ब्रेकिंग न्यूज
⚡ शिवनी धोबे येथे शेतकरीपुत्राची गळफास घेऊन आत्महत्या ✦ ⚡ Jalgaon Cotton Crop News | कपाशीवर लाल्या रोगाचा प्रादुर्भाव,शेतकऱ्यांचं आर्थिक नुकसान | Farmer News ✦ ⚡ शिक्षणानंतर शेती करण्याचं धाडस दाखवलं, तरुण शेतकऱ्यानं केली केळीची लागवड, आता लाखात कमाई ✦ ⚡ SIR Maharashtra: तुम्हाला निवडणूक आयोगाची SIR ची नोटीस आलीय? आता कुठेही धावपळ करायची गरज नाही; आला मोठा नि… ✦ ⚡ शिक्षणाचा खर्च भागवण्यासाठी घेतला शेतीचा निर्णय, श्रेयसने 5 गुंठ्यात केली कमाल, 2 लाख निव्वळ नफा ✦ ⚡ Premanand Maharaj : प्रेमानंद महाराजांच्या शिष्याच्या मृत्यू प्रकरणात ट्विस्ट! खोलीत संशयास्पद वस्तू, CCTV … ✦ ⚡ Premanand Maharaj : प्रेमानंद महाराजांच्या शिष्याच्या मृत्यू प्रकरणात ट्विस्ट! खोलीत संशयास्पद वस्तू, CCTV … ✦ ⚡ ५ हजार दिले तरी प्रोटीन दिले नाही, राग अनावर, थेट जीम ट्रेनरची हत्या, जालना हादरलं ✦ ⚡ Asian Games : बुटाचं सोल तुटलं तरीही पोरीनं पटकावलं मेडल; कोण आहे सीमा कुमारी? आईला न सांगताच जपानला पोहोचल… ✦ ⚡ महिन्याला दागिने खरेदी करायची अन् VIDEO बनवयायची, चोरट्यांनी Reel पाहून केलं भयानक काडं, नेमकं काय घडलं?
SP News Maregaon

लोकमान्य टिळक महाविद्यालयात “बाल यौन शोषण व पोक्सो कायदा” यावर कार्यशाळा संपन्न.

144 Views
🔊 बातमी ऐका (Marathi Voice Reader)

तालुका प्रतिनिधी :- वणी

लोकमान्य टिळक महाविद्यालयात “बाल यौन शोषण ” याविषयावर विचारमंथनपर कार्यक्रम लोकमान्य टिळक महाविद्यालयातील राष्ट्रीय सेवा योजना समाजशास्त्र विभाग , राज्यशास्त्र विभाग व साक्षी बहुउद्धेशीय संस्था दिल्ली यांच्या संयुक्त विद्यमाने आभासी पद्धतीने कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.

या व्याख्यानाचा विषय बाल यौन शोषण व पोक्सो कायदा हा होता. या विषयावर व्यक्त होत असतांना ,कार्यक्रमाचे प्रमुख वक्त्या माननीय भारती गोमासे यांनी विषयाच्या मुळाशी जात बाल यौन शोषण होण्यामागाच्या कारणांचा आढावा घेतला,बाल यौन शोषणामध्ये जवळपास 90 टक्के लोक परिचयातील असतात त्यामुळे पालकांनी यासंदर्भात जागरूक व सजग असणे गरजेचे आहे.

जेणेकरून या विकृत मानसिकतेला वेळीच ठेचले गेले तर याचे पुढील काळात परिणाम सकारात्मक बघायला मिळतील यासाठी पहिले पालकांचे मुलासोबतचे संबंध मित्रत्वाच्या नात्याचे असायला हवे जेणेकरून घडणाऱ्या घटनांची वाच्यता मूल आई वडिलांकडे करतील, तसेच या समस्येसंदर्भात पालकांनी वेळ न घालवता वेळीच तक्रार दाखल केल्यास या समस्येला आळा बसू शकेल परंतु बऱ्याच केसेसमध्ये पालक तक्रार दाखल करण्यास धजावत नाही.त्यामुळे गुन्हेगारी मनोवृत्ती बळावली जात आहे.

भारतामध्ये जून 2022 पर्यंत 7500 च्या वर बाल यौन शोषणाच्या तक्रारी सरकार दरबारी पडलेल्या असतांना या विषयावर अतिशय कडक कायद्यांची नितांत गरज असल्याचे विचार प्रमुख वक्त्यांनी वक्त केले. या कार्यक्रमाचे अध्यक्ष महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. प्रसाद खानझोडे यांनी व्यक्त होत असतांना समस्येच्या मूळ कडीला स्पर्श करीत पालकांमधील जागरूकता, सतर्कता याला महत्व देऊन समाजाने सामाजिक दायित्वाचा विचार करून आपले कर्त्यव्य प्रामाणिक पार पडल्यास निःसंदेह ही समस्या काळाच्या उदरात नाहीशी होईल असा विश्वास व्यक्त केला.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक आणि पाहुण्याचा परिचय राष्ट्रीय सेवा योजनेच्या कार्यक्रम अधिकारी डॉ निलिमा दवणे यांनी केले या कार्यक्रमाला शीतल टोटरे यांचे सहकार्य लाभले कार्यक्रमाचे संचालन राष्ट्रीय सेवा योजनेचे कार्यक्रम अधिकारी डॉ विकास जुनगरी यांनी केले या कार्यक्रमाला विद्यार्थ्यांचा अपेक्षेपेक्षा भरगोस प्रतिसाद लाभला.

ही बातमी शेअर करा
विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क, मारेगाव विदर्भातील घडामोडींपासून राज्य, देश आणि जगभरातील ताज्या, अचूक व विश्वासार्ह बातम्या सर्वात आधी आपल्या भेटीला. ब्रेकिंग न्यूज, राजकारण, गुन्हे, सामाजिक, कृषी, शिक्षण, क्रीडा, मनोरंजन आणि विशेष रिपोर्ट्स एका क्लिकवर. सत्याला आवाज देणारे, जनतेचा विश्वास जपणारे आपले हक्काचे न्यूज पोर्टल – विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क मारेगाव.
प्रतिक्रिया द्या
⚡ मारेगाव फ्लॅश व्हिडिओ पहा
↓ रिफ्रेश करण्यासाठी खाली ओढा
💬 चॅटवर शेअर करा 📢 स्टेटसवर शेअर करा
📱 नेटिव्ह शेअर