ब्रेकिंग न्यूज
⚡ SIR Maharashtra: तुम्हाला निवडणूक आयोगाची SIR ची नोटीस आलीय? आता कुठेही धावपळ करायची गरज नाही; आला मोठा नि… ✦ ⚡ शिक्षणाचा खर्च भागवण्यासाठी घेतला शेतीचा निर्णय, श्रेयसने 5 गुंठ्यात केली कमाल, 2 लाख निव्वळ नफा ✦ ⚡ Premanand Maharaj : प्रेमानंद महाराजांच्या शिष्याच्या मृत्यू प्रकरणात ट्विस्ट! खोलीत संशयास्पद वस्तू, CCTV … ✦ ⚡ ५ हजार दिले तरी प्रोटीन दिले नाही, राग अनावर, थेट जीम ट्रेनरची हत्या, जालना हादरलं ✦ ⚡ Asian Games : बुटाचं सोल तुटलं तरीही पोरीनं पटकावलं मेडल; कोण आहे सीमा कुमारी? आईला न सांगताच जपानला पोहोचल… ✦ ⚡ महिन्याला दागिने खरेदी करायची अन् VIDEO बनवयायची, चोरट्यांनी Reel पाहून केलं भयानक काडं, नेमकं काय घडलं? ✦ ⚡ Mumbai Local: मुंबईकर गणेश विसर्जनाला बाहेर पडताय? चर्चगेट ते विरार धावणार जादा गाड्या, पण 84 लोकलचा ‘तो’ थ… ✦ ⚡ Crime : बापाला बायकोने जीवे मारलं, पण पोराला भलत्याच गोष्टीच दुःख, सूनबाई क्रिमिनल का बनली? ✦ ⚡ बाऊन्ड्री लाईनवर थरार, दोन बोटांनी घेतली कॅच, अख्खं स्टेडिअम उभं राहून पाहत राहिलं, VIDEO ✦ ⚡ महिला शेतकऱ्यांसाठी ऑनलाइन प्रमाणपत्र नोंदणी सुरू
SP News Maregaon

ब्रेकिंग अपडेट:जळका फाटा भीषण अपघात : मृतांची संख्या २, अनेक जखमी

2.5k Views
🔊 बातमी ऐका (Marathi Voice Reader)

करंजी–वणी राज्य महामार्गावर झाला होता भीषण अपघात; एस.टी. बसचे दोन तुकडे

सुरेश पाचभाई मारेगाव

मारेगाव तालुक्यातील जळका फाटा परिसरात काल गुरुवार दिनांक ४ डिसेंबर २०२५ रोजी रात्री ८ वाजताच्या सुमारास घडलेल्या भीषण अपघातात दोन जणांचा मृत्यू झाला असून अनेक प्रवासी गंभीर जखमी झाले आहेत.

करंजी–वणी मार्गावर MH-40 Y-5782 या एस.टी. बसला समोरून भरधाव वेगात येणाऱ्या MH-28 BB-2827 या ट्रकने जोरदार धडक दिली. धडकेची तीव्रता इतकी मोठी होती की बस अक्षरशः दोन तुकड्यांमध्ये विभागली गेली होती.

या अपघातामध्ये जागीच मृत्यू: झालेल्या व्यक्तींचे नाव नवनाथ शिवाजी काचे (वय 30, रा. अंकुलगा, जि. लातूर) व भीमराव मरस्कोल्हे (वय 50, रा. मंगी, ता. केळापूर) आहे.

तर गंभीर जखमी: बसचालकासह शुभम ढोंबरे, रोहित योकनकर (मोहदा), सचिन झिलपे (बोटोनी), अमोल टेकसे (मेटीखेडा), संतोष खिलके (किंगा), प्रशांत चिंचोळकर (मेटीखेडा), विमल मरस्कोल्हे (मंगी), दुर्गा ठाकरे (ब्रम्हपुरी), नरेंद्र मडावी (मंगी), भीमराव मडावी (मंगी) आदी प्रवासी गंभीर जखमी झाले असून काहींची प्रकृती चिंताजनक आहे.

अपघाताची माहिती मिळताच मारेगाव पोलीस व रुग्णवाहिका ताफा घटनास्थळी दाखल झाला. स्थानिक ग्रामस्थांनीही तत्परता दाखवत बसच्या चिरडलेल्या अवशेषांमधून प्रवाशांची सुटका केली.

सर्व जखमींना करंजी ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले होते व गंभीर जखमींना पांढरकवडा व यवतमाळ येथे हलविण्यात आल्याची माहिती प्राप्त झाली आहे.अपघाताचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झाले नसून मारेगाव पोलिसांचा तपास सुरू आहे.

ही बातमी शेअर करा
विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क, मारेगाव विदर्भातील घडामोडींपासून राज्य, देश आणि जगभरातील ताज्या, अचूक व विश्वासार्ह बातम्या सर्वात आधी आपल्या भेटीला. ब्रेकिंग न्यूज, राजकारण, गुन्हे, सामाजिक, कृषी, शिक्षण, क्रीडा, मनोरंजन आणि विशेष रिपोर्ट्स एका क्लिकवर. सत्याला आवाज देणारे, जनतेचा विश्वास जपणारे आपले हक्काचे न्यूज पोर्टल – विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क मारेगाव.
प्रतिक्रिया द्या
⚡ मारेगाव फ्लॅश व्हिडिओ पहा
↓ रिफ्रेश करण्यासाठी खाली ओढा
💬 चॅटवर शेअर करा 📢 स्टेटसवर शेअर करा
📱 नेटिव्ह शेअर