ब्रेकिंग न्यूज
Konkan Railway: कोकणात जाणाऱ्या गणेशभक्तांसाठी गुड न्यूज, विशेष रेल्वेला अतिरिक्त थांबे, पण कुठे? पतीच्या व्हॉट्सॲपवरून नंबर घेतला, त्याला अडचण सांगितली, 26 वर्षांच्या विवाहितेला ‘ती’ चूक भोवली, छ. संभाजी… FDA News | अन्नाच्या नावाखाली काळा धंदा! FDA कडून पर्दाफाश | Tukaram Mundhe News | Special Report Satish Maratha Murder : ‘प्रत्येक चौकात मीच टिकणार…’, सतीश मराठावर 39 सपासप वार करण्याआधी राहुलचा शेवटचा … Lumpy Skin Disease : जनावराला ताप अन् शरीरावर सूज, असू शकतो लम्पी आजाराचा धोका, अशी घ्या काळजी Video पुणेकर वाहतूक कोंडीचं टेन्शन सोडा! पाषाण ते कोथरूड अवघ्या 10 मिनिटांत, नेमका प्लॅन काय? ‘ओम नम: शिवाय’चा जप करत पोरानं मैदानात घातला तांडव! मॅच जिंकून दिली, कोण आहे वंश बेदी? पाहा Video Raj Thackeray News | तिसरी मुंबई कुणासाठी? राज ठाकरेंचा सवाल! | Special Report पत्नी अन् लेकरांना सोडून पोटाची खळगी भरण्यासाठी गाठलं महाराष्ट्र; पण कामावर जाताच संदीपसोबत भयंकर घडलं PM Kisan Samman Nidhi : शेतकऱ्यांसाठी मोठी बातमी! ‘या’ एका चुकीमुळे थांबणार पीएम-किसानचे ६,००० रुपये!
SP News Maregaon

झरी तालुक्यात राबविली जाणार संयुक्त कुष्ठरोग व क्षयरोग शोध मोहीम.

121 Views
🔊 बातमी ऐका (Marathi Voice Reader)

तालुका प्रतिनीधी :-झरी (जामनी) ज्ञानेश्वर आवारी
[88059 79173]

झरी जामणी संपूर्ण राज्यात दिनांक १३ सप्टेंबर ते ३० सप्टेंबर २०२२ पर्यंत संयुक्त कुष्ठरोग व क्षयरोग शोध मोहीम राबवीण्याबाबत राज्य सरकारच्या सूचना प्राप्त झाल्या आहेत त्या अनुषंगाने तालुक्यात डॉ. मोहन गेडाम, तालुका आरोग्य अधिकारी यांनी सर्व आरोग्य कर्मचारी यांचे तालुकास्तरीय प्रशिक्षण घेतले. सर्व विभागाचा समन्वय घेऊन सदर मोहीम हि राबविली जाणार आहे.

त्याच अनुषंगाने गटविकास अधिकारी रविकुमार सांगळे यांच्या अध्यक्षतेखाली तालुका समन्वय समितीची सभा घेण्यात आली. तालुक्यात एकून तीन प्राथमिक आरोग्य केंद्र असून त्यामध्ये कार्यरत सर्व आशा स्वयंसेविका आरोग्य कर्मचारी यांचा सक्रीय सहभाग घेऊन गावात प्रभातफेरी दवंडी देऊन जनजागृती करण्यात येणार आहे.

समाजातील निदान न झालेले कुष्ठरुग्ण लवकरात लवकर शोधून त्यांना त्वरित बहुविध औषधांचाराखाली आणणे क्षयरोगाचे निदाना अभावी अद्यापही वंचित असनाऱ्या क्षयरुग्णांचा शोध घेऊन त्यांना क्षयरोग औषधोचाराखाली आणणे. हा या मोहिमेचा उद्देश आहे.

त्वचेवर फिक्कट लालसर न खाजणारा बधीर चट्टा, तेलकट चकाकणारी त्वचा, त्वचेवर गाठी, कानाच्या पाळ्या जाड होणे, भुवयाचे केस विरळ होणे, तळहातावर व तळपायावर मुंग्या येणे है कुष्ठरोगाचे लक्षणे आहेत.तसेच दोन आठवड्यापेक्ष्या जास्त काळ खोकला, दोन आठवड्यापेक्ष्या जास्त ताप, वजनात लक्ष्यणीय घट हे क्षयरोगाचे लक्षणे आहेत.

कुष्टरोग व क्षयरोग हा आजार औषधोपचाराने बरा होणारा आजार आहे, कुष्टरोग व क्षयरोग या रोगाचा औषधोपचार सर्व सरकारी दवखान्यात मोफत दिल्या जातात, अशी लक्षणे असणाऱ्या व्यक्तीने सर्वेक्षणासाठी येणाऱ्या आरोग्य पथकांना व्यवस्थित माहिती देऊन सहकार्य करावे असे आवाहन तालुका आरोग्य अधिकारी डॉ. मोहन गेडाम यांनी केले आहे.

ही बातमी शेअर करा
विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क, मारेगाव विदर्भातील घडामोडींपासून राज्य, देश आणि जगभरातील ताज्या, अचूक व विश्वासार्ह बातम्या सर्वात आधी आपल्या भेटीला. ब्रेकिंग न्यूज, राजकारण, गुन्हे, सामाजिक, कृषी, शिक्षण, क्रीडा, मनोरंजन आणि विशेष रिपोर्ट्स एका क्लिकवर. सत्याला आवाज देणारे, जनतेचा विश्वास जपणारे आपले हक्काचे न्यूज पोर्टल – विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क मारेगाव.
प्रतिक्रिया द्या
मारेगाव फ्लॅश व्हिडिओ पहा
रिफ्रेश करण्यासाठी खाली ओढा
💬 चॅटवर शेअर करा 📢 स्टेटसवर शेअर करा
📱 नेटिव्ह शेअर