ब्रेकिंग न्यूज
⚡ Mumbai Local: मुंबईकर गणेश विसर्जनाला बाहेर पडताय? चर्चगेट ते विरार धावणार जादा गाड्या, पण 84 लोकलचा ‘तो’ थ… ✦ ⚡ Crime : बापाला बायकोने जीवे मारलं, पण पोराला भलत्याच गोष्टीच दुःख, सूनबाई क्रिमिनल का बनली? ✦ ⚡ बाऊन्ड्री लाईनवर थरार, दोन बोटांनी घेतली कॅच, अख्खं स्टेडिअम उभं राहून पाहत राहिलं, VIDEO ✦ ⚡ महिला शेतकऱ्यांसाठी ऑनलाइन प्रमाणपत्र नोंदणी सुरू ✦ ⚡ Woman Farmer: कारभारणीचा ‘महिला शेतकरी’ म्हणून भरा अर्ज, सरकारी योजनांचा मिळेल लाभ, कोणती लागेल कागदपत्रं? ✦ ⚡ विदर्भाच्या ‘समृद्धी’चा मार्ग मोकळा! 42 हजार कोटींचा प्लॅन, 3 नवे महामार्ग होणार, कुठून कुठं जाणार? ✦ ⚡ Vasai-Virar Mahapalika मध्ये कर्मचारी भरतीवरून राडा, भाजप आणि बविआ आमने-सामनेे ✦ ⚡ एक शेळीपासून सुरू केलेला व्यवसाय, आता 40 शेळ्यांचा मालक, सिद्धेश्वर यांचा वर्षाचा कमाईचा आकडा पाहाच! ✦ ⚡ गौरीपूजनाला गावी गेले, छ. संभाजीनगरात 4 घरं फोडली; लाखोंची लूट, पण 4 तोळ्यांचा हार तिथंच फेकला, शॉकिंग कारण… ✦ ⚡ Superfast 100 News | सुपरफास्ट बातम्या | 23 September | Sunil Shelke News | SIM Cars News | Fadnavis
SP News Maregaon

कान्हाळगाव (वाई)येथील 49 वर्षीय व्यक्तीची कीटकनाशक प्राशन करून आत्महत्या

126 Views
🔊 बातमी ऐका (Marathi Voice Reader)

सुरेश पाचभाई मारेगाव,

मारेगाव तालुक्यातील कान्हाळगाव (वाई) येथील सुमारे 49 वर्षीय व्यक्तीने विषारी कीटक नाशक प्राशन करून आत्महत्या केल्याची घटना काल दिनांक 17 फेब्रुवारी 2024 रोज शनिवारला सकाळी 7:30 वाजताच्या सुमारास घटना उघडकीस आली.

सविस्तर वृत्त असे की.
तालुक्यातील एका पाठोपाठ एक आत्महत्यांचे सत्र सतत सुरु आहेत.ते थांबताना मात्र दिसून येत नाही.शासन स्तरावरून यावर कोणत्याही उपाययोजना केल्या जात नाही अथवा या थांबण्यासाठी ठोस पावलेही उचलले जात नाही.

शत्रुघन तुकाराम मेश्राम वय सुमारे 49 वर्ष रा.कान्हाळगाव (वाई)असे कीटक नाशक प्राशन करून आत्महत्या केलेल्या व्यक्तीचे नाव असून मिळालेल्या माहिती नुसार शत्रुघन यांनी काल दिनांक 17 फेब्रुवारी 2024 रोज शनिवारला सकाळी 7:30 वाजताच्या सुमारास स्वतचे राहतेघरी कीटक नाशक प्राशन केल्याचे कुटुंबातील सदस्यांच्या लक्षात येताच त्याला लगेच करंजी येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल केले.

पण त्यांची प्रकृती गंभीर असल्याने तेथील डॉक्टरांनी प्रथम उपचार करुन त्याला पुढील उपचारासाठी यवतमाळ येथे स्थलंतरित केले पण यवतमाळ येथे उपचारादरम्यान दुपारी 3:30 वाजताच्या सुमारास त्यांची प्राज्योत मालवली असुन त्याच्या वडीलांच्या नावाने 5 एकर शेती असल्याची माहिती मिळाली आहे.असून शत्रुघन यांच्या पश्चात एक मुलगा,सुन असा आप्त परिवार आहे.त्यांच्या आत्महत्येचे कारण अजुन गुलदस्त्यात आहे.या प्रकरणाचा पुढील तपास मारेगाव  पोलीस करीत आहेत.

ही बातमी शेअर करा
विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क, मारेगाव विदर्भातील घडामोडींपासून राज्य, देश आणि जगभरातील ताज्या, अचूक व विश्वासार्ह बातम्या सर्वात आधी आपल्या भेटीला. ब्रेकिंग न्यूज, राजकारण, गुन्हे, सामाजिक, कृषी, शिक्षण, क्रीडा, मनोरंजन आणि विशेष रिपोर्ट्स एका क्लिकवर. सत्याला आवाज देणारे, जनतेचा विश्वास जपणारे आपले हक्काचे न्यूज पोर्टल – विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क मारेगाव.
प्रतिक्रिया द्या
⚡ मारेगाव फ्लॅश व्हिडिओ पहा
↓ रिफ्रेश करण्यासाठी खाली ओढा
💬 चॅटवर शेअर करा 📢 स्टेटसवर शेअर करा
📱 नेटिव्ह शेअर