ब्रेकिंग न्यूज
मारेगावच्या वारंवार वीजखंडितीविरोधात नागरिक आक्रमक; सात दिवसांचा अल्टिमेटम Konkan Railway: कोकणात जाणाऱ्या गणेशभक्तांसाठी गुड न्यूज, विशेष रेल्वेला अतिरिक्त थांबे, पण कुठे? पतीच्या व्हॉट्सॲपवरून नंबर घेतला, त्याला अडचण सांगितली, 26 वर्षांच्या विवाहितेला ‘ती’ चूक भोवली, छ. संभाजी… FDA News | अन्नाच्या नावाखाली काळा धंदा! FDA कडून पर्दाफाश | Tukaram Mundhe News | Special Report Satish Maratha Murder : ‘प्रत्येक चौकात मीच टिकणार…’, सतीश मराठावर 39 सपासप वार करण्याआधी राहुलचा शेवटचा … Lumpy Skin Disease : जनावराला ताप अन् शरीरावर सूज, असू शकतो लम्पी आजाराचा धोका, अशी घ्या काळजी Video पुणेकर वाहतूक कोंडीचं टेन्शन सोडा! पाषाण ते कोथरूड अवघ्या 10 मिनिटांत, नेमका प्लॅन काय? ‘ओम नम: शिवाय’चा जप करत पोरानं मैदानात घातला तांडव! मॅच जिंकून दिली, कोण आहे वंश बेदी? पाहा Video Raj Thackeray News | तिसरी मुंबई कुणासाठी? राज ठाकरेंचा सवाल! | Special Report पत्नी अन् लेकरांना सोडून पोटाची खळगी भरण्यासाठी गाठलं महाराष्ट्र; पण कामावर जाताच संदीपसोबत भयंकर घडलं
SP News Maregaon

मारेगाव बसस्थानकाचे काम सहा महिन्यांपासून ठप्प; तातडीने काम सुरु करण्याची मागणी

514 Views
🔊 बातमी ऐका (Marathi Voice Reader)

सुरेश पाचभाई मारेगाव

मारेगाव येथील नव्या बसस्थानकाचे बांधकाम गेल्या सहा महिन्यांपासून बंद असल्यामुळे नागरिक व प्रवाशांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे. या संदर्भात आज ४ नोव्हेंबर २०२५ रोजी तहसील कार्यालय मारेगाव तसेच सार्वजनिक बांधकाम  उपविभाग मारेगाव यांच्या मार्फत जिल्हाधिकारी कार्यालय, यवतमाळ येथे लेखी निवेदन देण्यात आले.

हे निवेदन कॉ. बंडु गोलर (भा.क.प.) यांच्या नेतृत्वाखाली देण्यात आले. बसस्थानकाचे उद्घाटन झाल्यानंतर काम जलद गतीने सुरू होते; मात्र अचानक काम थांबविण्यात आले. त्यामुळे बसस्थानकाचा वापर करणाऱ्या प्रवाशांची सतत हेळसांड होत असल्याची तीव्र नाराजी व्यक्त करण्यात येत आहे.

बांधकाम सुरू न होण्यामुळे प्रवाशांना पावसात, उन्हात उभे राहून वाहनांची प्रतीक्षा करावी लागते. सोयीसुविधांचा पूर्ण अभाव आहे. संबंधीत अधिकाऱ्यांनी तातडीने काम सुरू करून बसस्थानक जनतेच्या सेवेसाठी उपलब्ध करावे, अशी मागणी निवेदनातून केली आहे.

निवेदनात प्रशासनास सात दिवसांचा अल्टीमेटम देण्यात आला असून, या कालावधीत बसस्थानकाचे काम पुन्हा सुरू न झाल्यास तिव्र आंदोलन छेडण्याचा इशारा देण्यात आला आहे.
स्थानिक नागरिक, प्रवासी व व्यावसायिकांमधून बसस्थानकाच्या प्रलंबित कामाबद्दल नाराजी व्यक्त केली जात आहे.

ही बातमी शेअर करा
विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क, मारेगाव विदर्भातील घडामोडींपासून राज्य, देश आणि जगभरातील ताज्या, अचूक व विश्वासार्ह बातम्या सर्वात आधी आपल्या भेटीला. ब्रेकिंग न्यूज, राजकारण, गुन्हे, सामाजिक, कृषी, शिक्षण, क्रीडा, मनोरंजन आणि विशेष रिपोर्ट्स एका क्लिकवर. सत्याला आवाज देणारे, जनतेचा विश्वास जपणारे आपले हक्काचे न्यूज पोर्टल – विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क मारेगाव.
प्रतिक्रिया द्या
मारेगाव फ्लॅश व्हिडिओ पहा
रिफ्रेश करण्यासाठी खाली ओढा
💬 चॅटवर शेअर करा 📢 स्टेटसवर शेअर करा
📱 नेटिव्ह शेअर