ब्रेकिंग न्यूज
⚡ SIR Maharashtra: तुम्हाला निवडणूक आयोगाची SIR ची नोटीस आलीय? आता कुठेही धावपळ करायची गरज नाही; आला मोठा नि… ✦ ⚡ शिक्षणाचा खर्च भागवण्यासाठी घेतला शेतीचा निर्णय, श्रेयसने 5 गुंठ्यात केली कमाल, 2 लाख निव्वळ नफा ✦ ⚡ Premanand Maharaj : प्रेमानंद महाराजांच्या शिष्याच्या मृत्यू प्रकरणात ट्विस्ट! खोलीत संशयास्पद वस्तू, CCTV … ✦ ⚡ ५ हजार दिले तरी प्रोटीन दिले नाही, राग अनावर, थेट जीम ट्रेनरची हत्या, जालना हादरलं ✦ ⚡ Asian Games : बुटाचं सोल तुटलं तरीही पोरीनं पटकावलं मेडल; कोण आहे सीमा कुमारी? आईला न सांगताच जपानला पोहोचल… ✦ ⚡ महिन्याला दागिने खरेदी करायची अन् VIDEO बनवयायची, चोरट्यांनी Reel पाहून केलं भयानक काडं, नेमकं काय घडलं? ✦ ⚡ Mumbai Local: मुंबईकर गणेश विसर्जनाला बाहेर पडताय? चर्चगेट ते विरार धावणार जादा गाड्या, पण 84 लोकलचा ‘तो’ थ… ✦ ⚡ Crime : बापाला बायकोने जीवे मारलं, पण पोराला भलत्याच गोष्टीच दुःख, सूनबाई क्रिमिनल का बनली? ✦ ⚡ बाऊन्ड्री लाईनवर थरार, दोन बोटांनी घेतली कॅच, अख्खं स्टेडिअम उभं राहून पाहत राहिलं, VIDEO ✦ ⚡ महिला शेतकऱ्यांसाठी ऑनलाइन प्रमाणपत्र नोंदणी सुरू
SP News Maregaon

शेतमजुराच्या मुलीने पटकाविला प्रथम क्रमांक, आयुष्यात पोलीस अधिकारी बनण्याचे गाठले ध्येय

69 Views
🔊 बातमी ऐका (Marathi Voice Reader)

तालुका प्रतिनीधी :-झरी (जामणी) ज्ञानेश्वर आवारी
   [88059 79173]

मुकूटबन – येथील आदर्श हायस्कुल चा नुकताच वर्ग 10 चा निकाल लागला असुन, त्यात विद्यार्थ्यांनी घवघवीत यश प्राप्त केलं आहे. जिद्द व चिकाटी चा जोर लावुन मेहनत घेतली तर त्या मेहनतिचे चिज माञ नक्कीच होते हे काही खोटे नाही. परिस्थिती कितीही खडतर असली तरी त्या परिस्थितीवर जो मात करून सामोर जाण्याचे बल अंगीकृत करतो त्यास यश हे पाऊलापर्यंतच येते.

अशीच होतकरू व हुशार असलेली आदर्श हायस्कुल चि विद्यार्थीनी कु. गायञी वरारकर हिने जिद्द व चिकाटीने अभ्यास करून वर्ग 10 च्या बोर्ड परिक्षेत तब्बल 79.40 % घेऊन शाळेतुन प्रथम क्रमांक पटकाविला. आई-वडील हे दोघेही शेतमजुर आहे व परिस्थितीने गरीबच. मला आयुष्यात पोलीस अधिकारी बनुन प्रत्येक अन्यायाला न्याय द्यायचे आहे. माझ्या या यशाच्या मानकरींचे नाव मोठे करून परिवाराची परिस्थिती दुर करायची आहे.

आज मि माझ्या आयुष्यातील परिक्षेचा पहिला टप्पा केला व यानंतर येणाऱ्या सर्व परिक्षेत यश संपादन करून एकदिवस मि माझे ध्येय गाठेल. शेतमजुर असलेल्या माझ्या आई-वडिलांनी माझ्या शैक्षणिक जिवनात कोणती अडचन भासु दिली नाही. माझ्या पालकाप्रमाने प्रत्येक पालकांनी आपल्या पाल्याच्या शिक्षणात भर दिला तर नक्कीच फरक पडेल असा संदेश दिला.

माझ्या या यशाचे श्रेय आई शुभांगी नंदकिशोर वरारकर, वडील नंदकिशोर वरारकर, शाळेचे मुख्याध्यापक उमेश उत्तरवार, सुरपाम सर, बोबडे सर, लांडगे सर, प्रियल पथाडे, वासाडे मैडम, देवंतवार मैडम, आदींना जाते.

ही बातमी शेअर करा
विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क, मारेगाव विदर्भातील घडामोडींपासून राज्य, देश आणि जगभरातील ताज्या, अचूक व विश्वासार्ह बातम्या सर्वात आधी आपल्या भेटीला. ब्रेकिंग न्यूज, राजकारण, गुन्हे, सामाजिक, कृषी, शिक्षण, क्रीडा, मनोरंजन आणि विशेष रिपोर्ट्स एका क्लिकवर. सत्याला आवाज देणारे, जनतेचा विश्वास जपणारे आपले हक्काचे न्यूज पोर्टल – विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क मारेगाव.
प्रतिक्रिया द्या
⚡ मारेगाव फ्लॅश व्हिडिओ पहा
↓ रिफ्रेश करण्यासाठी खाली ओढा
💬 चॅटवर शेअर करा 📢 स्टेटसवर शेअर करा
📱 नेटिव्ह शेअर