ब्रेकिंग न्यूज
⚡ SIR Maharashtra: तुम्हाला निवडणूक आयोगाची SIR ची नोटीस आलीय? आता कुठेही धावपळ करायची गरज नाही; आला मोठा नि… ✦ ⚡ शिक्षणाचा खर्च भागवण्यासाठी घेतला शेतीचा निर्णय, श्रेयसने 5 गुंठ्यात केली कमाल, 2 लाख निव्वळ नफा ✦ ⚡ Premanand Maharaj : प्रेमानंद महाराजांच्या शिष्याच्या मृत्यू प्रकरणात ट्विस्ट! खोलीत संशयास्पद वस्तू, CCTV … ✦ ⚡ ५ हजार दिले तरी प्रोटीन दिले नाही, राग अनावर, थेट जीम ट्रेनरची हत्या, जालना हादरलं ✦ ⚡ Asian Games : बुटाचं सोल तुटलं तरीही पोरीनं पटकावलं मेडल; कोण आहे सीमा कुमारी? आईला न सांगताच जपानला पोहोचल… ✦ ⚡ महिन्याला दागिने खरेदी करायची अन् VIDEO बनवयायची, चोरट्यांनी Reel पाहून केलं भयानक काडं, नेमकं काय घडलं? ✦ ⚡ Mumbai Local: मुंबईकर गणेश विसर्जनाला बाहेर पडताय? चर्चगेट ते विरार धावणार जादा गाड्या, पण 84 लोकलचा ‘तो’ थ… ✦ ⚡ Crime : बापाला बायकोने जीवे मारलं, पण पोराला भलत्याच गोष्टीच दुःख, सूनबाई क्रिमिनल का बनली? ✦ ⚡ बाऊन्ड्री लाईनवर थरार, दोन बोटांनी घेतली कॅच, अख्खं स्टेडिअम उभं राहून पाहत राहिलं, VIDEO ✦ ⚡ महिला शेतकऱ्यांसाठी ऑनलाइन प्रमाणपत्र नोंदणी सुरू
SP News Maregaon

अपघात अपडेट..एकाच कुटुंबातील चार पार्थिव निघाल्याने कुटुंबीयांसह नातेवाईकांचा आक्रोश.

71 Views
🔊 बातमी ऐका (Marathi Voice Reader)


– अनेकांचे अश्रूंना अनावर-नियतीने केले चार मुलांना पोरके.

सुरेश पाचभाई मारेगाव,

मारेगांव येथील रफीक व युसूफ हे दोन सख्खे भाऊ होते रफीक भाई हे ऑटोमोबाईलचा व्यवसाय करायचे तर युसूफ भाई थंड पेयाची एजन्सी सह शेती करत होते.व ते आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करत होते.पण नियतीच्या मनात काय असते हे कुणालाच माहिती नसते.

कोणी असे अवेळी अचानक या जगातून निघून जाणे ही मनाला चटका लावून जाणारी घटना काल दिनांक 23 जुन 2023 रोज शुक्रवारला घुग्गुस-चंद्रपूर महामार्गावर घडली.असुन काल ते राजुरा येथुन चंद्रपूर-घुग्गुस मार्गे मारेगांव कडे परत येत होते पण रस्त्यात त्यांच्या बोलेरो वाहनाचा चिंचाळा-नागाळा गावाच्या सुमारास अपघात होऊन चौघे ही ठार झाले होते.

या भीषण अपघातात मारेगाव येथील एकाच कुटुंबातील दोन सख्ख्या भावांसह त्यांच्या अर्धांगिनी असे चार व्यक्ती घटनास्थळीच ठार झाल्याने मारेगांव शहरासह संपुर्ण तालुक्यात एकच खळबळ उडाली होती.

रफीक भाई यांचा मुलगा जावेद हा मुंबईत अभियंता तर मुलगी मुस्कान ही चंद्रपूर येथे एमबीए करतेय.युसूफभाई यांची मुलगी सानिया ही नीटची तयारी करीत आहे तर दुसरी मुलगी तंनवुर ही बी फॉर्म करत आहे.या चारही बालकांच्या आई-वडीलावर काडाने झडप घातल्याने ही बालके पोरकी झाली आहे.

कालच्या त्या घुग्गुस-चंद्रपूर महामार्गावरील बोलेरो अपघातात ठार झाले त्यांचे पार्थिवावर काल चंद्रपूर येथे उत्तरीय तपासणी प्रक्रिया पुर्ण करून रात्री 9 वाजताच्या सुमारास पार्थिव मारेगाव येथे आणन्यात आले.यावेळी कुटुंबीयांसह नातेवाईकांचा आक्रोशाने अनेकांचे अश्रू अनावर झाले होते.

आज दिनांक 24 जुन 2023 रोज शनिवारीला सकाळी 11 वाजता त्यांचे 4 ही पार्थिव अंतविधि साठी निघाले तेव्हा असंख्य नागरिकांच्या उपस्थितीत एकाच वेळी कब्रस्तान कडे कुच केले व चारही पार्थिवांना मुस्लिम रितीरिवाजाने अंतिम विदाई देण्यात आली.

ही बातमी शेअर करा
विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क, मारेगाव विदर्भातील घडामोडींपासून राज्य, देश आणि जगभरातील ताज्या, अचूक व विश्वासार्ह बातम्या सर्वात आधी आपल्या भेटीला. ब्रेकिंग न्यूज, राजकारण, गुन्हे, सामाजिक, कृषी, शिक्षण, क्रीडा, मनोरंजन आणि विशेष रिपोर्ट्स एका क्लिकवर. सत्याला आवाज देणारे, जनतेचा विश्वास जपणारे आपले हक्काचे न्यूज पोर्टल – विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क मारेगाव.
प्रतिक्रिया द्या
⚡ मारेगाव फ्लॅश व्हिडिओ पहा
↓ रिफ्रेश करण्यासाठी खाली ओढा
💬 चॅटवर शेअर करा 📢 स्टेटसवर शेअर करा
📱 नेटिव्ह शेअर