ब्रेकिंग न्यूज
⚡ SIR Maharashtra: तुम्हाला निवडणूक आयोगाची SIR ची नोटीस आलीय? आता कुठेही धावपळ करायची गरज नाही; आला मोठा नि… ✦ ⚡ शिक्षणाचा खर्च भागवण्यासाठी घेतला शेतीचा निर्णय, श्रेयसने 5 गुंठ्यात केली कमाल, 2 लाख निव्वळ नफा ✦ ⚡ Premanand Maharaj : प्रेमानंद महाराजांच्या शिष्याच्या मृत्यू प्रकरणात ट्विस्ट! खोलीत संशयास्पद वस्तू, CCTV … ✦ ⚡ ५ हजार दिले तरी प्रोटीन दिले नाही, राग अनावर, थेट जीम ट्रेनरची हत्या, जालना हादरलं ✦ ⚡ Asian Games : बुटाचं सोल तुटलं तरीही पोरीनं पटकावलं मेडल; कोण आहे सीमा कुमारी? आईला न सांगताच जपानला पोहोचल… ✦ ⚡ महिन्याला दागिने खरेदी करायची अन् VIDEO बनवयायची, चोरट्यांनी Reel पाहून केलं भयानक काडं, नेमकं काय घडलं? ✦ ⚡ Mumbai Local: मुंबईकर गणेश विसर्जनाला बाहेर पडताय? चर्चगेट ते विरार धावणार जादा गाड्या, पण 84 लोकलचा ‘तो’ थ… ✦ ⚡ Crime : बापाला बायकोने जीवे मारलं, पण पोराला भलत्याच गोष्टीच दुःख, सूनबाई क्रिमिनल का बनली? ✦ ⚡ बाऊन्ड्री लाईनवर थरार, दोन बोटांनी घेतली कॅच, अख्खं स्टेडिअम उभं राहून पाहत राहिलं, VIDEO ✦ ⚡ महिला शेतकऱ्यांसाठी ऑनलाइन प्रमाणपत्र नोंदणी सुरू
SP News Maregaon

कोतवाल हा तहसीलचा कणा आहे.

89 Views
🔊 बातमी ऐका (Marathi Voice Reader)

-तहसीलदार उत्तम निलावाड
-नवरगांव येथील कार्यक्रमामध्ये केले वक्तव्य.

विदर्भ एस पि न्युज नेटवर्क: मारेगाव,

मारेगांव:-कोतवाल हा तहसीलचा कणा आहे.त्यांच्याशिवाय अनेक कामे अपूर्ण आहे.पद कोणतेही असले तरी ते लहान नसते.त्या पदाला न्याय देण्याचे काम खऱ्या अर्थाने तुम्ही कोतवाल लोक करीत आहात असे वक्तव्य तहसीलदार उत्तम निलावाड यांनी केले.

ते कोतवाल संघटनेतर्फे दि.25 जूनला नवरगांव येथील स्नेहभोज कार्यक्रमाच्या अध्यक्ष स्थानावरून बोलत होते.प्रमुख अतिथी म्हणून सेवानिवृत्त तलाठी रामदास वरारकर,क.ली. गजानन ढेंगळे,तुळसामाता देवस्थान नवरगांवचे सचिव विलास नक्षीने,कोतवाल संघटनेचे जिल्हा अध्यक्ष शशिकांत निमसटकर उपस्थित होते.

यावेळी पुढे बोलतांना तहसीलदार निलावाड म्हणाले की, तहसील कार्यालयामध्ये अशी अनेक कामे आहेत जी कोतवाल सक्षमपणे करू शकतात.व्यक्ती हा पदाने लहान किंवा मोठा होत नसतो तर कार्य करण्याची उर्मी आणि कार्यनिष्ठा ही त्या व्यक्तीला महान बनवत असते.

काही ठिकाणी रेतीच्या अवैध वाहतुकीवर आम्ही धाडी टाकल्या त्यावेळीही आम्हाला कोतवाल बांधवांचे मोठे सहकार्य लाभले.कदाचित त्यांच्याविना ही प्रक्रिया अधुरी राहिली असती असेही तहसीलदार निलावाड म्हणाले.

कार्यक्रमाचे संचालन तालुका अध्यक्ष सुरेश येरमे यांनी, प्रास्ताविक अतुल बोबडे यांनी तर आभार प्रदर्शन कु.रोशनी वरखडे यांनी केले.यावेळी कार्यक्रमाला तालुक्यातील सर्व कोतवाल बांधव त्यांच्या कुटुंबियांसमवेत उपस्थित होते.

ही बातमी शेअर करा
विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क, मारेगाव विदर्भातील घडामोडींपासून राज्य, देश आणि जगभरातील ताज्या, अचूक व विश्वासार्ह बातम्या सर्वात आधी आपल्या भेटीला. ब्रेकिंग न्यूज, राजकारण, गुन्हे, सामाजिक, कृषी, शिक्षण, क्रीडा, मनोरंजन आणि विशेष रिपोर्ट्स एका क्लिकवर. सत्याला आवाज देणारे, जनतेचा विश्वास जपणारे आपले हक्काचे न्यूज पोर्टल – विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क मारेगाव.
प्रतिक्रिया द्या
⚡ मारेगाव फ्लॅश व्हिडिओ पहा
↓ रिफ्रेश करण्यासाठी खाली ओढा
💬 चॅटवर शेअर करा 📢 स्टेटसवर शेअर करा
📱 नेटिव्ह शेअर