ब्रेकिंग न्यूज
Vasai-Virar Mahapalika मध्ये कर्मचारी भरतीवरून राडा, भाजप आणि बविआ आमने-सामनेे एक शेळीपासून सुरू केलेला व्यवसाय, आता 40 शेळ्यांचा मालक, सिद्धेश्वर यांचा वर्षाचा कमाईचा आकडा पाहाच! गौरीपूजनाला गावी गेले, छ. संभाजीनगरात 4 घरं फोडली; लाखोंची लूट, पण 4 तोळ्यांचा हार तिथंच फेकला, शॉकिंग कारण… Superfast 100 News | सुपरफास्ट बातम्या | 23 September | Sunil Shelke News | SIM Cars News | Fadnavis साहेब, कसं जगायचं! पिकांचा उरला फक्त पाला, डोळ्यात पाणी आणणारा शेतकऱ्याचा VIDEO भावी पतीलाच दिसले नको ते फोटो, मुंबईतल्या तरुणीसोबत भयंकर घडलं, 10 हजारांची डिमांड अन् ‘इन्स्टा’वर… अशक्य काहीच नाही! टेनिस कोर्टवरचा ‘गोल्डन बॉय’ झाला CA, पहिल्याच प्रयत्नात कसं मिळवलं यश? Video लेकीला घेऊन आई घरी निघाली, वाटतेच मोपेड घसरली, मागून काळ बनून आला डंपर, क्षणात…, कोल्हापूर हळहळलं बनावट CBI अधिकारी, ज्येष्ठ नागरिकांना डिजिटल अरेस्टच्या नावाखाली 100 कोटींचा गंडा, पुण्यातील धक्कादायक घटना… Sonam Maskar : कोरोनात मुंबई सोडून कोल्हापूर गाठलं; प्रॉपर्टी विकून लेकीचं स्वप्न पूर्ण केलं; पोरीनं Asian …
SP News Maregaon

दैनिक सकाळचे पत्रकार कैलास ठेंगणे यांचेवर रानडूकाराचा हल्ला

60 Views
🔊 बातमी ऐका (Marathi Voice Reader)

कुंभा येथे शेतात जात असतांना राज्य महामार्गावरील घटना

सायंकाळच्या सुमारास  हाताची शस्त्रक्रिया , वणी येथे उपचाराकरिता दाखल.

मारेगांव तालुका प्रतिनिधी:- सुरेश पाचभाई
[9922862184]

मारेगाव तालुक्यातील:- कुंभा येथील दै. सकाळचे बातमीदार तथा विदर्भ सर्च न्यूज नेटवर्कचे उपसंपादक कैलास नथ्थूजी ठेंगणे यांच्या धावत्या दुचाकीवर रानडुकराने हल्ला चढवून त्यांना गंभीर जखमी केल्याची घटना आज दिनांक 28 एप्रिल 2022 रोज गुरूवारला सकाळी 10:30 वाजताचे सुमारास ईसार पेट्रोल पंप पासून काही अंतरावर राज्यमहामार्गावर ही घटना घडली.

कैलास ठेंगणे हे आज सकाळी कुंभा येथे शेतात मोपेड स्कुटीने जात असतांना राज्यमहामार्गावर करणवाडी मारेगाव च्या मधात झुडपातून सैरावैरा आलेल्या रानडुकराने थेट वाहनावरील कैलास यास जबर हल्ला चढविला. काही कळण्यापूर्वी घडलेल्या घटनेने कैलास हे खाली कोसळले.या घटनेत त्यांना हात , पायांना जबर इजा झाली.तात्काळ त्यांना प्राथमिक उपचारानंतर वणी खाजगी रुग्णालयात हलविण्यात आले.डॉक्टरांनी त्यांना हाताची शस्त्रक्रिया करण्यास सांगितले असून त्यांचेवर सायंकाळी शस्त्रक्रिया करण्यात येणार आहे.

दरम्यान , रानडुकर हल्ला व जखमी प्रकरणी वनविभाग प्रशासनास तक्रार दाखल करण्यात आली असून तात्काळ आर्थिक मदत प्रदान करण्याची मागणी पिडीताने केली आहे.

ही बातमी शेअर करा
विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क, मारेगाव विदर्भातील घडामोडींपासून राज्य, देश आणि जगभरातील ताज्या, अचूक व विश्वासार्ह बातम्या सर्वात आधी आपल्या भेटीला. ब्रेकिंग न्यूज, राजकारण, गुन्हे, सामाजिक, कृषी, शिक्षण, क्रीडा, मनोरंजन आणि विशेष रिपोर्ट्स एका क्लिकवर. सत्याला आवाज देणारे, जनतेचा विश्वास जपणारे आपले हक्काचे न्यूज पोर्टल – विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क मारेगाव.
प्रतिक्रिया द्या
मारेगाव फ्लॅश व्हिडिओ पहा
रिफ्रेश करण्यासाठी खाली ओढा
💬 चॅटवर शेअर करा 📢 स्टेटसवर शेअर करा
📱 नेटिव्ह शेअर