ब्रेकिंग न्यूज
⚡ ५ हजार दिले तरी प्रोटीन दिले नाही, राग अनावर, थेट जीम ट्रेनरची हत्या, जालना हादरलं ✦ ⚡ Asian Games : बुटाचं सोल तुटलं तरीही पोरीनं पटकावलं मेडल; कोण आहे सीमा कुमारी? आईला न सांगताच जपानला पोहोचल… ✦ ⚡ महिन्याला दागिने खरेदी करायची अन् VIDEO बनवयायची, चोरट्यांनी Reel पाहून केलं भयानक काडं, नेमकं काय घडलं? ✦ ⚡ Mumbai Local: मुंबईकर गणेश विसर्जनाला बाहेर पडताय? चर्चगेट ते विरार धावणार जादा गाड्या, पण 84 लोकलचा ‘तो’ थ… ✦ ⚡ Crime : बापाला बायकोने जीवे मारलं, पण पोराला भलत्याच गोष्टीच दुःख, सूनबाई क्रिमिनल का बनली? ✦ ⚡ बाऊन्ड्री लाईनवर थरार, दोन बोटांनी घेतली कॅच, अख्खं स्टेडिअम उभं राहून पाहत राहिलं, VIDEO ✦ ⚡ महिला शेतकऱ्यांसाठी ऑनलाइन प्रमाणपत्र नोंदणी सुरू ✦ ⚡ Woman Farmer: कारभारणीचा ‘महिला शेतकरी’ म्हणून भरा अर्ज, सरकारी योजनांचा मिळेल लाभ, कोणती लागेल कागदपत्रं? ✦ ⚡ विदर्भाच्या ‘समृद्धी’चा मार्ग मोकळा! 42 हजार कोटींचा प्लॅन, 3 नवे महामार्ग होणार, कुठून कुठं जाणार? ✦ ⚡ Vasai-Virar Mahapalika मध्ये कर्मचारी भरतीवरून राडा, भाजप आणि बविआ आमने-सामनेे
SP News Maregaon

वीज पडून बैल ठार

104 Views
🔊 बातमी ऐका (Marathi Voice Reader)

देवाळा येथील घटना

सुरेश पाचभाई मारेगाव

मारेगांव तालुक्यातील देवाळा येथील गावाजवळ विज पडून बैलाचा मृत्यू झाल्याची घटना आज दिनांक 22  मे 2024 रोज बुधवारला  दुपारी 3 ते 3.30 वाजताच्या सुमारास घडली.वीज पडून बैल मरण पावल्याने शेतकऱ्याचे मोठे आर्थिक नुकसान झालेले आहे.

बैल मृत झालेल्या शेतकऱ्याचे नाव विठ्ठल शामराव निमकर असे आहे.तालुक्यात मागील काही दिवसापासून भर उन्हाळ्यात अवकाळी पावसाने हजेरी लावली.आज दि. 22 मेला दुपारी वादळवारा आणि पावसाला सुरुवात झाली.अचानक सुरु झालेल्या पावसामुळे शेतकरी आणि नागरिकांची मोठी धावपळ सुरु झाली.गावातली अनेकांची जनावरे उन्हाळ्याचे दिवस असल्याने शेतामध्ये मोकाट किंवा शेतातील बंड्यामध्येच बांधले जातात.

अशातच आज अचानक दुपारी आकाशात ढग दाटून आले.विजांचा कडकडाट सुरु झाला व सोसाट्याच्या वाऱ्यासह  पावसाने दमदार हजेरी लावली.देवाळा येथील विठ्ठल शामराव निमकर यांचेकडे ५ एकर शेती देवाळा शिवारात आहे. उन्हाळ्याचे दिवस असल्याने बैल ते राहत असलेल्या देवाळा येथेच असलेल्या गावातील गोठ्यामध्ये बांधलेले होते.

ह्या शेतकऱ्याच्या एका बैलावर गावातील गोठ्यामध्येच विज कोसळून बैल जागीच ठार झाला.तर दुसऱ्या बैलाचेही थोडे नुकसान झाले.शेतीचा हंगाम काही दिवसांवर येऊन ठेपला आहे. बैल मरण पावल्याने शेतकऱ्याचे  अंदाजे 50 हजार रुपयाचे आर्थिक नुकसान झाले आहे. वृत्त लिहिपर्यंत पंचनामा व्हायचा होता. डॉक्टरशी संपर्क केला असता त्यांनी दि.23 ला पंचनामा करायला येतो असे सांगितले.

ही बातमी शेअर करा
विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क, मारेगाव विदर्भातील घडामोडींपासून राज्य, देश आणि जगभरातील ताज्या, अचूक व विश्वासार्ह बातम्या सर्वात आधी आपल्या भेटीला. ब्रेकिंग न्यूज, राजकारण, गुन्हे, सामाजिक, कृषी, शिक्षण, क्रीडा, मनोरंजन आणि विशेष रिपोर्ट्स एका क्लिकवर. सत्याला आवाज देणारे, जनतेचा विश्वास जपणारे आपले हक्काचे न्यूज पोर्टल – विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क मारेगाव.
प्रतिक्रिया द्या
⚡ मारेगाव फ्लॅश व्हिडिओ पहा
↓ रिफ्रेश करण्यासाठी खाली ओढा
💬 चॅटवर शेअर करा 📢 स्टेटसवर शेअर करा
📱 नेटिव्ह शेअर