ब्रेकिंग न्यूज
⚡ ५ हजार दिले तरी प्रोटीन दिले नाही, राग अनावर, थेट जीम ट्रेनरची हत्या, जालना हादरलं ✦ ⚡ Asian Games : बुटाचं सोल तुटलं तरीही पोरीनं पटकावलं मेडल; कोण आहे सीमा कुमारी? आईला न सांगताच जपानला पोहोचल… ✦ ⚡ महिन्याला दागिने खरेदी करायची अन् VIDEO बनवयायची, चोरट्यांनी Reel पाहून केलं भयानक काडं, नेमकं काय घडलं? ✦ ⚡ Mumbai Local: मुंबईकर गणेश विसर्जनाला बाहेर पडताय? चर्चगेट ते विरार धावणार जादा गाड्या, पण 84 लोकलचा ‘तो’ थ… ✦ ⚡ Crime : बापाला बायकोने जीवे मारलं, पण पोराला भलत्याच गोष्टीच दुःख, सूनबाई क्रिमिनल का बनली? ✦ ⚡ बाऊन्ड्री लाईनवर थरार, दोन बोटांनी घेतली कॅच, अख्खं स्टेडिअम उभं राहून पाहत राहिलं, VIDEO ✦ ⚡ महिला शेतकऱ्यांसाठी ऑनलाइन प्रमाणपत्र नोंदणी सुरू ✦ ⚡ Woman Farmer: कारभारणीचा ‘महिला शेतकरी’ म्हणून भरा अर्ज, सरकारी योजनांचा मिळेल लाभ, कोणती लागेल कागदपत्रं? ✦ ⚡ विदर्भाच्या ‘समृद्धी’चा मार्ग मोकळा! 42 हजार कोटींचा प्लॅन, 3 नवे महामार्ग होणार, कुठून कुठं जाणार? ✦ ⚡ Vasai-Virar Mahapalika मध्ये कर्मचारी भरतीवरून राडा, भाजप आणि बविआ आमने-सामनेे
SP News Maregaon

अल्पभुधारक शेतकऱ्याची गळफास घेऊन आत्महत्या

90 Views
🔊 बातमी ऐका (Marathi Voice Reader)

तालुक्यातील नवरगाव येथील घटना

गजानन आसुटकर मारेगाव,

मारेगाव तालुक्यात आत्महत्या रोखण्यासाठी प्रशासना कडून ठोस उपाय योजना केल्या जात नाही.तालुक्यात आत्महत्या थांबण्याचे नाव घेत नाही.नवरगाव येथील एका ३६ वर्षीय शेतकऱ्याने बैलाच्या गोठ्यात दोराच्या सहाय्याने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना आज दिनांक २९ एप्रिल २०२४ रोज सोमवारला दुपारी २ वाजताच्या सुमारास  उघडकीस आली.

सविस्तर वृत्त असे की..
उमेश अशोक नक्षणे वय सुमारे ३६ वर्ष रा.नवरगाव ता.मारेगाव असे गळफास घेऊन आत्महत्या केलेल्या व्यक्तिचे नाव असुन त्याचे कडे अंदाजे ५ एकर शेती असल्याची माहिती मिळाली आहे.तो शेती करून आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करायचा बातमी लीहिपर्यंत आत्महत्येचे नेमके कारण कळु शकले नाही.

उमेश यांनी आज बैलाच्या गोठ्यात दोराच्या सहाय्याने गळफास घेवून आत्महत्या केल्याचे कुटुंबियांच्या निदर्शनास येताच त्यांनी या घटनेची माहिती लगेच मारेगाव पोलिसांना दिली.माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले.पंचनामा करुन शव उत्तरीय तपासणी साठी मारेगाव येथील ग्रामीण रुग्णालयात हलविण्यात आले आहे.मृतक शेतकरी उमेश यांचे पश्चात आई,पत्नी, एक मुलगा व एक मुलगी असा आप्त परिवार आहे.या प्रकरणाचा पुढील तपास ठाणेदार शंकर पांचाळ यांचे मार्गर्शनाखाली जमादार किसन शुंकुरवार करीत आहे.

ही बातमी शेअर करा
विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क, मारेगाव विदर्भातील घडामोडींपासून राज्य, देश आणि जगभरातील ताज्या, अचूक व विश्वासार्ह बातम्या सर्वात आधी आपल्या भेटीला. ब्रेकिंग न्यूज, राजकारण, गुन्हे, सामाजिक, कृषी, शिक्षण, क्रीडा, मनोरंजन आणि विशेष रिपोर्ट्स एका क्लिकवर. सत्याला आवाज देणारे, जनतेचा विश्वास जपणारे आपले हक्काचे न्यूज पोर्टल – विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क मारेगाव.
प्रतिक्रिया द्या
⚡ मारेगाव फ्लॅश व्हिडिओ पहा
↓ रिफ्रेश करण्यासाठी खाली ओढा
💬 चॅटवर शेअर करा 📢 स्टेटसवर शेअर करा
📱 नेटिव्ह शेअर