ब्रेकिंग न्यूज
⚡ नाल्यावर हात-पाय धुताना काहीतरी चावले; चार दिवसांनी शेतमजुराचा मृत्यू ✦ ⚡ शिवनी धोबे येथे शेतकरीपुत्राची गळफास घेऊन आत्महत्या ✦ ⚡ Jalgaon Cotton Crop News | कपाशीवर लाल्या रोगाचा प्रादुर्भाव,शेतकऱ्यांचं आर्थिक नुकसान | Farmer News ✦ ⚡ शिक्षणानंतर शेती करण्याचं धाडस दाखवलं, तरुण शेतकऱ्यानं केली केळीची लागवड, आता लाखात कमाई ✦ ⚡ SIR Maharashtra: तुम्हाला निवडणूक आयोगाची SIR ची नोटीस आलीय? आता कुठेही धावपळ करायची गरज नाही; आला मोठा नि… ✦ ⚡ शिक्षणाचा खर्च भागवण्यासाठी घेतला शेतीचा निर्णय, श्रेयसने 5 गुंठ्यात केली कमाल, 2 लाख निव्वळ नफा ✦ ⚡ Premanand Maharaj : प्रेमानंद महाराजांच्या शिष्याच्या मृत्यू प्रकरणात ट्विस्ट! खोलीत संशयास्पद वस्तू, CCTV … ✦ ⚡ Premanand Maharaj : प्रेमानंद महाराजांच्या शिष्याच्या मृत्यू प्रकरणात ट्विस्ट! खोलीत संशयास्पद वस्तू, CCTV … ✦ ⚡ ५ हजार दिले तरी प्रोटीन दिले नाही, राग अनावर, थेट जीम ट्रेनरची हत्या, जालना हादरलं ✦ ⚡ Asian Games : बुटाचं सोल तुटलं तरीही पोरीनं पटकावलं मेडल; कोण आहे सीमा कुमारी? आईला न सांगताच जपानला पोहोचल…
SP News Maregaon

आनंद हेच जीवनाचे अंतिम ध्येय असावे

4 Views
🔊 बातमी ऐका (Marathi Voice Reader)

प्रा. दिलीप अलोने यांचे मार्डी येथील विद्यार्थ्यांना मार्गदर्शन

सुरेश पाचभाई / मारेगाव

आनंद हेच जीवनाचे अंतिम ध्येय असावे. जीवन कसे असावे यापेक्षा विद्यार्थ्यांनी आनंददायी जीवन जगण्यावर भर द्यावा. निरपेक्ष, निर्विकार आणि दुसऱ्याला दुःखी न करता मिळणारा आनंद हाच खरा आनंद आहे, असे प्रतिपादन प्रा. दिलीप अलोने यांनी केले.

ते मार्डी येथील आदर्श हायस्कूल तथा कला उच्च माध्यमिक विद्यालयात आयोजित “यही है जिंदगी” या विषयावरील मार्गदर्शनपर कार्यक्रमात बोलत होते. यावेळी शिक्षण प्रसारक समितीचे अध्यक्ष जयसिंग पाटील गोहोकर हे अध्यक्षस्थानी होते.

प्रमुख पाहुणे म्हणून मार्डीच्या उपसरपंच शोभा कालर, किन्हाळा येथील सरपंच शुभम भोयर, ग्रामपंचायत सदस्य सुरेश चांगले, गणेश कनाके, देवाळा येथील उपसरपंच सुरेश लांडे, दिवाकर पंडिले, प्राचार्य सुमित आवारी, मुख्याध्यापक अनंत शिवरकर उपस्थित होते.
प्रा. अलोने पुढे म्हणाले, विद्यार्थी जीवनात इतिहास बदलू शकतात.

किती वाचले यापेक्षा वाचलेले कितपत समजले आणि लक्षात राहिले याला महत्त्व द्यावे. विद्यार्थ्यांमध्ये विविध कलागुण असतात. त्यांची ओळख करून जीवनाचे ध्येय निश्चित करावे. शिक्षण घेत असताना केवळ गुणांचा विचार न करता ज्ञान संपादनावर भर द्यावा.

तणाव न घेता आत्मविश्वासाने वाटचाल केल्यास यश निश्चित मिळते.
कार्यक्रमात उपसरपंच शोभा कालर यांनी विद्यार्थ्यांना प्रेरणादायी मनोगत व्यक्त केले. अध्यक्ष जयसिंग पाटील गोहोकर यांनीही विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक मुख्याध्यापक अनंत शिवरकर यांनी केले. संचालन हर्षदा गानफाडे यांनी तर आभार कोमल डाखूरे यांनी मानले. कार्यक्रमाला शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, पालक व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

ही बातमी शेअर करा
विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क, मारेगाव विदर्भातील घडामोडींपासून राज्य, देश आणि जगभरातील ताज्या, अचूक व विश्वासार्ह बातम्या सर्वात आधी आपल्या भेटीला. ब्रेकिंग न्यूज, राजकारण, गुन्हे, सामाजिक, कृषी, शिक्षण, क्रीडा, मनोरंजन आणि विशेष रिपोर्ट्स एका क्लिकवर. सत्याला आवाज देणारे, जनतेचा विश्वास जपणारे आपले हक्काचे न्यूज पोर्टल – विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क मारेगाव.
प्रतिक्रिया द्या
⚡ मारेगाव फ्लॅश व्हिडिओ पहा
↓ रिफ्रेश करण्यासाठी खाली ओढा
💬 चॅटवर शेअर करा 📢 स्टेटसवर शेअर करा
📱 नेटिव्ह शेअर