ब्रेकिंग न्यूज
⚡ पुणे हादरलं! बारामतीत माजी सरपंच महिलेसह दोघींचा चिरला गळा, मध्यरात्री झोपेतच डबल मर्डर ✦ ⚡ नाल्यावर हात-पाय धुताना काहीतरी चावले; चार दिवसांनी शेतमजुराचा मृत्यू ✦ ⚡ शिवनी धोबे येथे शेतकरीपुत्राची गळफास घेऊन आत्महत्या ✦ ⚡ कर्ज 9 लाखांचं, 26 लाख देऊनही सावकाराची 25 लाखांची डिमांड, शेतकऱ्यानं पत्नीची माफी मागितली अन्…, कोल्हापू… ✦ ⚡ Jalgaon Cotton Crop News | कपाशीवर लाल्या रोगाचा प्रादुर्भाव,शेतकऱ्यांचं आर्थिक नुकसान | Farmer News ✦ ⚡ शिक्षणानंतर शेती करण्याचं धाडस दाखवलं, तरुण शेतकऱ्यानं केली केळीची लागवड, आता लाखात कमाई ✦ ⚡ SIR Maharashtra: तुम्हाला निवडणूक आयोगाची SIR ची नोटीस आलीय? आता कुठेही धावपळ करायची गरज नाही; आला मोठा नि… ✦ ⚡ शिक्षणाचा खर्च भागवण्यासाठी घेतला शेतीचा निर्णय, श्रेयसने 5 गुंठ्यात केली कमाल, 2 लाख निव्वळ नफा ✦ ⚡ Premanand Maharaj : प्रेमानंद महाराजांच्या शिष्याच्या मृत्यू प्रकरणात ट्विस्ट! खोलीत संशयास्पद वस्तू, CCTV … ✦ ⚡ Premanand Maharaj : प्रेमानंद महाराजांच्या शिष्याच्या मृत्यू प्रकरणात ट्विस्ट! खोलीत संशयास्पद वस्तू, CCTV …
SP News Maregaon

मारेगाव बाजार समितीमध्ये काट्याची लढत.

135 Views
🔊 बातमी ऐका (Marathi Voice Reader)

अटीतटीच्या लढतीत महाविकास आघाडीची बाजी.

गजानन आसुटकर मारेगाव:-कृषी उत्पन्न बाजार समितीच्या अटीतटीच्या झालेल्या निवडणुकीत महाविकास आघाडीने बाजी मारत पुन्हा एकदा आपले वर्चस्व सिद्ध केलेले आहे.काट्याच्या झालेल्या या लढतीत या पॅनलने 18 पैकी 17 जागा जिंकत आम्हीच सहकार क्षेत्रात अजूनही वरचढ आहो हे दाखवून दिले आहे.भाजप आघाडीला फक्त एकाच जागेवर समाधान मानावे लागले.

मतदानाच्या शेवटच्या टप्प्यापर्यंत अत्यंत चूरशीच्या वाटणाऱ्या या निवडणुकीत हमाल मापारी मतदार संघात महाविकास आघाडीचे भास्कर नारायण धांडे 4 मतदान घेऊन निवडून आले.तर व्यापारी अडते मतदार संघातून महाविकास आघाडीचे देविदास संभाजी बोबडे आणि महादेव सखाराम साळवे हे दोघेही 12 -12 मतदान मिळवीत विजयी झाले.
सहकार क्षेत्रामध्ये मातब्बर असलेल्या काँग्रेसने शिवसेनेच्या उद्धव ठाकरे गटासोबत आघाडी केली होती.

सहकारी संस्था गटामध्ये काँग्रेस आघाडीने पूर्ण जागा जिंकत वर्चस्व सिद्ध केले.यात सर्वसाधारणमध्ये वसंत श्रीरंग आसूटकर,160,जीवन विठ्ठल काळे,154,यादव उरकुडा काळे,155, काशिनाथ शामराव खडसे,153,गौरीशंकर ओमप्रकाश खुराणा, 153,ब्रम्हदेव मारोती जुनगरी,145,गणू देवाजी थेरे,130 मतदान मिळाले.

सहकारी संस्था महिला गटातून अरुणा अरुण खंडाळकर,185,सुनीता तुळशीराम मस्की,157,सहकारी संस्था अनुसूचित जमाती मतदार संघातून संतोष भिमाजी मडावी,164,इतर मागासवर्गीय मतदार संघातून रमण शाम डोये,148, ग्रामपंचायत मतदार संघातून आर्थिक दृष्टया दुर्बल घटक मतदार संघातून अविनाश देविदास लांबट 199, विजय अवताडे 199, प्रफुल विखनकर 195 मतदान मिळवून विजयी झाले तर विशवनाथ पोतू आत्राम हे बिनविरोध निवडून आले.

ही बातमी शेअर करा
विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क, मारेगाव विदर्भातील घडामोडींपासून राज्य, देश आणि जगभरातील ताज्या, अचूक व विश्वासार्ह बातम्या सर्वात आधी आपल्या भेटीला. ब्रेकिंग न्यूज, राजकारण, गुन्हे, सामाजिक, कृषी, शिक्षण, क्रीडा, मनोरंजन आणि विशेष रिपोर्ट्स एका क्लिकवर. सत्याला आवाज देणारे, जनतेचा विश्वास जपणारे आपले हक्काचे न्यूज पोर्टल – विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क मारेगाव.
प्रतिक्रिया द्या
⚡ मारेगाव फ्लॅश व्हिडिओ पहा
↓ रिफ्रेश करण्यासाठी खाली ओढा
💬 चॅटवर शेअर करा 📢 स्टेटसवर शेअर करा
📱 नेटिव्ह शेअर