ब्रेकिंग न्यूज
⚡ SIR Maharashtra: तुम्हाला निवडणूक आयोगाची SIR ची नोटीस आलीय? आता कुठेही धावपळ करायची गरज नाही; आला मोठा नि… ✦ ⚡ शिक्षणाचा खर्च भागवण्यासाठी घेतला शेतीचा निर्णय, श्रेयसने 5 गुंठ्यात केली कमाल, 2 लाख निव्वळ नफा ✦ ⚡ Premanand Maharaj : प्रेमानंद महाराजांच्या शिष्याच्या मृत्यू प्रकरणात ट्विस्ट! खोलीत संशयास्पद वस्तू, CCTV … ✦ ⚡ ५ हजार दिले तरी प्रोटीन दिले नाही, राग अनावर, थेट जीम ट्रेनरची हत्या, जालना हादरलं ✦ ⚡ Asian Games : बुटाचं सोल तुटलं तरीही पोरीनं पटकावलं मेडल; कोण आहे सीमा कुमारी? आईला न सांगताच जपानला पोहोचल… ✦ ⚡ महिन्याला दागिने खरेदी करायची अन् VIDEO बनवयायची, चोरट्यांनी Reel पाहून केलं भयानक काडं, नेमकं काय घडलं? ✦ ⚡ Mumbai Local: मुंबईकर गणेश विसर्जनाला बाहेर पडताय? चर्चगेट ते विरार धावणार जादा गाड्या, पण 84 लोकलचा ‘तो’ थ… ✦ ⚡ Crime : बापाला बायकोने जीवे मारलं, पण पोराला भलत्याच गोष्टीच दुःख, सूनबाई क्रिमिनल का बनली? ✦ ⚡ बाऊन्ड्री लाईनवर थरार, दोन बोटांनी घेतली कॅच, अख्खं स्टेडिअम उभं राहून पाहत राहिलं, VIDEO ✦ ⚡ महिला शेतकऱ्यांसाठी ऑनलाइन प्रमाणपत्र नोंदणी सुरू
SP News Maregaon

दीर्घ विश्रांती नंतर तालुक्यात पाऊसाला प्रारंभ.

87 Views
🔊 बातमी ऐका (Marathi Voice Reader)

– वातावरणात गारवा..उकाड्यापासून मुक्ती
-मारेगांव तालुक्यात शेतीच्या कामाची लगबग.

विदर्भ एस पि न्युज नेटवर्क: मारेगाव,

मारेगांव तालुक्यात पंचवीस दिवसाच्या दीर्घ विश्रांती नंतर काल रात्री पासुन पाऊसाला सुरुवात झाली आहे.तर आज दिनांक 26 जुन 2023 रोज सोमवारला सकाळी 6 वाजता पासूनच पाऊसाने हजेरी लावली असुन काही शेतकऱ्यानी धुळ पेरणी केली होती.

पाऊस येत नसल्याने अनेक शेतकऱ्याचा नजरा आकाश कडे लागल्या होत्या तर काही शेतकऱ्याच्या शेतात सिंचनाची सोय असल्याने त्यांची सिंचनाची लगबग सुरू झाली होती.शेतकरी हा जगाचा पोशिंदा आहे.पण या वर्षी जुन महिना 25 दिवस कोरडा गेल्याने अनेक शेतकऱ्यांचे बियाणे जाण्याच्या मार्गावर आहे.

ऐन जुन महिना कोरडा गेल्याने अनेक शेतकऱ्याला दुबार पेरणीचे संकट येण्याची शक्याता नाकारता येत नाही.आधीच मागच्या वर्षी आलेल्या अती वृष्टी व दुष्काळ आणि पुरबुडाई मुळे शेतकरी मेटीकुटीस येवून आहे.आणि त्यातच या वर्षी सुरुवातीलाच निसर्गच्या प्रकोपाने अनेक शेतकऱ्याला आर्थिक संकटाचा सामना करावा लागणार आहे.

मारेगाव तालुका हा आदिवासी बहुल तालुका असुन या तालुक्यात अल्पभूधारक शेतकऱ्याची संख्या अधिक आहे.त्यातच मारेगांव तालुका हा यवतमाळ जिल्ह्यात आत्महत्येस प्रसिद्ध असुन येथील शेतकऱ्यावर दुबार पेरणीचे संकट येण्याचे शक्यता नाकारता येत नाही.

कधी अतीवृष्टी,दुष्काळ तर कधी पुरबुडाई या नैसर्गिक संकटा मुळे तालुक्यातील शेतकरी हा मेटीकुटीस आला आहे.

ही बातमी शेअर करा
विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क, मारेगाव विदर्भातील घडामोडींपासून राज्य, देश आणि जगभरातील ताज्या, अचूक व विश्वासार्ह बातम्या सर्वात आधी आपल्या भेटीला. ब्रेकिंग न्यूज, राजकारण, गुन्हे, सामाजिक, कृषी, शिक्षण, क्रीडा, मनोरंजन आणि विशेष रिपोर्ट्स एका क्लिकवर. सत्याला आवाज देणारे, जनतेचा विश्वास जपणारे आपले हक्काचे न्यूज पोर्टल – विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क मारेगाव.
प्रतिक्रिया द्या
⚡ मारेगाव फ्लॅश व्हिडिओ पहा
↓ रिफ्रेश करण्यासाठी खाली ओढा
💬 चॅटवर शेअर करा 📢 स्टेटसवर शेअर करा
📱 नेटिव्ह शेअर