ब्रेकिंग न्यूज
⚡ SIR Maharashtra: तुम्हाला निवडणूक आयोगाची SIR ची नोटीस आलीय? आता कुठेही धावपळ करायची गरज नाही; आला मोठा नि… ✦ ⚡ शिक्षणाचा खर्च भागवण्यासाठी घेतला शेतीचा निर्णय, श्रेयसने 5 गुंठ्यात केली कमाल, 2 लाख निव्वळ नफा ✦ ⚡ Premanand Maharaj : प्रेमानंद महाराजांच्या शिष्याच्या मृत्यू प्रकरणात ट्विस्ट! खोलीत संशयास्पद वस्तू, CCTV … ✦ ⚡ ५ हजार दिले तरी प्रोटीन दिले नाही, राग अनावर, थेट जीम ट्रेनरची हत्या, जालना हादरलं ✦ ⚡ Asian Games : बुटाचं सोल तुटलं तरीही पोरीनं पटकावलं मेडल; कोण आहे सीमा कुमारी? आईला न सांगताच जपानला पोहोचल… ✦ ⚡ महिन्याला दागिने खरेदी करायची अन् VIDEO बनवयायची, चोरट्यांनी Reel पाहून केलं भयानक काडं, नेमकं काय घडलं? ✦ ⚡ Mumbai Local: मुंबईकर गणेश विसर्जनाला बाहेर पडताय? चर्चगेट ते विरार धावणार जादा गाड्या, पण 84 लोकलचा ‘तो’ थ… ✦ ⚡ Crime : बापाला बायकोने जीवे मारलं, पण पोराला भलत्याच गोष्टीच दुःख, सूनबाई क्रिमिनल का बनली? ✦ ⚡ बाऊन्ड्री लाईनवर थरार, दोन बोटांनी घेतली कॅच, अख्खं स्टेडिअम उभं राहून पाहत राहिलं, VIDEO ✦ ⚡ महिला शेतकऱ्यांसाठी ऑनलाइन प्रमाणपत्र नोंदणी सुरू
SP News Maregaon

12 मे जागतिक परिचारिका दिन 2022 चे औचित्य साधुन एका परिचारिकारीकेने आपली कविता सादर केली आहे.

72 Views
🔊 बातमी ऐका (Marathi Voice Reader)

मारेगांव तालुका प्रतिनिधी:- सुरेश पाचभाई
[9922862184]

“मी परिचारिका”
समाजातील काही ज्ञानी पण अज्ञानी मानसिकता आणि अतीशय हिन विचारसरणी असलेल्या… काही लोकांनी मला आज हि कविता लिहण्यास उदुयुक्त केले.
पचतयं काय बघा..
गिळल्या जातंय काय बघा..

परिचारिका नसल्या तर काय होईल याची जरा कल्पना करा आणि तुमच्या निच विचारांना थोडी तरी लाज वाटू दया!!

अरे आधुनिक युगातील सुशिक्षित माणसा ” परिचारिकेला”आदराच्या नजरेने बघ! !

तिच्यात तुझी आई- बहिण आणि समस्त स्त्री जन्म बघ !!
या सर्व हिन विचारसरणीला माझी ही धडाकेबाज चपराक ( रट्टा)आहे.
कारण मी आजन्म “परिचारिकाच” आहे.
तोलतोय काय माझी व्यथा पुढे ऐका माझ्या कर्माची कथा
तुझ्या आई- बहीण, मावशी,आत्या आणि समस्त स्त्री वर्ग…
त्यांच्या जन्मापासून ते मरणापर्यंतच्या काळात ( गरोदर,प्रसुती )
कठीणप्रसंगी त्यांचा धिर, सांत्वना, काळजी, उपचार आपुलकी देणारी… आणी त्यांच्या हातात तुमच्या ओंजळीत स्वच्छ ट्रे मध्ये एका निरागस बाळाला तुम्हाला सोपवून…. परिवाराच्या चेहऱ्यावर अथांग आनंद फुलवणारी कोण असते?

मि ” परिचारिकाच”असते..

तुमच बाळ तुमच्या स्वाधीन करून नुसती तिची जबाबदारी संपलेली नसते शून्य ते दहावर्षापर्यंतच तुमच चीमुर्ड निरोगी राहावं ,त्याचं आजारांपासून रक्षण व्हाव म्हणुन..
दुर्गम भागात, माळरानात, नदी नाल्यातून अंधाराची, काट्याकुट्याची, रस्त्यांची तमा न बाळगता स्वतःची पर्वा न करता सुरक्षेचा कवच तुमच्या लेकरांना- लसिकरणातून देते..
ती कोण असते…. ?

मि परिचारिकाच असते….
शासनाने राबविलेल्या सर्व योजनांची माहिती, जनजागृती करून त्यांना लाभ मिळवून देणारी, पाठपुरावा करणारी कोण असते…?

मी परिचारिकाच असते….
अंधश्रध्दे्नी ग्रासलेल्या. ..काही दुर्गम भागात वेळोवेळी उपस्थित राहुन त्यांच्या विचारात परिवर्तन घडवून त्यांना रुग्णालयाचे, आरोग्याचे महत्त्व पटवून देवुन प्रात्यक्षिकरीत्या रुग्णालयात घेवुन येण्याचे काम कोण करते…?

मी “परिचारिकाच” असते…
कोरोनाच्या(महामारी) काळात स्वतःची ,लेकरांची
घरादाराची, परिवाराची काळजी न करता केवळ रुग्णसेवा हाच तिचा वसा असतो, स्वतः पेक्षा रुग्णाचा जीव जास्त
महत्त्वाचा असतो ….. जि दिवसरात्र केवळ रुग्णाचे हित ,अविरत सेवा त्यांचा जीव वाचविते… धडपडते ती कोण असते…..?

मी परिचारिकाच असते..
‘अपघात ‘ झाल्यावर सर्वात आधी रुग्णालयात धावपळ करून तत्काळ प्रथमोउपचार  पुरवणारी रुग्णाच्या नातेवाईकांचा रोष ,आक्रोश ,अवाच्छ बोलण्याला बळी पडणारी कोण असते हो…?
मी परिचारिकाच असते…

भरती रुग्णांना त्यांच्या वेदना ,दुःख दुर करुन त्यांच्या चेहऱ्यावर आनंदाची किरणे पाडणारी कोण असते..

मी परिचारिकाच असते…..
वृद्धांना जेव्हा नातेवाईक ओझं म्हणुन रुग्णालयात आजारी असल्याने दाखल करून जातात.. मात्र त्यांना घरी घेवुन जाण्यास परत येत नाहीत ….तेव्हा त्यांची दैंनंदिन परिचर्या, काळजी, उपचार त्यांना मानसोपचार धीर… सांत्वना करणारी कोण असते… हो….?

मी “परिचारिकाच” असते..
तुमच्या जन्मापासून ( श्वास सुरु झाल्यापासून) ते अखेरच्या क्षणापर्यंत (श्वास बंद पडेपर्यंत) कोण असते.. हो.?
मी परिचारिकाच असते….
अशी सुंदर कविता एका परिचारिकारीकेने आपल्या कवितेतुन मांडली आहे.
परिचारिकेचे नाव :- जयश्री इंगोले ( कावडे)
यांनी सादर केली आहे.

ही बातमी शेअर करा
विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क, मारेगाव विदर्भातील घडामोडींपासून राज्य, देश आणि जगभरातील ताज्या, अचूक व विश्वासार्ह बातम्या सर्वात आधी आपल्या भेटीला. ब्रेकिंग न्यूज, राजकारण, गुन्हे, सामाजिक, कृषी, शिक्षण, क्रीडा, मनोरंजन आणि विशेष रिपोर्ट्स एका क्लिकवर. सत्याला आवाज देणारे, जनतेचा विश्वास जपणारे आपले हक्काचे न्यूज पोर्टल – विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क मारेगाव.
प्रतिक्रिया द्या
⚡ मारेगाव फ्लॅश व्हिडिओ पहा
↓ रिफ्रेश करण्यासाठी खाली ओढा
💬 चॅटवर शेअर करा 📢 स्टेटसवर शेअर करा
📱 नेटिव्ह शेअर