ब्रेकिंग न्यूज
⚡ बॅगेत चाकू आणला, अमरावतीत कॉलेजमध्येच रक्तरंजित राडा, विद्यार्थिनीच्या गळ्यावर सपासप वार, कारण चक्रावून टाक… ✦ ⚡ हे कसले आई-बाप? पोटच्या बाळाला विकून मोबाईल घेतला, छ. संभाजीनगरात भयंकर प्रकार, बारावी फेल डॉक्टरसह 7 जणांन… ✦ ⚡ पुणे हादरलं! बारामतीत माजी सरपंच महिलेसह दोघींचा चिरला गळा, मध्यरात्री झोपेतच डबल मर्डर ✦ ⚡ नाल्यावर हात-पाय धुताना काहीतरी चावले; चार दिवसांनी शेतमजुराचा मृत्यू ✦ ⚡ शिवनी धोबे येथे शेतकरीपुत्राची गळफास घेऊन आत्महत्या ✦ ⚡ कर्ज 9 लाखांचं, 26 लाख देऊनही सावकाराची 25 लाखांची डिमांड, शेतकऱ्यानं पत्नीची माफी मागितली अन्…, कोल्हापू… ✦ ⚡ Jalgaon Cotton Crop News | कपाशीवर लाल्या रोगाचा प्रादुर्भाव,शेतकऱ्यांचं आर्थिक नुकसान | Farmer News ✦ ⚡ शिक्षणानंतर शेती करण्याचं धाडस दाखवलं, तरुण शेतकऱ्यानं केली केळीची लागवड, आता लाखात कमाई ✦ ⚡ SIR Maharashtra: तुम्हाला निवडणूक आयोगाची SIR ची नोटीस आलीय? आता कुठेही धावपळ करायची गरज नाही; आला मोठा नि… ✦ ⚡ शिक्षणाचा खर्च भागवण्यासाठी घेतला शेतीचा निर्णय, श्रेयसने 5 गुंठ्यात केली कमाल, 2 लाख निव्वळ नफा
SP News Maregaon

गुरुकुल कॉन्व्हेंट,मुकुटबन च्या ऋषिकेश मनोज टेंभुरकर चे नवोदय परीक्षेत देदीप्यमान सुयश.

71 Views
🔊 बातमी ऐका (Marathi Voice Reader)

नवोदय विद्यालयासाठी झाली निवड,शाळेची यावर्षीही यशाची परंपरा कायम.

तालुका प्रतिनीधी :-झरी (जामनी) ज्ञानेश्वर आवारी
[88059 79173]

झरी: जवाहर नवोदय विद्यालय निवड समिती अंतर्गत एप्रिल 2023 मध्ये घेण्यात आलेल्या जवाहर नवोदय विद्यालय निवड परीक्षेत गुरुकुल शाळेच्या एका विद्यार्थ्यांने देदीप्यमान यशाला गवसणी घालून शाळेच्या प्रगतीत आणखी एक यशाचा तुरा रोवला.

गुरुकुल कॉन्व्हेंट,मुकुटबन ता.झरी जामनी जि.यवतमाळ येथील एक विद्यार्थी नवोदय परीक्षेत उत्तीर्ण होऊन त्याचे नाव नवोदय च्या प्रॉव्हिजनल यादी मध्ये आले आहेत.यामध्ये ऋषिकेश मनोज टेंभुरकर वर्ग 5 वा चा समावेश आहे.या विद्यार्थ्यांने जिद्द,चिकाटी,मेहनत आणि शिक्षकांचे उल्लेखनीय मार्गदर्शन यामुळे हे यश संपादन केले.

या अगोदर ही प्रत्येक वर्षी या शाळेचे अनेक विद्यार्थी बोर्डाच्या गुणवत्ता यादीत,शिष्यवृत्ती पात्रता यादीत आणि शासनाने घेतलेल्या विविध परीक्षांमध्ये झळकले ही एक वैशिष्ट्य पूर्ण बाब आहे.विद्यार्थ्यांना त्यांच्या या यशासाठी शाळेच्या सर्व शिक्षकांचे योग्य मार्गदर्शन लाभले.

विध्यार्थ्यांनी आपल्या यशाचे श्रेय शाळेचे मुख्याध्यापक सुभाष गजभिये सर,सर्व शिक्षकवृंद,आई वडील व शाळेच्या व्यवस्थापणाला दिले.शाळेच्या तसेच संस्थेच्या वतीने मुख्याध्यापक गजभिये सर यांनी विध्यार्थ्यांचे अभिनंदन केले.

ही बातमी शेअर करा
विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क, मारेगाव विदर्भातील घडामोडींपासून राज्य, देश आणि जगभरातील ताज्या, अचूक व विश्वासार्ह बातम्या सर्वात आधी आपल्या भेटीला. ब्रेकिंग न्यूज, राजकारण, गुन्हे, सामाजिक, कृषी, शिक्षण, क्रीडा, मनोरंजन आणि विशेष रिपोर्ट्स एका क्लिकवर. सत्याला आवाज देणारे, जनतेचा विश्वास जपणारे आपले हक्काचे न्यूज पोर्टल – विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क मारेगाव.
प्रतिक्रिया द्या
⚡ मारेगाव फ्लॅश व्हिडिओ पहा
↓ रिफ्रेश करण्यासाठी खाली ओढा
💬 चॅटवर शेअर करा 📢 स्टेटसवर शेअर करा
📱 नेटिव्ह शेअर