ब्रेकिंग न्यूज
⚡ Mumbai Local: मुंबईकर गणेश विसर्जनाला बाहेर पडताय? चर्चगेट ते विरार धावणार जादा गाड्या, पण 84 लोकलचा ‘तो’ थ… ✦ ⚡ Crime : बापाला बायकोने जीवे मारलं, पण पोराला भलत्याच गोष्टीच दुःख, सूनबाई क्रिमिनल का बनली? ✦ ⚡ बाऊन्ड्री लाईनवर थरार, दोन बोटांनी घेतली कॅच, अख्खं स्टेडिअम उभं राहून पाहत राहिलं, VIDEO ✦ ⚡ महिला शेतकऱ्यांसाठी ऑनलाइन प्रमाणपत्र नोंदणी सुरू ✦ ⚡ Woman Farmer: कारभारणीचा ‘महिला शेतकरी’ म्हणून भरा अर्ज, सरकारी योजनांचा मिळेल लाभ, कोणती लागेल कागदपत्रं? ✦ ⚡ विदर्भाच्या ‘समृद्धी’चा मार्ग मोकळा! 42 हजार कोटींचा प्लॅन, 3 नवे महामार्ग होणार, कुठून कुठं जाणार? ✦ ⚡ Vasai-Virar Mahapalika मध्ये कर्मचारी भरतीवरून राडा, भाजप आणि बविआ आमने-सामनेे ✦ ⚡ एक शेळीपासून सुरू केलेला व्यवसाय, आता 40 शेळ्यांचा मालक, सिद्धेश्वर यांचा वर्षाचा कमाईचा आकडा पाहाच! ✦ ⚡ गौरीपूजनाला गावी गेले, छ. संभाजीनगरात 4 घरं फोडली; लाखोंची लूट, पण 4 तोळ्यांचा हार तिथंच फेकला, शॉकिंग कारण… ✦ ⚡ Superfast 100 News | सुपरफास्ट बातम्या | 23 September | Sunil Shelke News | SIM Cars News | Fadnavis
SP News Maregaon

मांडवा येथिल सरपंचा कडून घर कुल मिळवून देण्यासाठी पैशाची मागणी करत असल्याची गावकऱ्यानी दिली तक्रार….

73 Views
🔊 बातमी ऐका (Marathi Voice Reader)

# सरपंच आत्राम यांचे पद रद्द करा
# ग्रामवासीयांची बिडिओ मार्फत जिल्हाधिकारी व मुख्य कार्यपालन अधिकारी यांचेकडे तक्रार

# तो मी नसल्याचे सरपंचाचे मत..



तालुका प्रतिनीधी :-झरी (जामणी) ज्ञानेश्वर आवारी. ( 88059 79173)



सविस्तर वृत्त असे की….
झरी तालुक्यातील
मांडवा येथिल नागरिकांनी सरपंच गंगाधर अय्या आत्राम हे घरकुल योजनेचा लाभ मिळवून देण्यासाठी चक्क पाच हजार , दहा हजार रुपये मागणी करत असल्याची तक्रार केली आहे. घरकुलाचा लाभ मिळणार या आशेने गावातील काही नागरिकांनी सरपंच आत्राम यांचे कडे पैसे दिले आहे. घरकुल मंजूर झाल्यानंतर पहिला चेक काढून देतो तेव्हा आणखी पाच हजार रुपये द्यावे लागतील अशा प्रकारचे बोलने झाले आहे .



परंतु मांडवा गावातील काही नागरिकांनी मागणी प्रमाणे पैसे न दिल्यामुळे तुम्हाला घरकुलाचा लाभ मिळू देणार नाही व तुमचे नाव यादित येऊ देणार नाही .अशा पद्धतीची दम भरविण्याची भाषा सरपंच बोलत असल्याने ती व्यक्ती पदाचा गैरवापर करत आहे . आत्राम यांचे सरपंच रद्द करण्यात यावे व त्याचा वर कारवाई करण्यात यावी अशी मागणी सुनिता गेडाम , संगिता जुमनाके , संगिता मेश्राम , कामुना मेश्राम , रंजना नैताम , लक्ष्मी आत्राम , निर्मला सोयाम , रुंदा
सोयाम , मंगला सोयाम . , रेणुका सिडाम इ. गावातील महिलांनी गटविकास अधिकारी झरी गजानन मुंडकर यांचे कडे केली आहे .


”” सरपंच मांडावा ब्राईट,मी कोणत्याही घरकुल लाभार्थ्यांकडून पैसे घेतले नाही किंवा मागीतले नाही माझ्यावर खोटे आरोप खोटे असून बदनामी करण्याचा प्रयत्न केला जात आहे”
गंगाधर अय्या आत्राम
सरपंच गट ग्राम पंचायत
मांडवा

ही बातमी शेअर करा
विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क, मारेगाव विदर्भातील घडामोडींपासून राज्य, देश आणि जगभरातील ताज्या, अचूक व विश्वासार्ह बातम्या सर्वात आधी आपल्या भेटीला. ब्रेकिंग न्यूज, राजकारण, गुन्हे, सामाजिक, कृषी, शिक्षण, क्रीडा, मनोरंजन आणि विशेष रिपोर्ट्स एका क्लिकवर. सत्याला आवाज देणारे, जनतेचा विश्वास जपणारे आपले हक्काचे न्यूज पोर्टल – विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क मारेगाव.
प्रतिक्रिया द्या
⚡ मारेगाव फ्लॅश व्हिडिओ पहा
↓ रिफ्रेश करण्यासाठी खाली ओढा
💬 चॅटवर शेअर करा 📢 स्टेटसवर शेअर करा
📱 नेटिव्ह शेअर