ब्रेकिंग न्यूज
⚡ पुणे हादरलं! बारामतीत माजी सरपंच महिलेसह दोघींचा चिरला गळा, मध्यरात्री झोपेतच डबल मर्डर ✦ ⚡ नाल्यावर हात-पाय धुताना काहीतरी चावले; चार दिवसांनी शेतमजुराचा मृत्यू ✦ ⚡ शिवनी धोबे येथे शेतकरीपुत्राची गळफास घेऊन आत्महत्या ✦ ⚡ कर्ज 9 लाखांचं, 26 लाख देऊनही सावकाराची 25 लाखांची डिमांड, शेतकऱ्यानं पत्नीची माफी मागितली अन्…, कोल्हापू… ✦ ⚡ Jalgaon Cotton Crop News | कपाशीवर लाल्या रोगाचा प्रादुर्भाव,शेतकऱ्यांचं आर्थिक नुकसान | Farmer News ✦ ⚡ शिक्षणानंतर शेती करण्याचं धाडस दाखवलं, तरुण शेतकऱ्यानं केली केळीची लागवड, आता लाखात कमाई ✦ ⚡ SIR Maharashtra: तुम्हाला निवडणूक आयोगाची SIR ची नोटीस आलीय? आता कुठेही धावपळ करायची गरज नाही; आला मोठा नि… ✦ ⚡ शिक्षणाचा खर्च भागवण्यासाठी घेतला शेतीचा निर्णय, श्रेयसने 5 गुंठ्यात केली कमाल, 2 लाख निव्वळ नफा ✦ ⚡ Premanand Maharaj : प्रेमानंद महाराजांच्या शिष्याच्या मृत्यू प्रकरणात ट्विस्ट! खोलीत संशयास्पद वस्तू, CCTV … ✦ ⚡ Premanand Maharaj : प्रेमानंद महाराजांच्या शिष्याच्या मृत्यू प्रकरणात ट्विस्ट! खोलीत संशयास्पद वस्तू, CCTV …
SP News Maregaon

उन्हाळ्यात पावसाचं धुमशान,मे महिन्यात पूर.

80 Views
🔊 बातमी ऐका (Marathi Voice Reader)

लग्न समारंभात व्यत्यय.

मिरचीसह मुंग,भुईमुंग पिकांची नासाडी.

उन्हाळी मशागतीची कामे ठप्प.

तालुका प्रतिनिधी :- झरी जामणी.
ज्ञानेश्वर आवारी [8805979173]

झरी जामणी आज संध्याकाळी ४ वाजेच्या दरम्यान अचानक ढग दाटून आले आणि पाऊस बरसला.या पावसामुळे जामणी लगतच्या नाल्याला चांगलाच पूर आला.पुलावरून पाणी वाहत असल्याने झरी – घोन्सा , मुकूटबन कडे जाणारी वाहतूक १ तास ठप्प झाली.

जिल्ह्यात आठवड्यात अवकाळी पावसाने थैमान घातले असून अनेक ठिकाणी वादळी वाऱ्यासह गारपीट व पाऊसही कोसळत आहे दिनांक २५ एप्रिलपासून सगळीकडे ढग दाटून आले की पावसाळ्या प्रमाणे धोधो पाऊस बरसत असून या रोजच्या पावसाने नदी नाल्याना पूर येत आहे.

आपल्याकडे अनेक जन उन्हाळ्यात लग्न समारंभ उरकतात कारण उन्हाळा लग्न कार्यसाठी मोकळा ऋतू समजला जातो . पण गेल्या दोन तीन वर्षांत कोरोणा व लाँकडाऊनमुळे लग्न समारंभ आटोपती घ्यावी लागले.पण वर्षी जेमतेम मनमोकळे पणाने समारंभ साजरे करण्याला सुरुवात झाली मात्र ऐण उन्हाळ्यातच पावसाळा सुरू झाला असल्याने आयोजकांची तारांबळ उडाली आहे.

ग्रामीण भागात लग्न,रिसेप्शनचे साठी घरी व शेतात मंडप घातले जाते परंतु लग्नसराईत पावसाने एंट्री केली असून मंडप वादळी वाऱ्या पावसाने उडून जात असल्याने आयोजकांना चांगली धावपळ करावी लागते आहे.यात जेवणाची खाण्याची मोठी नासाडी होत असून आलेल्या पाहुण्याची गौरसोय होत आहे.वारंवार विद्युत पुरवठा खंडीत होत पाणी पुरवठा बंद होत असल्याने गावातील लग्न समारंभाच्या आनंदला अवकळी पाऊस अडसर ठरत आहे.


हा अवकाळी पाऊस उन्हाळी पिकासाठी घातक ठरला आहे . तालुक्यातील शेतकरी मोठ्या प्रमाणात मिरची पिकाची लागवड केली आता शेवटचा तोडा चालू आहे.पावसाने मिरची निट वाळत नसून काळी पडते आहे.त्यामुळे मल ची प्रतवारी खराब होवून दरकमी मिळत असल्याने त्यात शेतकऱ्याचे आर्थिक नुकसान होण्याची शक्यता आहे.काढणीस आलेला उन्हाळी मुंग ,भुईमुंग पिकाची गारपीठ व पावसान नासाडी झाली आहे.

उन्हाळी हंगामासाठी केलेली मेहनत व खर्च वाया गेला असून शेतकऱ्यांचे आर्थिक नुकसान झाले आहे .सततच्या पावसाने उन्हाळ्यातील नागरण व वखरण ही मशागतीची कामे खोळंबली आहे .

ही बातमी शेअर करा
विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क, मारेगाव विदर्भातील घडामोडींपासून राज्य, देश आणि जगभरातील ताज्या, अचूक व विश्वासार्ह बातम्या सर्वात आधी आपल्या भेटीला. ब्रेकिंग न्यूज, राजकारण, गुन्हे, सामाजिक, कृषी, शिक्षण, क्रीडा, मनोरंजन आणि विशेष रिपोर्ट्स एका क्लिकवर. सत्याला आवाज देणारे, जनतेचा विश्वास जपणारे आपले हक्काचे न्यूज पोर्टल – विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क मारेगाव.
प्रतिक्रिया द्या
⚡ मारेगाव फ्लॅश व्हिडिओ पहा
↓ रिफ्रेश करण्यासाठी खाली ओढा
💬 चॅटवर शेअर करा 📢 स्टेटसवर शेअर करा
📱 नेटिव्ह शेअर