ब्रेकिंग न्यूज
⚡ SIR Maharashtra: तुम्हाला निवडणूक आयोगाची SIR ची नोटीस आलीय? आता कुठेही धावपळ करायची गरज नाही; आला मोठा नि… ✦ ⚡ शिक्षणाचा खर्च भागवण्यासाठी घेतला शेतीचा निर्णय, श्रेयसने 5 गुंठ्यात केली कमाल, 2 लाख निव्वळ नफा ✦ ⚡ Premanand Maharaj : प्रेमानंद महाराजांच्या शिष्याच्या मृत्यू प्रकरणात ट्विस्ट! खोलीत संशयास्पद वस्तू, CCTV … ✦ ⚡ ५ हजार दिले तरी प्रोटीन दिले नाही, राग अनावर, थेट जीम ट्रेनरची हत्या, जालना हादरलं ✦ ⚡ Asian Games : बुटाचं सोल तुटलं तरीही पोरीनं पटकावलं मेडल; कोण आहे सीमा कुमारी? आईला न सांगताच जपानला पोहोचल… ✦ ⚡ महिन्याला दागिने खरेदी करायची अन् VIDEO बनवयायची, चोरट्यांनी Reel पाहून केलं भयानक काडं, नेमकं काय घडलं? ✦ ⚡ Mumbai Local: मुंबईकर गणेश विसर्जनाला बाहेर पडताय? चर्चगेट ते विरार धावणार जादा गाड्या, पण 84 लोकलचा ‘तो’ थ… ✦ ⚡ Crime : बापाला बायकोने जीवे मारलं, पण पोराला भलत्याच गोष्टीच दुःख, सूनबाई क्रिमिनल का बनली? ✦ ⚡ बाऊन्ड्री लाईनवर थरार, दोन बोटांनी घेतली कॅच, अख्खं स्टेडिअम उभं राहून पाहत राहिलं, VIDEO ✦ ⚡ महिला शेतकऱ्यांसाठी ऑनलाइन प्रमाणपत्र नोंदणी सुरू
SP News Maregaon

पार्डी जवळील वर्धा नदीपात्रात आढळला अनोळखी व्यक्तीचा मृतदेह

2.4k Views
🔊 बातमी ऐका (Marathi Voice Reader)

मारेगाव तालुक्यातील  घटना

सुरेश पाचभाई मारेगाव

मारेगाव तालुक्यातील पार्डी येथील वर्धा नदीपात्रात अनोळखी व्यक्तीचा मृतदेह नदीपात्रात तरंगत असल्याची घटना तालुक्यातील पार्डी येथे आढळून आली. सदर घटनेची माहिती पार्डी येथील पोलीस पाटील यांनी मारेगाव पोलिसांना कळविली.मारेगाव पोलिसांनी घटनेचे गांभीर्य लक्षात घेत लगेचच पार्डी गाठत मृतदेहाला बाहेर काढले.

मारेगाव तालुक्याच्या उत्तरेला वर्धा नदी वाहते.नेहमीप्रमाणे वर्धा नदीच्या काठावर शेती असल्याने येथील पोलीस पाटील प्रकाश बालाजी बदखल हे आज दि. 23 मार्चला सकाळी 7.30 वाजता पाण्याची मोटर सुरु करण्याकरिता शेतामध्ये गेले.त्यांच्या बाजूलाच त्यांचे काका खुशाल बदखल यांची शेती आहे.

त्यांच्या शेताच्या बाजूलाच नदीमध्ये एका अनोळखी इसमाचे प्रेत तरंगताना प्रकाश बदखल यांना आढळून आले. या इसमाचे वय अंदाजे 35 ते 40 च्या दरम्यान असून त्याचे अंगात निळा पॅन्ट आणि काळा लालसर चेकचा शर्ट घातलेला आहे. सदर घटनेची माहिती मारेगाव पोलिसांना लगेचच दिली. माहिती मिळताच मारेगाव पोलीस घटनास्थळी दाखल झाले.

घटनास्थळ पंचनामा करून अनोळखी अंदाजे वय 35 ते 40 वर्षाच्या व्यक्तीचा मृतदेह मारेगाव येथील ग्रामीण रुग्णालयात उत्तरीय तपासणीसाठी पाठविण्यात आला आहे. सदर व्यक्तीची ओळख पटलेली नाही.सदर घटनेचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक सुधाकर गावंडे यांचे मार्गदर्शनात जमादार शंकर बारेकर करत आहे.

ही बातमी शेअर करा
विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क, मारेगाव विदर्भातील घडामोडींपासून राज्य, देश आणि जगभरातील ताज्या, अचूक व विश्वासार्ह बातम्या सर्वात आधी आपल्या भेटीला. ब्रेकिंग न्यूज, राजकारण, गुन्हे, सामाजिक, कृषी, शिक्षण, क्रीडा, मनोरंजन आणि विशेष रिपोर्ट्स एका क्लिकवर. सत्याला आवाज देणारे, जनतेचा विश्वास जपणारे आपले हक्काचे न्यूज पोर्टल – विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क मारेगाव.
प्रतिक्रिया द्या
⚡ मारेगाव फ्लॅश व्हिडिओ पहा
↓ रिफ्रेश करण्यासाठी खाली ओढा
💬 चॅटवर शेअर करा 📢 स्टेटसवर शेअर करा
📱 नेटिव्ह शेअर