ब्रेकिंग न्यूज
⚡ ५ हजार दिले तरी प्रोटीन दिले नाही, राग अनावर, थेट जीम ट्रेनरची हत्या, जालना हादरलं ✦ ⚡ Asian Games : बुटाचं सोल तुटलं तरीही पोरीनं पटकावलं मेडल; कोण आहे सीमा कुमारी? आईला न सांगताच जपानला पोहोचल… ✦ ⚡ महिन्याला दागिने खरेदी करायची अन् VIDEO बनवयायची, चोरट्यांनी Reel पाहून केलं भयानक काडं, नेमकं काय घडलं? ✦ ⚡ Mumbai Local: मुंबईकर गणेश विसर्जनाला बाहेर पडताय? चर्चगेट ते विरार धावणार जादा गाड्या, पण 84 लोकलचा ‘तो’ थ… ✦ ⚡ Crime : बापाला बायकोने जीवे मारलं, पण पोराला भलत्याच गोष्टीच दुःख, सूनबाई क्रिमिनल का बनली? ✦ ⚡ बाऊन्ड्री लाईनवर थरार, दोन बोटांनी घेतली कॅच, अख्खं स्टेडिअम उभं राहून पाहत राहिलं, VIDEO ✦ ⚡ महिला शेतकऱ्यांसाठी ऑनलाइन प्रमाणपत्र नोंदणी सुरू ✦ ⚡ Woman Farmer: कारभारणीचा ‘महिला शेतकरी’ म्हणून भरा अर्ज, सरकारी योजनांचा मिळेल लाभ, कोणती लागेल कागदपत्रं? ✦ ⚡ विदर्भाच्या ‘समृद्धी’चा मार्ग मोकळा! 42 हजार कोटींचा प्लॅन, 3 नवे महामार्ग होणार, कुठून कुठं जाणार? ✦ ⚡ Vasai-Virar Mahapalika मध्ये कर्मचारी भरतीवरून राडा, भाजप आणि बविआ आमने-सामनेे
SP News Maregaon

भरधाव वाहनाची दुचाकीला धडक; दुचाकीस्वाराचा जागीच मृत्यू

2.4k Views
🔊 बातमी ऐका (Marathi Voice Reader)

राज्य महामार्गावरील बोटोनी ते जळका दरम्यानची घटना

सुरेश पाचभाई मारेगाव

साळ्याला पोहोचवून आपल्या गावी परत निघालेल्या दुचाकीस्वाराला एका अज्ञात वाहणाने समोरून जोरदार धडक दिली. यात दुचाकीस्वाराचा जागीच मृत्यू झाला. सदर घटना मारेगाव तालुक्यातील राज्य महामार्गावरील बोटोनी ते जळका दरम्यान असलेल्या डाम टेकडीजवळ आज दिनांक 30 मे 2025 रोज शुक्रवारला सकाळी 8 वाजताच्या सुमारास घडली.

प्रदीप गुंवत राऊत वय अंदाजे 40 वर्षे रा.आवळगाव ता.मारेगाव असे अपघातात मृत्यू झालेल्या व्यक्तींचे नाव आहेत.प्रदीप हा आज सकाळी 6 वाजता आवळगाव येथून साळ्याला सोडण्यासाठी खंडणी येथे गेला होता.तेथील काम आटोपून तो बोटोनी- करंजी मार्गे स्वगावी आवळगाव येथे जाण्याकरिता निघाला. पण रस्त्यातच अज्ञात वाहनाने त्याच्या दुचाकीला जबर धडक दिली. यात त्याचा दुर्दैवी मृत्यू झाला.

रस्त्याने ये – जा करणाऱ्या काही नागरिकांनी सदर घटनेची माहिती लगेच मारेगाव पोलिसांना दिली.माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले. व त्याला प्राथमिक उपचारासाठी ग्रामीण रुग्णालय मारेगाव येथे दाखल करण्यात आले. पण तेथील डॉक्टरांनी प्रदीप याला तपासून मृत घोषित केले. प्रदीप यांच्या पश्चात आई,पत्नी,भाऊ, दोन मुले असा आप्त परिवार आहे.सदर अपघाताचा पुढील तपास मारेगाव पोलीस करीत आहे. 

ही बातमी शेअर करा
विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क, मारेगाव विदर्भातील घडामोडींपासून राज्य, देश आणि जगभरातील ताज्या, अचूक व विश्वासार्ह बातम्या सर्वात आधी आपल्या भेटीला. ब्रेकिंग न्यूज, राजकारण, गुन्हे, सामाजिक, कृषी, शिक्षण, क्रीडा, मनोरंजन आणि विशेष रिपोर्ट्स एका क्लिकवर. सत्याला आवाज देणारे, जनतेचा विश्वास जपणारे आपले हक्काचे न्यूज पोर्टल – विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क मारेगाव.
प्रतिक्रिया द्या
⚡ मारेगाव फ्लॅश व्हिडिओ पहा
↓ रिफ्रेश करण्यासाठी खाली ओढा
💬 चॅटवर शेअर करा 📢 स्टेटसवर शेअर करा
📱 नेटिव्ह शेअर