ब्रेकिंग न्यूज
⚡ SIR Maharashtra: तुम्हाला निवडणूक आयोगाची SIR ची नोटीस आलीय? आता कुठेही धावपळ करायची गरज नाही; आला मोठा नि… ✦ ⚡ शिक्षणाचा खर्च भागवण्यासाठी घेतला शेतीचा निर्णय, श्रेयसने 5 गुंठ्यात केली कमाल, 2 लाख निव्वळ नफा ✦ ⚡ Premanand Maharaj : प्रेमानंद महाराजांच्या शिष्याच्या मृत्यू प्रकरणात ट्विस्ट! खोलीत संशयास्पद वस्तू, CCTV … ✦ ⚡ ५ हजार दिले तरी प्रोटीन दिले नाही, राग अनावर, थेट जीम ट्रेनरची हत्या, जालना हादरलं ✦ ⚡ Asian Games : बुटाचं सोल तुटलं तरीही पोरीनं पटकावलं मेडल; कोण आहे सीमा कुमारी? आईला न सांगताच जपानला पोहोचल… ✦ ⚡ महिन्याला दागिने खरेदी करायची अन् VIDEO बनवयायची, चोरट्यांनी Reel पाहून केलं भयानक काडं, नेमकं काय घडलं? ✦ ⚡ Mumbai Local: मुंबईकर गणेश विसर्जनाला बाहेर पडताय? चर्चगेट ते विरार धावणार जादा गाड्या, पण 84 लोकलचा ‘तो’ थ… ✦ ⚡ Crime : बापाला बायकोने जीवे मारलं, पण पोराला भलत्याच गोष्टीच दुःख, सूनबाई क्रिमिनल का बनली? ✦ ⚡ बाऊन्ड्री लाईनवर थरार, दोन बोटांनी घेतली कॅच, अख्खं स्टेडिअम उभं राहून पाहत राहिलं, VIDEO ✦ ⚡ महिला शेतकऱ्यांसाठी ऑनलाइन प्रमाणपत्र नोंदणी सुरू
SP News Maregaon

बापरे बाप ! तरोड्यात आला दुर्मिळ काळतोंड्या साप..

2.5k Views
🔊 बातमी ऐका (Marathi Voice Reader)

तालुका प्रतिनिधी वणी

साप दिसणं तर सोडाच; पण नाव निघालं तरी अंगावर काटा येतो. त्यात जर तो घरात किंवा परिसरात दिसला तर तारांबळच उठते. अशावेळी अनेकजण त्याला मारतात. मात्र त्याला न मारता आपण
एमएच २९ हेल्पिंग हँडस्यचे सर्पमित्र राजू भोगेकार यांना कॉल करा . त्यांनी नुकतीच एक मोठी कामगिरी केली.

तरोडा, सुंदरनगर येथील गणेश सिडाम यांच्या घरी साप असल्याची माहित मिडाली असता.तिथल्या दक्ष नागरिकांनी सर्वात आधी राजू भोगेकार यांना कळवलं.क्षणाचाही विलंब न करता भोगेकार पोहचले . सर्वात आधी त्यांनी नागरिकांना धीर दिला. मग सापाचं निरीक्षण केलं. तो कृष्णशीर्ष ( काळतोंड्या) साप असल्याचे दिसले.त्याला योग्यरीत्या पकडून तेथील जनतेला माहिती दिली .

या सापाचे तोंड काळे असल्यामुळे याला काळतोंड्या असे म्हणतात. याला कृष्णशीर्ष असेही म्हणले जाते. हा साप जनिमी पासून आपली मान उंच करतो त्यामुळे याला नागाचे पिल्लू समजून त्याला मारल्या जाते. हा साप हुबेहूब पोवळा या विषारी सापासारखा दिसतो. काळतोंड्या व पोवळा या दोन्ही सापातील अंतर सूक्ष्म निरीक्षण केल्यावरच लक्षात येते .या सपाची लांबी सरासरी 1 फुट. अधिकतम 1.5 फुट असते .

या सापाची वणी येथील वनविभागामध्ये नोंद करुन वनपरीक्षेत्र अधिकारी यांना दाखवले.त्यांच्या मार्गदर्शनात नैसर्गिक परिसरात सापाला सोडण्यात आले.यावेळी उपस्थित एमएच २९ हेल्पींग हंड्सचे वन्यजीव रक्षक रमेश भादीकर व राजु भोगेकर, अनिकेत कुमरे , संतोष गुम्मुलवार ,नितीन माणुसमारे, समीर गुरनुले, दिवेंद्र भोगेकर, अमोल, रोहित, दीपक, कुणाल, आशीष, दिनेश हे उपस्थित होते. एमएच २९ हेल्पींग हंड्सच्या या कामगिरीचे सर्वत्र कौतुक होत आहे.

ही बातमी शेअर करा
विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क, मारेगाव विदर्भातील घडामोडींपासून राज्य, देश आणि जगभरातील ताज्या, अचूक व विश्वासार्ह बातम्या सर्वात आधी आपल्या भेटीला. ब्रेकिंग न्यूज, राजकारण, गुन्हे, सामाजिक, कृषी, शिक्षण, क्रीडा, मनोरंजन आणि विशेष रिपोर्ट्स एका क्लिकवर. सत्याला आवाज देणारे, जनतेचा विश्वास जपणारे आपले हक्काचे न्यूज पोर्टल – विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क मारेगाव.
प्रतिक्रिया द्या
⚡ मारेगाव फ्लॅश व्हिडिओ पहा
↓ रिफ्रेश करण्यासाठी खाली ओढा
💬 चॅटवर शेअर करा 📢 स्टेटसवर शेअर करा
📱 नेटिव्ह शेअर