ब्रेकिंग न्यूज
Monsoon Update: हवामान विभागाचा नवा अलर्ट अन् महाराष्ट्राची चिंता वाढली, परतीचा मान्सूननबाबत महत्त्वाचं अपड… द्राक्षबाग काढली अन् पैशाचं पीक लावलं, खर्च 10 हजार, कमाई अडीच लाख, सोलापूरच्या शेतकऱ्यानं काय केलं? Video Sangli: सांगलीत चोरट्यांचा धुमाकूळ, 10 लाखांच्या रोकडसह ‘ATM’ मशीनच पळवलं, मध्यरात्रीच थरार Kalyan: ‘भेटायला बोलवलं, बंदूक दाखवली, भाजपच्या माजी आमदारासह पोलिसाकडून सामूहिक अत्याचार’, तरुणीने तक्रारी… टीम इंडियाच्या एकाच वेळी दोन सीरिज, दोन्ही ठिकाणी निवड झालेला नितीश रेड्डी कुठे खेळणार? Sangli: 2018 सालचं आटपाडी प्रकरण, तीन मुलींसोबत…, 70 वर्षाच्या म्हाताऱ्याला थेट फाशीची शिक्षा, सांगलीत का… Latur Crime : मृत्यूपूर्वी संस्थाचालक संजीव सोनवणे यांच्या डोक्याला टाके, प्रकरणात पुणे कनेक्शन! बहिणीला मु… बाबापुरच्या गणरायाच्या दर्शनासाठी भक्तीचा ओघ वाढतोय! Nigar Sultana : हरमनप्रीतशी पंगा पडला भारी! बांगलादेशच्या कॅप्टनची तातडीने हकालपट्टी, सेमीफायनलमध्ये काय घड… गृहिणी बनली उद्योजिका, 700 कोंबड्यांपासून सुरू केला व्यवसाय, आता महिन्याला 3 लाखांची उलाढाल, Video
SP News Maregaon

मारेगावात धाडसी घरफोडी : चोरट्यांचा डाव साधला

9 Views
🔊 बातमी ऐका (Marathi Voice Reader)

जुन्या किमती प्रमाणे साडेतीन लाखांचा ऐवज लंपास

सुरेश पाचभाई | मारेगाव

मारेगाव शहर पुन्हा एकदा घरफोडीच्या घटनेने हादरले असून, वार्ड क्रमांक १४ मध्ये अज्ञात चोरट्यांनी साधलेल्या डावामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. भरदिवसा घराला केवळ कुंडी लावल्याचा फायदा घेत चोरट्यांनी थेट घरात प्रवेश करून सोन्या-चांदीसह रोख रक्कम असा तब्बल अंदाजे जुन्या किंमती प्रमाणे ३ लाख ३१ हजार ९९० रुपयांचा मुद्देमाल लंपास केल्याची खळबळजनक घटना उघडकीस आली आहे.

फिर्यादी सुशील दत्तात्रय जंगेवार (वय ४२) हे स्थानिक विविध कार्यकारी सहकारी संस्थेत कार्यरत असून कुटुंबासह वास्तव्यास आहेत. नातेवाईकांच्या कार्यक्रमानिमित्त काही दिवसांपूर्वी त्यांनी मौल्यवान दागिने सुरक्षिततेसाठी मामाकडे ठेवले होते. ४ एप्रिल रोजी ते दागिने परत आणण्यात आले होते.

मात्र ६ एप्रिल रोजी दुपारच्या सुमारास फिर्यादींची पत्नी मंदिरात जाताना घराला कुलूप न लावता केवळ कुंडी लावून गेली. याच क्षणाची अचूक साध साधत अज्ञात चोरट्यांनी घरात प्रवेश केला आणि पर्समध्ये ठेवलेले सुमारे १५.५ तोळे सोनं, ९ तोळे चांदी व ११ हजार रुपये रोख रक्कम असा ऐवज चोरून नेला. ७ एप्रिल रोजी सायंकाळी ही चोरी उघडकीस येताच परिसरात एकच खळबळ उडाली.

या प्रकरणी मारेगाव पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहिता कलम ३०५ (a) BNS अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला असून, ठाणेदार श्याम वानखेडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक प्रविण सुळे व पोलीस हवालदार शंकर बारेकर तपास करत आहेत.

ही बातमी शेअर करा
विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क, मारेगाव विदर्भातील घडामोडींपासून राज्य, देश आणि जगभरातील ताज्या, अचूक व विश्वासार्ह बातम्या सर्वात आधी आपल्या भेटीला. ब्रेकिंग न्यूज, राजकारण, गुन्हे, सामाजिक, कृषी, शिक्षण, क्रीडा, मनोरंजन आणि विशेष रिपोर्ट्स एका क्लिकवर. सत्याला आवाज देणारे, जनतेचा विश्वास जपणारे आपले हक्काचे न्यूज पोर्टल – विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क मारेगाव.
प्रतिक्रिया द्या
मारेगाव फ्लॅश व्हिडिओ पहा
रिफ्रेश करण्यासाठी खाली ओढा
💬 चॅटवर शेअर करा 📢 स्टेटसवर शेअर करा
📱 नेटिव्ह शेअर