ब्रेकिंग न्यूज
⚡ SIR Maharashtra: तुम्हाला निवडणूक आयोगाची SIR ची नोटीस आलीय? आता कुठेही धावपळ करायची गरज नाही; आला मोठा नि… ✦ ⚡ शिक्षणाचा खर्च भागवण्यासाठी घेतला शेतीचा निर्णय, श्रेयसने 5 गुंठ्यात केली कमाल, 2 लाख निव्वळ नफा ✦ ⚡ Premanand Maharaj : प्रेमानंद महाराजांच्या शिष्याच्या मृत्यू प्रकरणात ट्विस्ट! खोलीत संशयास्पद वस्तू, CCTV … ✦ ⚡ ५ हजार दिले तरी प्रोटीन दिले नाही, राग अनावर, थेट जीम ट्रेनरची हत्या, जालना हादरलं ✦ ⚡ Asian Games : बुटाचं सोल तुटलं तरीही पोरीनं पटकावलं मेडल; कोण आहे सीमा कुमारी? आईला न सांगताच जपानला पोहोचल… ✦ ⚡ महिन्याला दागिने खरेदी करायची अन् VIDEO बनवयायची, चोरट्यांनी Reel पाहून केलं भयानक काडं, नेमकं काय घडलं? ✦ ⚡ Mumbai Local: मुंबईकर गणेश विसर्जनाला बाहेर पडताय? चर्चगेट ते विरार धावणार जादा गाड्या, पण 84 लोकलचा ‘तो’ थ… ✦ ⚡ Crime : बापाला बायकोने जीवे मारलं, पण पोराला भलत्याच गोष्टीच दुःख, सूनबाई क्रिमिनल का बनली? ✦ ⚡ बाऊन्ड्री लाईनवर थरार, दोन बोटांनी घेतली कॅच, अख्खं स्टेडिअम उभं राहून पाहत राहिलं, VIDEO ✦ ⚡ महिला शेतकऱ्यांसाठी ऑनलाइन प्रमाणपत्र नोंदणी सुरू
SP News Maregaon

0 ते 20 पटसंख्येची जाचक अट रद्द करा-परिषदेची मागणी.

79 Views
🔊 बातमी ऐका (Marathi Voice Reader)

मारेगांव तालुका प्रतिनिधी:- सुरेश पाचभाई
[9922862184]

मारेगाव तालुक्यातील ग्रामीण भागातील शाळा सुरु ठेवण्यासाठी समाविष्ट करण्यात आलेली पटसंख्येची जाचक अट रद्द करण्यात यावी अशा आशयाची मागणी करणारे निवेदन अखिल भारतीय आदिवासी विकास परिषद तालुका शाखा मारेगावच्या वतीने तहसीलदार मारेगाव यांच्या मार्फत मुख्यमंत्र्या कडे पाठविण्यात आले आहे.

शासनाच्या वतीने ग्रामीण भागातील प्राथमिक शाळा सुरु ठेवण्यासाठी 0 ते 20 पटसंख्या अनिवार्य केली आहे. ज्या शाळाची पटसंख्या 20पेक्षा कमी आहे अशा शाळा बंद करण्या बाबतचा अध्यादेश धडकल्याने ग्रामीण भागातील विदयार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होणार आहे. ग्रामीण भागातील आदिवासी पोडावर ही संख्या दुर्मिळ आहे.

त्यामुळे अशा शाळा बंद करण्यासाठी शासन निर्णयाची अमलाबजावणी सुरु करण्यात येत असल्यामुळे आदिवासी विदयार्थी शिक्षणापासून वंचीत राहणार आहे. पोडावरून समाविष्ट करण्यात येणाऱ्या दूरच्या शाळेत या विदयार्थ्यांना ये- जा करण्यासाठी सुविधा उपलब्ध नाही. अपुऱ्या सुविधे मुळे चिमुकले विदयार्थी शिक्षण या मूलभूत हक्का पासून वंचीत राहणार आहे.

त्यामुळे शासनाने ही जाचक अट रद्द करून पूर्ववत या शाळांना राजश्रय द्याव्या अन्यथा या निर्णयाचे विरोधात उलगुलान पुकारला जाईल असा इशारा या निवेदनातून देण्यात आला आहे. यावेळी आदिवासी विकास परिषदेचे तालुका अध्यक्ष सुमित गेडाम उपाध्यक्ष गंगाधर लोनसावळे, कार्याध्यक्ष भैय्याजी कनाके, सचिव शंकर मडावी, मारोती आडे,भाऊराव मेश्राम,मंगेश उईके,प्रवीण वणकर,बबन झोटिंग, कवडू जुमनाके, लक्ष्मण कोसरकार, आनंद मांदाडे प्रामुख्याने उपस्थित होते.

ही बातमी शेअर करा
विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क, मारेगाव विदर्भातील घडामोडींपासून राज्य, देश आणि जगभरातील ताज्या, अचूक व विश्वासार्ह बातम्या सर्वात आधी आपल्या भेटीला. ब्रेकिंग न्यूज, राजकारण, गुन्हे, सामाजिक, कृषी, शिक्षण, क्रीडा, मनोरंजन आणि विशेष रिपोर्ट्स एका क्लिकवर. सत्याला आवाज देणारे, जनतेचा विश्वास जपणारे आपले हक्काचे न्यूज पोर्टल – विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क मारेगाव.
प्रतिक्रिया द्या
⚡ मारेगाव फ्लॅश व्हिडिओ पहा
↓ रिफ्रेश करण्यासाठी खाली ओढा
💬 चॅटवर शेअर करा 📢 स्टेटसवर शेअर करा
📱 नेटिव्ह शेअर