ब्रेकिंग न्यूज
⚡ SIR Maharashtra: तुम्हाला निवडणूक आयोगाची SIR ची नोटीस आलीय? आता कुठेही धावपळ करायची गरज नाही; आला मोठा नि… ✦ ⚡ शिक्षणाचा खर्च भागवण्यासाठी घेतला शेतीचा निर्णय, श्रेयसने 5 गुंठ्यात केली कमाल, 2 लाख निव्वळ नफा ✦ ⚡ Premanand Maharaj : प्रेमानंद महाराजांच्या शिष्याच्या मृत्यू प्रकरणात ट्विस्ट! खोलीत संशयास्पद वस्तू, CCTV … ✦ ⚡ ५ हजार दिले तरी प्रोटीन दिले नाही, राग अनावर, थेट जीम ट्रेनरची हत्या, जालना हादरलं ✦ ⚡ Asian Games : बुटाचं सोल तुटलं तरीही पोरीनं पटकावलं मेडल; कोण आहे सीमा कुमारी? आईला न सांगताच जपानला पोहोचल… ✦ ⚡ महिन्याला दागिने खरेदी करायची अन् VIDEO बनवयायची, चोरट्यांनी Reel पाहून केलं भयानक काडं, नेमकं काय घडलं? ✦ ⚡ Mumbai Local: मुंबईकर गणेश विसर्जनाला बाहेर पडताय? चर्चगेट ते विरार धावणार जादा गाड्या, पण 84 लोकलचा ‘तो’ थ… ✦ ⚡ Crime : बापाला बायकोने जीवे मारलं, पण पोराला भलत्याच गोष्टीच दुःख, सूनबाई क्रिमिनल का बनली? ✦ ⚡ बाऊन्ड्री लाईनवर थरार, दोन बोटांनी घेतली कॅच, अख्खं स्टेडिअम उभं राहून पाहत राहिलं, VIDEO ✦ ⚡ महिला शेतकऱ्यांसाठी ऑनलाइन प्रमाणपत्र नोंदणी सुरू
SP News Maregaon

मोजक्या शेतकऱ्यांना पिक विम्याचा लाभ

161 Views
🔊 बातमी ऐका (Marathi Voice Reader)

चौकसीसाठी इतराच्या कार्यालयात चकरा

उपसंपादक झरी (जामनी) ज्ञानेश्वर आवारी
[88059 79173]

झरी जामणी कोरडा दुष्काळ ओला दुष्काळ,चक्री वादळ , अतिवृष्टी,पूर या सारख्या नैसर्गिक आपत्तीत शेतीचे मोठ्या प्रमाण नुकसान होतात.शेतकऱ्यांच्या हातातोंडाशी आलेले पिकं अशा परिस्थितीत जातात.मेहनत व लावलेला खर्च निघत नाही.अशा वेळी पिकविमा तारणहार ठरत असते नुकसान वेळी पुन्हा खंबीरपणे उभे राहता यावे या आशेवर शेतकरी पिका विमा काढतात.

परंतु तालुक्यात पिकाचे नुकसान होऊनही सरसकट पिक विमा मिळत नसल्याने ओरड केली जाते आहे.यावर्षीच्या खरीप आणि रब्बी हंगामात राज्य सरकार कडून हेक्टरी एक रुपयात पिकविमा योजना सुरू करण्यात आली आहे.त्यामुळे खरिप हंगामात सर्वच शेतकरी या योजनेत सहभागी झाले . तालुक्यात अवकाळी पावसामुळे शेतीचे मोठे नुकसान झाले.

पैनगंगा नदीला आलेल्या पूरामुळे शेकडो एकर पिकाचे नुकसान झाले आहे.पण नोव्हेंबर – डिसेंबर महिन्यात काही मोजक्या शेतकऱ्यांच्या खात्यात पिक विम्याची रक्कम जमा झाली अजूनही नव्वद टक्के शेतकरी या रकमेच्या प्रतीक्षेत आहे. क्लेम करून रक्कम का जमा होत नाही.याठी प्रधानमंत्री पिक विमा सुविधा कार्यालयात चौकशी करिता येत आहेत.

परंतु हे कार्यालय थोडावेळ साठीच उघडले जाते. कधी कधी शेतकऱ्यांना माघार जावं लागत आहे. आपापल्या पैसा मिळणार का नाही धास्ती असून पिक विमा कधी जमा होईल यासाठी जीव टांगणीला लागला आहे .

ही बातमी शेअर करा
विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क, मारेगाव विदर्भातील घडामोडींपासून राज्य, देश आणि जगभरातील ताज्या, अचूक व विश्वासार्ह बातम्या सर्वात आधी आपल्या भेटीला. ब्रेकिंग न्यूज, राजकारण, गुन्हे, सामाजिक, कृषी, शिक्षण, क्रीडा, मनोरंजन आणि विशेष रिपोर्ट्स एका क्लिकवर. सत्याला आवाज देणारे, जनतेचा विश्वास जपणारे आपले हक्काचे न्यूज पोर्टल – विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क मारेगाव.
प्रतिक्रिया द्या
⚡ मारेगाव फ्लॅश व्हिडिओ पहा
↓ रिफ्रेश करण्यासाठी खाली ओढा
💬 चॅटवर शेअर करा 📢 स्टेटसवर शेअर करा
📱 नेटिव्ह शेअर