ब्रेकिंग न्यूज
Vasai-Virar Mahapalika मध्ये कर्मचारी भरतीवरून राडा, भाजप आणि बविआ आमने-सामनेे एक शेळीपासून सुरू केलेला व्यवसाय, आता 40 शेळ्यांचा मालक, सिद्धेश्वर यांचा वर्षाचा कमाईचा आकडा पाहाच! गौरीपूजनाला गावी गेले, छ. संभाजीनगरात 4 घरं फोडली; लाखोंची लूट, पण 4 तोळ्यांचा हार तिथंच फेकला, शॉकिंग कारण… Superfast 100 News | सुपरफास्ट बातम्या | 23 September | Sunil Shelke News | SIM Cars News | Fadnavis साहेब, कसं जगायचं! पिकांचा उरला फक्त पाला, डोळ्यात पाणी आणणारा शेतकऱ्याचा VIDEO भावी पतीलाच दिसले नको ते फोटो, मुंबईतल्या तरुणीसोबत भयंकर घडलं, 10 हजारांची डिमांड अन् ‘इन्स्टा’वर… अशक्य काहीच नाही! टेनिस कोर्टवरचा ‘गोल्डन बॉय’ झाला CA, पहिल्याच प्रयत्नात कसं मिळवलं यश? Video लेकीला घेऊन आई घरी निघाली, वाटतेच मोपेड घसरली, मागून काळ बनून आला डंपर, क्षणात…, कोल्हापूर हळहळलं बनावट CBI अधिकारी, ज्येष्ठ नागरिकांना डिजिटल अरेस्टच्या नावाखाली 100 कोटींचा गंडा, पुण्यातील धक्कादायक घटना… Sonam Maskar : कोरोनात मुंबई सोडून कोल्हापूर गाठलं; प्रॉपर्टी विकून लेकीचं स्वप्न पूर्ण केलं; पोरीनं Asian …
SP News Maregaon

बोटोनी येथील सरपंच व सदस्य यांच्या अपात्रतेला स्थगिती

75 Views
🔊 बातमी ऐका (Marathi Voice Reader)

मारेगांव तालुका प्रतिनिधी:- सुरेश पाचभाई
[9922862184]

मारेगाव तालुक्यातील :- बोटोनी येथील सरपंच आणि दोन सदस्यांवर नुकताच  जातपडताळणी प्रमाणपत्र वेळेत सादर न केल्यामुळे अपात्रतेची कार्यवाही करण्यात आली होती. परंतु अमरावती येथील अप्पर आयुक्त यांच्या न्यायालयात अपात्र ठरविण्यात आलेले सरपंच व दोन सदस्यानी धाव घेत आपली बाजु मांडत त्यांना अपात्रतेच्या कार्यवाही वर स्थगिती मिळविण्यास यश आले आहे.


बोटोनी येथील सरपंचा सौ. सुनीता विनायक जुमनाके यांच्यासह सौ. सुवर्णा ठक आणि अश्विनी मडावी या ग्रामपंचायत निवडणुकीत निवडून आल्या होत्या. परंतु निवडून आल्यानंतर त्यांनी जातपडताळणी प्रमाणपत्र मुदतीमध्ये सादर केले नसल्याने त्या विरोधात तक्रार दाखल करण्यात आली होती.  तक्रारीच्या आधारे सरपंच आणि दोन सदस्य यांच्यावर कार्यवाही करीत अपात्र करण्यात आले.

 “दरम्यान अपात्रतेच्या आव्हानाला सरपंच व दोन सदस्यांनी अमरावती येथील अप्पर आयुक्तांच्या न्यायालयात रितसर दाद मागत आपली बाजु मांडली., न्यायालयाने सदर सदस्यांची बाजु ऐकुण घेत जातपडताळणीची वस्तुस्थिती लक्षात घेऊन अपात्रतेला पुढील आदेशापर्यंत स्थगिती देण्यात आली. 
सौ.सुनिता जुमनाके,सरपंच, ग्रा. पं. बोटोणी 

ही बातमी शेअर करा
विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क, मारेगाव विदर्भातील घडामोडींपासून राज्य, देश आणि जगभरातील ताज्या, अचूक व विश्वासार्ह बातम्या सर्वात आधी आपल्या भेटीला. ब्रेकिंग न्यूज, राजकारण, गुन्हे, सामाजिक, कृषी, शिक्षण, क्रीडा, मनोरंजन आणि विशेष रिपोर्ट्स एका क्लिकवर. सत्याला आवाज देणारे, जनतेचा विश्वास जपणारे आपले हक्काचे न्यूज पोर्टल – विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क मारेगाव.
प्रतिक्रिया द्या
मारेगाव फ्लॅश व्हिडिओ पहा
रिफ्रेश करण्यासाठी खाली ओढा
💬 चॅटवर शेअर करा 📢 स्टेटसवर शेअर करा
📱 नेटिव्ह शेअर