ब्रेकिंग न्यूज
⚡ SIR Maharashtra: तुम्हाला निवडणूक आयोगाची SIR ची नोटीस आलीय? आता कुठेही धावपळ करायची गरज नाही; आला मोठा नि… ✦ ⚡ शिक्षणाचा खर्च भागवण्यासाठी घेतला शेतीचा निर्णय, श्रेयसने 5 गुंठ्यात केली कमाल, 2 लाख निव्वळ नफा ✦ ⚡ Premanand Maharaj : प्रेमानंद महाराजांच्या शिष्याच्या मृत्यू प्रकरणात ट्विस्ट! खोलीत संशयास्पद वस्तू, CCTV … ✦ ⚡ ५ हजार दिले तरी प्रोटीन दिले नाही, राग अनावर, थेट जीम ट्रेनरची हत्या, जालना हादरलं ✦ ⚡ Asian Games : बुटाचं सोल तुटलं तरीही पोरीनं पटकावलं मेडल; कोण आहे सीमा कुमारी? आईला न सांगताच जपानला पोहोचल… ✦ ⚡ महिन्याला दागिने खरेदी करायची अन् VIDEO बनवयायची, चोरट्यांनी Reel पाहून केलं भयानक काडं, नेमकं काय घडलं? ✦ ⚡ Mumbai Local: मुंबईकर गणेश विसर्जनाला बाहेर पडताय? चर्चगेट ते विरार धावणार जादा गाड्या, पण 84 लोकलचा ‘तो’ थ… ✦ ⚡ Crime : बापाला बायकोने जीवे मारलं, पण पोराला भलत्याच गोष्टीच दुःख, सूनबाई क्रिमिनल का बनली? ✦ ⚡ बाऊन्ड्री लाईनवर थरार, दोन बोटांनी घेतली कॅच, अख्खं स्टेडिअम उभं राहून पाहत राहिलं, VIDEO ✦ ⚡ महिला शेतकऱ्यांसाठी ऑनलाइन प्रमाणपत्र नोंदणी सुरू
SP News Maregaon

पाटण  येथील रास्त भाव दुकानदारास धान्याचा अपहार करणे भोवले.

108 Views
🔊 बातमी ऐका (Marathi Voice Reader)

कारवाईचे  जिल्हा पुरवठा अधिकारी यांचे आदेश.

माहीती अधिकार कार्यकर्ते बंडू देवाळकर यांच्या प्रयत्नाला यश.

तालुका प्रतिनीधी :-झरी (जामणी) ज्ञानेश्वर आवारी
   [88059 79173]

झरी जामणी :- जानेवारी २०१८ ते डिसेंबर २०१८ या कालावधी दुर्भा येथिल रास्त भाव दुकान पाटण ला अतिरिक्त दुकान जोडल्या गेले .रास्त भाव दुकानदार सौ.वा.रा.आईटवार यांनी बोगस लाभार्थी दाखवून नियमित शासणा कडून लाभाची उचल करून अपहार केला .यामध्ये गहू १८६.८९ क्विंटल  रु .२३५९.७३ प्रमाणे ४४१००९/ व तांदूळ १२७ .६६ क्विटल  रुपये ३४४४.१० प्रमाणे ४३९६७३/ असे एकूण ८ लाख ८० हजार ६८२ रुपये वसुली करण्यात यावे.

ही रक्कम शासनाच्या खजिन्यात आदेशाच्या दिनांक दिनांक पासून 30 दिवसाच्या आत वसूल करून रक्कम न भरल्यास फौजदारी गुन्हा दाखल करावा .पाटण येथील रास्त भाव दुकानाचा परवाना रद्द करावा व जोडले दुकान काढून घेण्यात यावे. लाभार्थ्यांची गैरसोय होणार नाही या दृष्टीने संबंधित रास्त भाव दुकान लगतच्या गावास जोडण्यास यावे अशा प्रकारचा आदेश जिल्हा पुरवठा अधिकारी यवतमाळ यांचे कडून तहसीलदार झरी जामणी यांना पाठविण्यात आला आहे.

या प्रकरणाचा माहिती अधिकार कार्यकर्ते बंडू देवाळकर यांनी अनेक दिवसा पासून पाठपुरावा   केला होता असून शेवटी त्यांच्या प्रयत्नाला यश आले आहे.    तसेच या प्रकरणाकडे राजकीय नेत्यांचे व तालुक्यातील जनतेचे लक्ष लागले होते .

ही बातमी शेअर करा
विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क, मारेगाव विदर्भातील घडामोडींपासून राज्य, देश आणि जगभरातील ताज्या, अचूक व विश्वासार्ह बातम्या सर्वात आधी आपल्या भेटीला. ब्रेकिंग न्यूज, राजकारण, गुन्हे, सामाजिक, कृषी, शिक्षण, क्रीडा, मनोरंजन आणि विशेष रिपोर्ट्स एका क्लिकवर. सत्याला आवाज देणारे, जनतेचा विश्वास जपणारे आपले हक्काचे न्यूज पोर्टल – विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क मारेगाव.
प्रतिक्रिया द्या
⚡ मारेगाव फ्लॅश व्हिडिओ पहा
↓ रिफ्रेश करण्यासाठी खाली ओढा
💬 चॅटवर शेअर करा 📢 स्टेटसवर शेअर करा
📱 नेटिव्ह शेअर