ब्रेकिंग न्यूज
⚡ ५ हजार दिले तरी प्रोटीन दिले नाही, राग अनावर, थेट जीम ट्रेनरची हत्या, जालना हादरलं ✦ ⚡ Asian Games : बुटाचं सोल तुटलं तरीही पोरीनं पटकावलं मेडल; कोण आहे सीमा कुमारी? आईला न सांगताच जपानला पोहोचल… ✦ ⚡ महिन्याला दागिने खरेदी करायची अन् VIDEO बनवयायची, चोरट्यांनी Reel पाहून केलं भयानक काडं, नेमकं काय घडलं? ✦ ⚡ Mumbai Local: मुंबईकर गणेश विसर्जनाला बाहेर पडताय? चर्चगेट ते विरार धावणार जादा गाड्या, पण 84 लोकलचा ‘तो’ थ… ✦ ⚡ Crime : बापाला बायकोने जीवे मारलं, पण पोराला भलत्याच गोष्टीच दुःख, सूनबाई क्रिमिनल का बनली? ✦ ⚡ बाऊन्ड्री लाईनवर थरार, दोन बोटांनी घेतली कॅच, अख्खं स्टेडिअम उभं राहून पाहत राहिलं, VIDEO ✦ ⚡ महिला शेतकऱ्यांसाठी ऑनलाइन प्रमाणपत्र नोंदणी सुरू ✦ ⚡ Woman Farmer: कारभारणीचा ‘महिला शेतकरी’ म्हणून भरा अर्ज, सरकारी योजनांचा मिळेल लाभ, कोणती लागेल कागदपत्रं? ✦ ⚡ विदर्भाच्या ‘समृद्धी’चा मार्ग मोकळा! 42 हजार कोटींचा प्लॅन, 3 नवे महामार्ग होणार, कुठून कुठं जाणार? ✦ ⚡ Vasai-Virar Mahapalika मध्ये कर्मचारी भरतीवरून राडा, भाजप आणि बविआ आमने-सामनेे
SP News Maregaon

दुचाकीची उभ्या ट्रकला धडक
पती-पत्नी गंभीर

153 Views
🔊 बातमी ऐका (Marathi Voice Reader)

इंडियन पेट्रोलपंपा जवळील जे.डी धाब्या समोरील घटना

गजानन आसुटकर मारेगाव,

मारेगावकडून सालेभट्टीकडे जात असलेल्या दुचाकीने पेट्रोल पंप जवळ उभ्या असलेल्या ट्रकला मागून जोरदार धडक दिली. यात दोघेही पती-पत्नी गंभीर जखमी झाले असून त्यांना मारेगाव येथे उपचार करून सेवाग्राम येथे पुढील उपचारासाठी पाठवल्याची माहिती आहे.

Two-wheeler collided with a standing truck, husband and wife serious

हिंगणघाट तालुक्यातील बोपापूर (आजनसरा )येथील रामाजी भाऊराव कोरझरे वय अंदाजे 50 आणि त्यांची पत्नी शोभा रामाजी कोरझरे वय अंदाजे 45 हे दोघेही दि.27 एप्रिलला त्यांची दुचाकी क्र. MH.34-AX 0288 ने काही कार्यानिमित्य मारेगाव तालुक्यातील सालेभट्टी येथे जात असल्याची माहिती आहे.

ते मारेगाव जवळील वणी रोडवरील इंडियन पेट्रोल पंम्प जवळ उभ्या असलेल्या ट्रक क्र. MH. 46-AR 7816 ला मागून जोरदार धडक दिली. ही घटना दि.27 ला सायंकाळी ७:३० वाजताच्याच्या  सुमारास घडली.यात दुचाकीस्वार दोघेही  गंभीर जखमी झाले. अपघात घडताच जनहित कल्याण संघटनेच्या सदस्यांनी त्यांना त्वरित ग्रामीण रुग्णालयात दाखल केले.

त्यांचेवर मारेगाव येथे प्राथमिक उपचार करून पुढील उपचारासाठी सेवाग्राम येथे पाठवण्यात आल्याची माहिती आहे.यासाठी मारेगाव येथील साई मित्र परिवाराने त्यांच्यासाठी रुग्णवाहिकेची व्यवस्था करून त्यांना सेवाग्राम येथे पाठवल्याची माहिती आहे.या घटनेची माहिती मिळताच मारेगाव पोलीस घटनास्थळी दाखल झाले असून या अपघाताचा पुढील तपास मारेगाव पोलीस करीत आहे.

ही बातमी शेअर करा
विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क, मारेगाव विदर्भातील घडामोडींपासून राज्य, देश आणि जगभरातील ताज्या, अचूक व विश्वासार्ह बातम्या सर्वात आधी आपल्या भेटीला. ब्रेकिंग न्यूज, राजकारण, गुन्हे, सामाजिक, कृषी, शिक्षण, क्रीडा, मनोरंजन आणि विशेष रिपोर्ट्स एका क्लिकवर. सत्याला आवाज देणारे, जनतेचा विश्वास जपणारे आपले हक्काचे न्यूज पोर्टल – विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क मारेगाव.
प्रतिक्रिया द्या
⚡ मारेगाव फ्लॅश व्हिडिओ पहा
↓ रिफ्रेश करण्यासाठी खाली ओढा
💬 चॅटवर शेअर करा 📢 स्टेटसवर शेअर करा
📱 नेटिव्ह शेअर