ब्रेकिंग न्यूज
⚡ Jalgaon Cotton Crop News | कपाशीवर लाल्या रोगाचा प्रादुर्भाव,शेतकऱ्यांचं आर्थिक नुकसान | Farmer News ✦ ⚡ शिक्षणानंतर शेती करण्याचं धाडस दाखवलं, तरुण शेतकऱ्यानं केली केळीची लागवड, आता लाखात कमाई ✦ ⚡ SIR Maharashtra: तुम्हाला निवडणूक आयोगाची SIR ची नोटीस आलीय? आता कुठेही धावपळ करायची गरज नाही; आला मोठा नि… ✦ ⚡ शिक्षणाचा खर्च भागवण्यासाठी घेतला शेतीचा निर्णय, श्रेयसने 5 गुंठ्यात केली कमाल, 2 लाख निव्वळ नफा ✦ ⚡ Premanand Maharaj : प्रेमानंद महाराजांच्या शिष्याच्या मृत्यू प्रकरणात ट्विस्ट! खोलीत संशयास्पद वस्तू, CCTV … ✦ ⚡ Premanand Maharaj : प्रेमानंद महाराजांच्या शिष्याच्या मृत्यू प्रकरणात ट्विस्ट! खोलीत संशयास्पद वस्तू, CCTV … ✦ ⚡ ५ हजार दिले तरी प्रोटीन दिले नाही, राग अनावर, थेट जीम ट्रेनरची हत्या, जालना हादरलं ✦ ⚡ Asian Games : बुटाचं सोल तुटलं तरीही पोरीनं पटकावलं मेडल; कोण आहे सीमा कुमारी? आईला न सांगताच जपानला पोहोचल… ✦ ⚡ महिन्याला दागिने खरेदी करायची अन् VIDEO बनवयायची, चोरट्यांनी Reel पाहून केलं भयानक काडं, नेमकं काय घडलं? ✦ ⚡ Mumbai Local: मुंबईकर गणेश विसर्जनाला बाहेर पडताय? चर्चगेट ते विरार धावणार जादा गाड्या, पण 84 लोकलचा ‘तो’ थ…
SP News Maregaon

सरसकट पिक विमा देण्यात यावा.

68 Views
🔊 बातमी ऐका (Marathi Voice Reader)

झरी तालुक्यातील शेतकऱ्यांची मागणी.

२ जानेवारी २०२३ आमणरण उपोषण तयारी.

तालुका प्रतिनीधी :-झरी (जामनी) ज्ञानेश्वर आवारी
[88059 79173]

झरी जामणी तालुक्यातील ८०७४ शेतकऱ्यांनी पिक विमा काढला परंतु केवळ ७००६ शेतकऱ्याचे पिकांचे पंचनामे झाले आहे.सरसकट व पंचनामा झालेल्या शेतकरी व पंचनामा न झालेले शेतकरी यांना विमा मिळणे बाबत अर्ज दिनांक १६ डिसेंबर रोजी तहसिलदार यांना निवेदन देण्यात आले होते.

पण अजुनही प्रशासना कडुन मदती बाबत व कोणत्याही प्रकारची दखल घेतली नसल्याने तालुक्यातील सर्वच शेतकऱ्यांना पिक विम्याचा लाभ देण्यात यावा मागणीसाठी २७ डिसेंबर रोजी तहसीलदारांना निवेदन देण्यात आले .
तालुक्यातील आनेवारी ५०% आत आहे. शासनाने ओला दुष्काळ सुध्दा जाहीर केला व मागील तिन वर्षीचे आनेवारी ५०% आत आहे. तरी मागील वर्षी खुप कमी प्रमाणात विम्याची रक्कम व या वर्षी कोणत्याही प्रकारची मदत मिळाली नाही.

सतत जर तिन वर्ष ५०% आत आनेवारी असेल तर पिक विम्याची रक्कम जेवढा काढला तेवढा शंकर टक्के मिळाली लगतच्या तालुक्याला भरपुर पिक विमा मिळतो आम्हाला का नाही.हा तालुक्यात अदिवासी गोरगरीब शेतकऱ्याचे प्रमाण जास्त आहे.अतिवृष्टीने शेताचे अतोनात नुकसान झाले तक्रार केल्यानंतर २४ तासाच्या आत पंचनामे करायला पाहीजे तसे न करता हेतूपुरस्सर १५ दिवसांनी पंचनामा करायचा आणी नुकसानीची पातळी कमी दाखवायची जेणे करुन पिक विमा कमी मिळाला पाहीजे हा डाव आहे.

कारण माझ्या गरीब शेतकऱ्यांना ऑनलाईन समजत नाही.तालुक्यातील पाचही मंडळांना पिक विमा मिळाला पाहीजे कारण मागील वर्षी काही दोन आली तसे झाले न करता मागील सोडलेल्या सर्व मंडळांना पिक विमा मिळावा.गरीब शेतकरी 8074 लोकांनी पिक विम्याचे पैसे किती भरले व केंद्र शासन किती भरले हा सर्व पैसा कंपणीच्या खिशात गेला आहे. याकडे कोण लक्ष्य देणार आहे.

झरी, वणी, मारेगाव, पांढरकवडा, राळेगाव या यवतमाळ जिल्यातील तालुक्यांना पिक विमा मिळाला नाही आणी जिल्यातील सर्व तालुक्यांना मिळाला अशी माहीती AIC कंपणीकडुन मिळाली.या 5 तालुक्यांना पिक विम्यापासून वंचीत ठेवण्यामागे का कारण तेलंगाणा राज्यामध्ये शेतकऱ्यांना वेळोवेळी सरसकट बियाणे लावल्या पासुन तर पिक निघे पर्यंत टप्या टप्याने अनुदान दिले जाते.

तेलंगणा सरकारकडुन.व आपल्या सरकारकडुन व AIC कंपणी कडुन आम्ही भरलेल्या पिक विम्याची रक्कम आम्हाला मिळाली पाहीजेत नियमित कर्ज फेडणाऱ्या शेतकऱ्यांना 50,000/- रुपये प्रोत्साहनपर अनुदान पासून अनेक शेतकरी वंचित आहेत.

आपल्या कार्यालयासमोर काही शेतकऱ्यासह आम्ही दि. २ जानेवारीला रोजी आमरण उपोषणास बसण्याचा इशारा निवेदणातून देण्यात आला आहे .यावेळी संदिप बु्र्रेवार अध्यक्ष बाजार समिती,निलेश येल्टीवार,हरिदास गुर्जलवार,श्रीकांत अमुलवार,राहुल दांडेकर यांचेसह तालुक्यातील अनेक शेतकरी उपस्थित होते .

ही बातमी शेअर करा
विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क, मारेगाव विदर्भातील घडामोडींपासून राज्य, देश आणि जगभरातील ताज्या, अचूक व विश्वासार्ह बातम्या सर्वात आधी आपल्या भेटीला. ब्रेकिंग न्यूज, राजकारण, गुन्हे, सामाजिक, कृषी, शिक्षण, क्रीडा, मनोरंजन आणि विशेष रिपोर्ट्स एका क्लिकवर. सत्याला आवाज देणारे, जनतेचा विश्वास जपणारे आपले हक्काचे न्यूज पोर्टल – विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क मारेगाव.
प्रतिक्रिया द्या
⚡ मारेगाव फ्लॅश व्हिडिओ पहा
↓ रिफ्रेश करण्यासाठी खाली ओढा
💬 चॅटवर शेअर करा 📢 स्टेटसवर शेअर करा
📱 नेटिव्ह शेअर