ब्रेकिंग न्यूज
⚡ पुणे हादरलं! बारामतीत माजी सरपंच महिलेसह दोघींचा चिरला गळा, मध्यरात्री झोपेतच डबल मर्डर ✦ ⚡ नाल्यावर हात-पाय धुताना काहीतरी चावले; चार दिवसांनी शेतमजुराचा मृत्यू ✦ ⚡ शिवनी धोबे येथे शेतकरीपुत्राची गळफास घेऊन आत्महत्या ✦ ⚡ कर्ज 9 लाखांचं, 26 लाख देऊनही सावकाराची 25 लाखांची डिमांड, शेतकऱ्यानं पत्नीची माफी मागितली अन्…, कोल्हापू… ✦ ⚡ Jalgaon Cotton Crop News | कपाशीवर लाल्या रोगाचा प्रादुर्भाव,शेतकऱ्यांचं आर्थिक नुकसान | Farmer News ✦ ⚡ शिक्षणानंतर शेती करण्याचं धाडस दाखवलं, तरुण शेतकऱ्यानं केली केळीची लागवड, आता लाखात कमाई ✦ ⚡ SIR Maharashtra: तुम्हाला निवडणूक आयोगाची SIR ची नोटीस आलीय? आता कुठेही धावपळ करायची गरज नाही; आला मोठा नि… ✦ ⚡ शिक्षणाचा खर्च भागवण्यासाठी घेतला शेतीचा निर्णय, श्रेयसने 5 गुंठ्यात केली कमाल, 2 लाख निव्वळ नफा ✦ ⚡ Premanand Maharaj : प्रेमानंद महाराजांच्या शिष्याच्या मृत्यू प्रकरणात ट्विस्ट! खोलीत संशयास्पद वस्तू, CCTV … ✦ ⚡ Premanand Maharaj : प्रेमानंद महाराजांच्या शिष्याच्या मृत्यू प्रकरणात ट्विस्ट! खोलीत संशयास्पद वस्तू, CCTV …
SP News Maregaon

चित्रपट क्षेत्रात झरी तालुक्यातील युवकांचे पदार्पण.

88 Views
🔊 बातमी ऐका (Marathi Voice Reader)

” बेरा एक अघोरी ” चित्रपटात
अडेगावचा युवक अविनाश चंदनकर ला सहाय्यक अभिनेता म्हणून’ रॉकी ‘ नावाची भूमिका.

तालुका प्रतिनिधी :- झरी जामणी.
ज्ञानेश्वर आवारी [8805979173]

यवतमाळ जिल्ह्यातील झरी तालुक्यातील मांगली येथिल अमर सातघरे ‘बेरा एक अघोरी ‘ या चित्रपटात मुख्य अभिनेता च्या भूमिकेत काम केले असून त्याचे सोबत या चित्रपटात अडेगांव येथिल अविनाश चंदनकर वय २७ वर्ष सहाय्यह अभिनेता म्हणून भूमिक साकारली आहे.

अविनाश ची घरची परिस्थिती अत्यंत हलाखीची.त्याचे वडील गोवर्धन चंदनकर शिवणकाम करून घर चालवतात.अविनाशला अभिनयाची बालपणापासून आवड आहे.अविनाश चंदनकर म्हणजे अष्टपैलु ,कलाप्रेमी व्यक्तिमत्त्व. बालपणापासुनचं त्याला सर्वजण आपला सुपरस्टार म्हणुन ओळखतात.

अविनाशलाअभिनयात,चित्रकलेत,कविता,कथा, गित लिखाणात,गायनात बालपणापासुनचं प्रचंड आवड आहे आणि अजुनही तो कलेला जपतो.अविनाशने अनेक नाटके स्वतः लिहून बसवले आणि त्यात अभिनय केला. पल्याड या मराठी चित्रपटात पण तो सर्वांना दिसला.सद्या अविनाश नाट्यशास्त्र विषयात मास्टर करत आहे.

अभिनय क्षेत्रात अविनाशने पाऊल टाकलं असून धिराल एंटरटेनमेंट द्वारा प्रस्तुत,राजू भारती निर्मित बेरा एक अघोरी हा हिंदी चित्रपट शुक्रवार २८ एप्रिल रोजी चित्रपटगृहांत प्रदर्शित झाला असून,शक्तिवीर धिराल, प्रेम धिराल आणि प्राजक्ता शिंदे यांच्या यात प्रमुख भूमिका आहेत.

सहाय्यक अभिनेता म्हणून अविनाश चंदनकरने रॉकी नावाची सुंदर भूमिका साकारली आहे.या चित्रपटात बहुतांश कलावंत विदर्भातील आहेत.अविनाशचा अभिनय पाहण्यासाठी सर्वजण उत्सुक आहेत.भविष्यात अविनाशला चित्रपट क्षेत्रात अजुन खूप उंच भरारी घ्यायची आहे.त्याच्या भावी वाटचलीसाठी खूप खूप शुभेच्छा .

ही बातमी शेअर करा
विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क, मारेगाव विदर्भातील घडामोडींपासून राज्य, देश आणि जगभरातील ताज्या, अचूक व विश्वासार्ह बातम्या सर्वात आधी आपल्या भेटीला. ब्रेकिंग न्यूज, राजकारण, गुन्हे, सामाजिक, कृषी, शिक्षण, क्रीडा, मनोरंजन आणि विशेष रिपोर्ट्स एका क्लिकवर. सत्याला आवाज देणारे, जनतेचा विश्वास जपणारे आपले हक्काचे न्यूज पोर्टल – विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क मारेगाव.
प्रतिक्रिया द्या
⚡ मारेगाव फ्लॅश व्हिडिओ पहा
↓ रिफ्रेश करण्यासाठी खाली ओढा
💬 चॅटवर शेअर करा 📢 स्टेटसवर शेअर करा
📱 नेटिव्ह शेअर