ब्रेकिंग न्यूज
⚡ पुणे हादरलं! बारामतीत माजी सरपंच महिलेसह दोघींचा चिरला गळा, मध्यरात्री झोपेतच डबल मर्डर ✦ ⚡ नाल्यावर हात-पाय धुताना काहीतरी चावले; चार दिवसांनी शेतमजुराचा मृत्यू ✦ ⚡ शिवनी धोबे येथे शेतकरीपुत्राची गळफास घेऊन आत्महत्या ✦ ⚡ कर्ज 9 लाखांचं, 26 लाख देऊनही सावकाराची 25 लाखांची डिमांड, शेतकऱ्यानं पत्नीची माफी मागितली अन्…, कोल्हापू… ✦ ⚡ Jalgaon Cotton Crop News | कपाशीवर लाल्या रोगाचा प्रादुर्भाव,शेतकऱ्यांचं आर्थिक नुकसान | Farmer News ✦ ⚡ शिक्षणानंतर शेती करण्याचं धाडस दाखवलं, तरुण शेतकऱ्यानं केली केळीची लागवड, आता लाखात कमाई ✦ ⚡ SIR Maharashtra: तुम्हाला निवडणूक आयोगाची SIR ची नोटीस आलीय? आता कुठेही धावपळ करायची गरज नाही; आला मोठा नि… ✦ ⚡ शिक्षणाचा खर्च भागवण्यासाठी घेतला शेतीचा निर्णय, श्रेयसने 5 गुंठ्यात केली कमाल, 2 लाख निव्वळ नफा ✦ ⚡ Premanand Maharaj : प्रेमानंद महाराजांच्या शिष्याच्या मृत्यू प्रकरणात ट्विस्ट! खोलीत संशयास्पद वस्तू, CCTV … ✦ ⚡ Premanand Maharaj : प्रेमानंद महाराजांच्या शिष्याच्या मृत्यू प्रकरणात ट्विस्ट! खोलीत संशयास्पद वस्तू, CCTV …
SP News Maregaon

अखेर मारेगाव घर फोडी प्रकरणातील एक संशयीत चोरटा मारेगाव पोलिसांच्या ताब्यात…!

88 Views
🔊 बातमी ऐका (Marathi Voice Reader)

तेलंगणा राज्यातून चोट्याला घेतले ताब्यात,अनेक चोरटे पोलिसांच्या निशाण्यावर.

मारेगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल.

मारेगाव येथे दिनांक 14 सप्टेंबर 2023 चे एकाच रात्री सुमारे 13 ते 17 घरफोडीची घटना घडली होती.यामुळे नागरिकात दहशत निर्माण झाली होती.

या दहशत निर्माण करणाऱ्या चोरी प्रकरणातील शोध घेण्याचे मोठे आव्हान मारेगांव पोलिसा सामोर होते.या प्रकरणात पोलिसांना एक आरोपी पकडण्यात यश मिळाले असुन संशयितास तेलंगणा राज्यातून ‘फिंगर प्रिंट’ च्या आधारे एकास ताब्यात घेण्यात आले असून घटनेच्या खोलात जावून चोरीचा उलगडा होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.उर्वरीत आरोपी पोलिसांच्या निशाण्यावर आहे.

संपूर्ण जिल्ह्यात खळबळ निर्माण करणाऱ्या चोरीच्या घटनेने पोळा सणाच्या दुसऱ्या दिवशीच्या मध्यरात्री मारेगाव येथील माधव,ओम व निर्मिती नगरीतील सुमारे 13 ते 17 घरे चोरट्यांनी फोडून खळबळ माजविली होती. इतक्या मोठ्या प्रमाणात घरफोडी होण्याची ही घटना जिल्ह्याच्या इतिहासातील पहिलीच असावी असा अंदाज ही वर्तविला जात होता मारेगाव पोलिसांनी तपासाचे चक्रे जलद गतिने फिरवुन आजू बाजूच्या राज्यात पथक कार्यान्वित केले असुन घटनेच्या दिवशी स्कॉट डॉग सह ठसे तज्ज्ञ यांना पाचारण करण्यात आले होते.

फिंगरप्रिंट चा आधार तज्ज्ञांना लागला.त्या दिशेने पोलिसांनी तपासाची चक्रे चहुबाजूंनी फिरविली.सदर तेलंगणा राज्यातील आसिफाबाद येथील दोन दिवसांपूर्वी एका घरी चार चोरट्यांनी डाव मारला.येथील नागरीकांच्या सतर्कतेने एकास पकडण्यात पोलिसांना यश मिळविले तर यातील तिघे पसार होण्यास यशस्वी झाले. आसिफाबाद पोलिसांकडून फिंगरप्रिंट च्या आधारे शेट्टी रमेश उर्फ प्रकाश राजा मनीकम वय 54 वर्ष रा.प्रदुरवल्लीपुरम जि.पल्लीवरम (तामिळनाडू) यांचेवर कलम 457/380 नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मारेगाव पोलिसांनी आशिफाबाद पोलीसांच्या सहकार्याने अटक करुन त्यास न्यायालया कडून दिनांक 16ऑक्टोंबर 2023 रोज सोमवार परियंत 5 दिवसाची पोलीस कस्टडी सुनावण्यात आली.या चोरट्याकडून चोरीतील अनेक बाबीचा उलगडा होण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.तेलंगणा राज्यातून उपविभागीय पोलिस अधिकारी गणेश केंद्रे यांच्या मार्गदर्शनात मारेगाव येथील ठाणेदार जनार्धन खंडेराव यांचे सह उपनिरीक्षक ज्ञानेश्वर सावंत,जमादार आनंद अलचेवार,दीपक गावंडे, प्रमोद जिड्डेवार,अजय वाभीटकर,भालचंद्र मांडवकर.रजनीकांत पाटील यांनी ही मोहीम पार पाडली.

ही बातमी शेअर करा
विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क, मारेगाव विदर्भातील घडामोडींपासून राज्य, देश आणि जगभरातील ताज्या, अचूक व विश्वासार्ह बातम्या सर्वात आधी आपल्या भेटीला. ब्रेकिंग न्यूज, राजकारण, गुन्हे, सामाजिक, कृषी, शिक्षण, क्रीडा, मनोरंजन आणि विशेष रिपोर्ट्स एका क्लिकवर. सत्याला आवाज देणारे, जनतेचा विश्वास जपणारे आपले हक्काचे न्यूज पोर्टल – विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क मारेगाव.
प्रतिक्रिया द्या
⚡ मारेगाव फ्लॅश व्हिडिओ पहा
↓ रिफ्रेश करण्यासाठी खाली ओढा
💬 चॅटवर शेअर करा 📢 स्टेटसवर शेअर करा
📱 नेटिव्ह शेअर