ब्रेकिंग न्यूज
⚡ ५ हजार दिले तरी प्रोटीन दिले नाही, राग अनावर, थेट जीम ट्रेनरची हत्या, जालना हादरलं ✦ ⚡ Asian Games : बुटाचं सोल तुटलं तरीही पोरीनं पटकावलं मेडल; कोण आहे सीमा कुमारी? आईला न सांगताच जपानला पोहोचल… ✦ ⚡ महिन्याला दागिने खरेदी करायची अन् VIDEO बनवयायची, चोरट्यांनी Reel पाहून केलं भयानक काडं, नेमकं काय घडलं? ✦ ⚡ Mumbai Local: मुंबईकर गणेश विसर्जनाला बाहेर पडताय? चर्चगेट ते विरार धावणार जादा गाड्या, पण 84 लोकलचा ‘तो’ थ… ✦ ⚡ Crime : बापाला बायकोने जीवे मारलं, पण पोराला भलत्याच गोष्टीच दुःख, सूनबाई क्रिमिनल का बनली? ✦ ⚡ बाऊन्ड्री लाईनवर थरार, दोन बोटांनी घेतली कॅच, अख्खं स्टेडिअम उभं राहून पाहत राहिलं, VIDEO ✦ ⚡ महिला शेतकऱ्यांसाठी ऑनलाइन प्रमाणपत्र नोंदणी सुरू ✦ ⚡ Woman Farmer: कारभारणीचा ‘महिला शेतकरी’ म्हणून भरा अर्ज, सरकारी योजनांचा मिळेल लाभ, कोणती लागेल कागदपत्रं? ✦ ⚡ विदर्भाच्या ‘समृद्धी’चा मार्ग मोकळा! 42 हजार कोटींचा प्लॅन, 3 नवे महामार्ग होणार, कुठून कुठं जाणार? ✦ ⚡ Vasai-Virar Mahapalika मध्ये कर्मचारी भरतीवरून राडा, भाजप आणि बविआ आमने-सामनेे
SP News Maregaon

भरधाव वेगातील ट्रकची कारला धडक…..एक ठार,तर सहा गंभीर जखमी

100 Views
🔊 बातमी ऐका (Marathi Voice Reader)

– राज्य महामार्गावरिल निंबाळा फाटा जवळील घटना

विदर्भ एस.पी.न्यूज नेटवर्क वणी,

मारेगाव येथून चंद्रपूरकडे जात असलेल्या अर्टीका कारला राज्य महामार्गावर निंबाळा फाट्याजवळ भरधाव वेगाने वणीकडून मारेगावकडे येणाऱ्या ट्रकने समोरा समोर धडक दिल्याची घटना आज दिनांक २४ जानेवारी २०२४ रोज बुधवारला दुपारी १२:३० वाजताच्या सुमारास घडली असुन यात एक जण जागीच ठार झाला तर सहा जण गंभीर जखमी झाले आहे.

सविस्तर वृत्त असे की..
शेख नवाज शेख मुजफ्फर वय सुमारे २९ वर्ष रा.मारेगाव वार्ड क्रमांक १३ ता.मारेगाव असे कार अपघात ठार झालेल्या व्यक्तीचे नाव आहे.तर कमर सयद वय सुमारे ३३ वर्ष,हाजरा शेख मुजफ्फर वय सुमारे ६० वर्ष, झेबा शेख बरकत वय सुमारे २५ वर्ष,हुसेन शेख बरकत वय सुमारे ४ वर्ष,अहमान शेख बरकत वय सुमारे दीड वर्ष हे सर्व रा.मारेगाव येथील रहिवाशी आहे तर आलीया शेख वय सुमारे १५ वर्ष हे मारेगाव तालुक्यातील मार्डी येथील रहिवाशी असून असे त्या अपघातातील गंभीर जखमी झालेल्या व्यक्तीचे नाव आहे.

नवाज याचे मारेगाव येथील बाजारवाडी परिसरात किराणा दुकान असुन त्याचे लग्न तिन महिण्याआधी झाल्याची माहिती आहे.तो आज दिनांक २४ जानेवारी २०२४ रोज बुधवारला मारेगाव येथून चंद्रपूर येथे कारने परीवारासोबत आजारी असलेल्या नातेवाईकांस भेटण्यासाठी जात होता.पण मारेगाव शहरापासून अवघ्या सुमारे ८ कि.मी अंतरावर असलेल्या निंबाळा बस स्टॉप पासून हाकेच्या अंतरावर भरधाव वेगात समोरून येणाऱ्या ट्रकने जबर धडक दिली.

अपघात होताच रस्त्यानी ये-जा करणाऱ्या काही नागरिकांनी घटनास्थळी धाव घेतली व सदर घटनेची माहिती वणी पोलीसांना दिली व जखमीना वणी येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल केले पण तेथील डॉक्टरांनी नवाज याला मृत्यू घोषीत केले.तर सदर अपघातातील इतर सहा व्यक्ती गंभीर जखमी झाले असुन मृतक नवाजच्या पश्चात आई,पत्नी,एक भाऊ असा आप्तपरिवार आहे.या घटनेचा पुढील तपास वणी पोलीस करत आहे.

ही बातमी शेअर करा
विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क, मारेगाव विदर्भातील घडामोडींपासून राज्य, देश आणि जगभरातील ताज्या, अचूक व विश्वासार्ह बातम्या सर्वात आधी आपल्या भेटीला. ब्रेकिंग न्यूज, राजकारण, गुन्हे, सामाजिक, कृषी, शिक्षण, क्रीडा, मनोरंजन आणि विशेष रिपोर्ट्स एका क्लिकवर. सत्याला आवाज देणारे, जनतेचा विश्वास जपणारे आपले हक्काचे न्यूज पोर्टल – विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क मारेगाव.
प्रतिक्रिया द्या
⚡ मारेगाव फ्लॅश व्हिडिओ पहा
↓ रिफ्रेश करण्यासाठी खाली ओढा
💬 चॅटवर शेअर करा 📢 स्टेटसवर शेअर करा
📱 नेटिव्ह शेअर