचे न्यूज पोर्टल – विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क मारेगाव.
प्रतिक्रिया द्या
⚡ मारेगाव फ्लॅश व्हिडिओ पहा
↓ रिफ्रेश करण्यासाठी खाली ओढा
💬 चॅटवर शेअर करा 📢 स्टेटसवर शेअर करा
📱 नेटिव्ह शेअर