Shopping Cart
Total:

$0.00

Items:

0

Your cart is empty
Keep Shopping

शेतकऱ्यांच्या मागण्यांसाठी उबाठाचे आंदोलन

शेतकऱ्यांच्या उपस्थितीत संजय देरकर यांनी दिले तहसिलदार यांना निवेदन

सुरेश पाचभाई मारेगाव,

पिक कर्जावर लावलेला ६% व्याजदर रद्द करा,
पिक विम्याची रक्कम त्वरीत शेतकऱ्यांना देण्यात यावी,
शेतकऱ्यांना सरसकट कर्जमाफी देण्यात यावी,
शेतकऱ्यांना प्रोत्साहनपर ५० हजार अनुदान त्वरीत देण्यात यावे  तसेच  रेतीघाट त्वरीत सुरु करण्यात यावे जेणेकरून घरकुल लाभाथ्यर्थ्यांना रेती त्वरीत मिळेल या शेतकऱ्यांच्या प्रमुख समस्याबाबतचे निवेदन यवतमाळ जिल्हा मध्यवर्ती बँकेचे उपाध्यक्ष तसेच  शिवसेना ( ठाकरे गट ) वणी विधानसभा अध्यक्ष संजय देरकर यांचे नेतृत्वात मारेगाव तालुक्यातील शेतकऱ्यांनी तहसीलदार मारेगाव मार्फत मा. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना दिले.

भारत हा कृषि प्रधान देश आहे. त्याच कृषि प्रधान देशामध्ये सतत नापिकी असतांनासुद्धा मदत करण्याऐवजी आपल्या सरकार कडून शेत पिकावर ६% व्याज जबरीने आकारून शेतकऱ्यांना अडचणीत आणण्याचे किंबहुना आत्महत्या करण्यास प्रवृत्त करण्याचे काम आपले सरकार करीत आहे. मागील वर्षापर्यंत शेतक-यांकडून पिक कर्जावर कोणत्याच प्रकारचे व्याज आकारण्यात येत नव्हते. ही सत्य परिस्थिती असतांना सुद्धा आपले सरकार डोळेझाक करत असल्याचे निदर्शनास येत आहे. ज्या शेतक-यांनी पिक विमा काढलेला आहे त्या शेतकऱ्यांना त्वरीत विम्याची रक्कम अदा करावी अन्यथा तो काळ दूर नाही की, शेतकरी व शेती नसल्यानंतर आपली दैनावस्था कशी होईल हे आपणास ठाऊक आहे.

ज्या शेतकऱ्यांच्या भरोशावर आपण जगतो आहे. त्याच शेतकऱ्यांना आपले सरकार वेठीस धरत असल्याचे निर्दशनास येत आहे. मात्र या नंतर शेतकऱ्यांवर होत असलेले अन्याय कदापी खपवून घेतल्या जाणार नाही. कार्यालय मारेगाव तसेच या निवेदनाद्वारे आपल्या देशाचे शेतकरी बांधव पंजाब- हरीयाना सिमेवर करत असलेल्या आंदोलनास आमचा पाठींबा आहे असे जाहीर करतो व असेच आंदोलन आम्ही शेतकरी बांधवासह महाराष्ट्रातही चालु करु असा इशारा आपणास देण्यात येत आहे.

सरकारने मोदी आवास योजने अंतर्गत  घरकुल दिले परंतू आजमितीस लाभार्थ्यांना रेती उपलब्ध नसल्यामुळे घरकुलाचे संपूर्ण काम बंद पडलेले आहे. त्यामुळे घरकुल लाभाध्यांचे घरकुलाचे काम पूर्णपणे बंद पडलेले आहे. शेतकऱ्यांकडून शेत पिकावर कोणत्याही प्रकारचे व्याज घेवू नये, शेतकऱ्यांची सरसकट कर्ज माफी करावी व पिक विम्याची रक्कम त्वरीत त्याच्या खात्यात जमा करावे अन्यथा आम्ही आमरण उपोषण व धरणे आंदोलन करण्याचा इशारा तहसीदार मारेगाव मार्फत मा.मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना दिलेल्या निवेदनातुन देण्यात आला आहे.

यावेळी यवतमाळ जिल्हा मध्यवर्ती बँकेचे उपाध्यक्ष तसेच शिवसेना ( ठाकरे गट ) वणी विधानसभा अध्यक्ष संजय देरकर यांचे नेतृत्वात माजी जि.प.सदस्य अनिल देरकर, गजानन किन्हेकर,बदरुद्दीन विराणी,विलासराव वासाडे,काशिनाथ खडसे,सुधाकर बोधाणे,नानाजी डाखरे, जीवन डाखरे, पांडुरंग रोगे, बंडुजी टोंगे,विजय अवताडे, बाबाराव भोयर,जीवनपाटील गाते, जितेंद्र नगराळे, नारायण देरकर, सुदर्शन टेकाम,हनुमान तोडसे, मनोहर गेडाम,सौ मायाताई पेंदोर, तसेच तालुक्यातील शेतकरी बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Read Also:
0
Show Comments (0) Hide Comments (0)
0 0 votes
Article Rating
Subscribe
Notify of
guest
0 Comments
Oldest
Newest Most Voted
Inline Feedbacks
View all comments
Recent Posts:
error: Content is protected !!