ब्रेकिंग न्यूज
⚡ SIR Maharashtra: तुम्हाला निवडणूक आयोगाची SIR ची नोटीस आलीय? आता कुठेही धावपळ करायची गरज नाही; आला मोठा नि… ✦ ⚡ शिक्षणाचा खर्च भागवण्यासाठी घेतला शेतीचा निर्णय, श्रेयसने 5 गुंठ्यात केली कमाल, 2 लाख निव्वळ नफा ✦ ⚡ Premanand Maharaj : प्रेमानंद महाराजांच्या शिष्याच्या मृत्यू प्रकरणात ट्विस्ट! खोलीत संशयास्पद वस्तू, CCTV … ✦ ⚡ ५ हजार दिले तरी प्रोटीन दिले नाही, राग अनावर, थेट जीम ट्रेनरची हत्या, जालना हादरलं ✦ ⚡ Asian Games : बुटाचं सोल तुटलं तरीही पोरीनं पटकावलं मेडल; कोण आहे सीमा कुमारी? आईला न सांगताच जपानला पोहोचल… ✦ ⚡ महिन्याला दागिने खरेदी करायची अन् VIDEO बनवयायची, चोरट्यांनी Reel पाहून केलं भयानक काडं, नेमकं काय घडलं? ✦ ⚡ Mumbai Local: मुंबईकर गणेश विसर्जनाला बाहेर पडताय? चर्चगेट ते विरार धावणार जादा गाड्या, पण 84 लोकलचा ‘तो’ थ… ✦ ⚡ Crime : बापाला बायकोने जीवे मारलं, पण पोराला भलत्याच गोष्टीच दुःख, सूनबाई क्रिमिनल का बनली? ✦ ⚡ बाऊन्ड्री लाईनवर थरार, दोन बोटांनी घेतली कॅच, अख्खं स्टेडिअम उभं राहून पाहत राहिलं, VIDEO ✦ ⚡ महिला शेतकऱ्यांसाठी ऑनलाइन प्रमाणपत्र नोंदणी सुरू
SP News Maregaon

रेतीच नाही तर घर बाधणार कसे ?

141 Views
🔊 बातमी ऐका (Marathi Voice Reader)

रेती उपलब्ध करून द्यावी या मागणीसाठी  घरकूल लाभार्थ्यांचे निवेदन

नाहीतर पंधरा हजार परत करण्याचा इशारा

उपसंपादक झरी (जामनी) ज्ञानेश्वर आवारी

झरी जामणी मोदी आवास योजना अंतर्गत अनेक लाभार्थ्यांना घरकुल मंजूर करण्यात आले.रेती अभावी बांधकाम सुरु झाले नसल्यामुळे कमी दरात रेती उपलब्ध करून देण्याची मागणी मार्की येथिल घरकुल लाभार्थ्यांनी प्रभारी तहसीलदार महेश रामंगुडे यांचे कडे रेती उपलब्ध करून देण्याची मागणी केली आहे.

तालुक्यात मोदी आवास योजनेंतर्गत अनेकांना घरकुल मंजूर करण्यात आले.माननीय पंतप्रधान मोदी यांनी यवतमाळ येथित कार्यक्रमात लाभार्थ्यांच्या खात्यात पंधरा हजार रुपये जमा केले.बांधकाम सुरू करण्याचे हेतून जूने जिर्ण घर मोडून पाया खांद्याला सुरुवात केली.विटा सिंमेट,गिट्टी,सलाख इ .बांधकाम साहित्याचे गोळा केले आहे.

परंतु रेती मिळत नसल्याने बांधाकाम करावे तरी कसे ?असा प्रश्न पडला आहे.अनेकांनी आपले जुने घर मोडून उघड्यावरच संसार मांडला आहे.यातील सर्वच लाभार्थी शेतमजूर,अल्प व अत्यल्प भूधारक शेतकरी आहे.या उन्हाळ्याच्या दोन महिन्यांत बांधकाम होणे गरजेचे आहे कारण नंतर शेतीचा हंगाम सुरू होतो.परंतु रेती मिळत नसल्याने कुणीच  बांधकामांची सुरुवात केली नाही.

तरी प्रशासाने मागणीची दखल घेऊन शक्य तितक्या लवकर रेती उपलब्ध करून द्यावी.अन्यथा खात्यावर जमा केलेले पंदरा हजार रुपये परत करण्याचा इशारा मोरेश्वर थेरे,निलेश मिलमिले,प्रविण थेरे , अनिल आवारी,गजानन मिलमिले,अनिल देवाळकर संदिप थेरे, संतोष देवताळे,बाबाराव आवारी,भास्कर देवाळकर,दिवाकर बोबाटे इत्यादी घरकुल लाभार्थ्यांनी दिला आहे .

चौकट
“तालुक्याला पैनगंगा नदीपात्र लागून आहे पण एकही रेती घाट यावर्षी लिलाव झाला नाही.परिणामी रेती चे दर गगनाला भिडले आहेत.याचा फायदा घेत रेतीतस्कर रात्रीच्या अंधारात खराब रेती आठ ते दहा हजार रुपये ब्रास प्रमाणे विकत असून.मात्र महसुल विभाग जाणीव पूरक काना डोळा करत असल्याचाआरोप सर्वसामान्य जनतेतूनकेला जात आहे.ही महागडी रेती घरकुल लाभार्थ्यांना परवडणार नसून तीस चाळीस हजार रेतीसाठी खर्च करून एक लाख वीस हजार रुपयांत घर बांधणे कठीण झाले आहे.”

ही बातमी शेअर करा
विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क, मारेगाव विदर्भातील घडामोडींपासून राज्य, देश आणि जगभरातील ताज्या, अचूक व विश्वासार्ह बातम्या सर्वात आधी आपल्या भेटीला. ब्रेकिंग न्यूज, राजकारण, गुन्हे, सामाजिक, कृषी, शिक्षण, क्रीडा, मनोरंजन आणि विशेष रिपोर्ट्स एका क्लिकवर. सत्याला आवाज देणारे, जनतेचा विश्वास जपणारे आपले हक्काचे न्यूज पोर्टल – विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क मारेगाव.
प्रतिक्रिया द्या
⚡ मारेगाव फ्लॅश व्हिडिओ पहा
↓ रिफ्रेश करण्यासाठी खाली ओढा
💬 चॅटवर शेअर करा 📢 स्टेटसवर शेअर करा
📱 नेटिव्ह शेअर