ब्रेकिंग न्यूज
⚡ SIR Maharashtra: तुम्हाला निवडणूक आयोगाची SIR ची नोटीस आलीय? आता कुठेही धावपळ करायची गरज नाही; आला मोठा नि… ✦ ⚡ शिक्षणाचा खर्च भागवण्यासाठी घेतला शेतीचा निर्णय, श्रेयसने 5 गुंठ्यात केली कमाल, 2 लाख निव्वळ नफा ✦ ⚡ Premanand Maharaj : प्रेमानंद महाराजांच्या शिष्याच्या मृत्यू प्रकरणात ट्विस्ट! खोलीत संशयास्पद वस्तू, CCTV … ✦ ⚡ ५ हजार दिले तरी प्रोटीन दिले नाही, राग अनावर, थेट जीम ट्रेनरची हत्या, जालना हादरलं ✦ ⚡ Asian Games : बुटाचं सोल तुटलं तरीही पोरीनं पटकावलं मेडल; कोण आहे सीमा कुमारी? आईला न सांगताच जपानला पोहोचल… ✦ ⚡ महिन्याला दागिने खरेदी करायची अन् VIDEO बनवयायची, चोरट्यांनी Reel पाहून केलं भयानक काडं, नेमकं काय घडलं? ✦ ⚡ Mumbai Local: मुंबईकर गणेश विसर्जनाला बाहेर पडताय? चर्चगेट ते विरार धावणार जादा गाड्या, पण 84 लोकलचा ‘तो’ थ… ✦ ⚡ Crime : बापाला बायकोने जीवे मारलं, पण पोराला भलत्याच गोष्टीच दुःख, सूनबाई क्रिमिनल का बनली? ✦ ⚡ बाऊन्ड्री लाईनवर थरार, दोन बोटांनी घेतली कॅच, अख्खं स्टेडिअम उभं राहून पाहत राहिलं, VIDEO ✦ ⚡ महिला शेतकऱ्यांसाठी ऑनलाइन प्रमाणपत्र नोंदणी सुरू
SP News Maregaon

भरधाव ट्रकची दुचाकीला भिषण धडक एक ठार तर एक गंभीर जखमी.

130 Views
🔊 बातमी ऐका (Marathi Voice Reader)

वणी ते नांदेपेरा मार्गावरील घटना.

तालुका प्रतिनिधी:- वणी

वणी ते नांदेपेरा मार्गावर भरधाव हायवा ट्रकने दुचाकीला भिषण धडक दिली.या अपघातात दुचाकीस्वार एक तरुण ठार तर दुसरा गंभीर जखमी झाला आहे.ही घटना आज दिनांक 23 मार्च 2023 रोज गुरुवारला दुपारी 4:30 वाजताच्या सुमारास घडली.

धिरज धनराज आत्राम वय सुमारे 29 वर्षे असे अपघातात ठार झालेल्या तरुणाचे नाव आहे.तर संदीप कवडू सिडाम वय सुमारे 28 हा तरुण गंभीर जखमी झाला आहे. हे दोघेही वांजरी ता.वणी जि.यवतमाळ येथील रहिवासी आहे.आज ते दोघे दुचाकीने काही कामानिमित्त वणीकडे येत असताना विरुद्ध दिशेने येत असलेल्या हायवा ट्रक क्रमांक MH-29-BE-1816 ने सहारा पार्क जवळ दुचाकीला भिषण धकड दीली.

अपघात होताच रस्त्यांनी ये-जा करणाऱ्या नागरिकांनी व स्थानिकांनी लगेच वणी पोलिसांना घटनेची माहिती दिली.आणि जखमी तरुणांना लगेच वणी येथेल ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले.पण तेथील डॉक्टरांनी धिरज याला मृत घोषित केले.तर संदिप वर उपचार सुरु असल्याची माहिती प्राप्त झाली आहे.धिरज यांच्या पश्चात आई-वडील,पत्नी, दोन मुल असा आप्त परिवार आहे.या प्रकरणाचा पुढील तपास वणी पोलीस करत आहे.

ही बातमी शेअर करा
विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क, मारेगाव विदर्भातील घडामोडींपासून राज्य, देश आणि जगभरातील ताज्या, अचूक व विश्वासार्ह बातम्या सर्वात आधी आपल्या भेटीला. ब्रेकिंग न्यूज, राजकारण, गुन्हे, सामाजिक, कृषी, शिक्षण, क्रीडा, मनोरंजन आणि विशेष रिपोर्ट्स एका क्लिकवर. सत्याला आवाज देणारे, जनतेचा विश्वास जपणारे आपले हक्काचे न्यूज पोर्टल – विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क मारेगाव.
प्रतिक्रिया द्या
⚡ मारेगाव फ्लॅश व्हिडिओ पहा
↓ रिफ्रेश करण्यासाठी खाली ओढा
💬 चॅटवर शेअर करा 📢 स्टेटसवर शेअर करा
📱 नेटिव्ह शेअर